3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:34 PM2018-11-15T17:34:24+5:302018-11-15T17:34:47+5:30
इंडस्ट्री 4.0मध्ये तीन महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊ. त्याला आपण ‘कृतीची त्रिसूत्री’ म्हणू.
- डॉ. भूषण केळकर
दिवाळी झाली. पाडवा झाला. नववर्षाचं स्वागत झालं. रीतीप्रमाणं वहीपूजनही झालं. इंडस्ट्री 4.0ला सामोरं जाताना आणि आपलं करिअर घडवताना कोणत्या वहीतली कुठली पानं आपण लक्षात ठेवायला हवीत, याबद्दल आपण आजच्या संवादात विवेचन करणार आहोत.
इंडस्ट्री 4.0मध्ये तीन महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊ. त्याला आपण ‘कृतीची त्रिसूत्री’ म्हणू.
1) नोकर्या जातील/संपतील हा भयगंड काढून आपण हे लक्षात ठेवूया की नोकर्यांचं स्वरूप बदलणार आहे.
2)ज्या नोकर्यांत एकजिनसी/एकसारखं काम आहे त्यापेक्षा ज्या नोकर्या वा कामात नावीन्यपूर्णता व बदलात्मक गुणविशेष आहेत अशाच कामांमध्ये आपण प्रगती करणं गरजेचं आहे.
3) निरंतर शिक्षण. कंटिन्युअस लर्निग. याला पर्याय नाहीच हे ओळखून (आळस टाळून !) शिकत राहणं - तेही वेगवेगळ्या माध्यमातून!
यापुढील काळात मायक्रोलर्निग - किंवा म्हणू की शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांना खूप महत्त्वही असेल आणि मागणीसुद्धा. त्यामुळे एकाच गोष्टीत खूप खोलात जाणं आणि तिथंच ‘डबकं’ होऊन राहणं धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या मूळ पदवी/पदविका शिक्षणाच्या अनुषंगाने काही अन्य कोर्सेस करणं श्रेयस्कर. उदा. कॉमर्सचे मुलं-मुली टॅली किंवा एमएस-सीआयटी हे करतातच; परंतु तुम्ही बेसिक डाटा अॅनालिसीसवरचे एमओडीसीवरील र्कोसेस (जे विनामूल्य आहेत) करावेत. सगळ्यात सोपं म्हणजे एक्सेल मॅक्रोज. तुम्ही पायथॉन प्रोग्रामिंग शिकून घ्यायला (Coursera.org किंवा ode academy) या साइटची मदत घ्यायला हरकत नाही. तेही घरबसल्या.
इंजिनिअरिंग/सायन्सच्या विद्याथ्र्यानी ‘डाटा सायन्सेस’ मध्ये,R नावाच्या विनामूल्य असणार्या सॉफ्टवेअरवर अभ्यास करावा. या दोन्हीला प्रचंड मागणी आहे हे आपण मागील काही लेखात पाहिलं आहेच.
नावीन्यपूर्ण कौशल्यं म्हणलात तर मेकॅनिकल वा इन्स्ट्रमेंटेशन इंजिनिअर्सनी विशेषतर् रोबॉटिक्स वा मेकॅट्रॉनिक्सचे कोर्सेस करावेत. कॉम्प्युटरमधील विद्याथ्र्यानी विशेषतर् कलागुण (चित्रकला) अवगत/आवड असणार्यांनी ज्याला वक/व म्हणतात अशा विषयांत पारंगत व्हावं. इंजिनिअर वा बी.एस्सी., बीसीए, एमसीए विद्याथ्र्यानीसुद्धा हे शिकून घ्यायला हवं.
जर माणसशास्त्र/समाजशास्त्र आवडत असेल तर जरूर कोगनिटिव्ह कॉम्प्युटिंग कोर्स करावा. ही नुसती काही उदाहरणं आहेत. अर्थातच सगळी सूची/यादी देणं, विस्तार भयास्तव व जागेच्या अभावी मी टाळतो आहे. जे विद्यार्थी कला शाखेत आहेत, त्यांनी विशेषत्वाने क्रिएटिव्ह/ सृजनात्मक काम निवडून करणं आवश्यक आहे. ते तुम्ही केलंत तर तुम्ही नुसते टिकूनच राहणार नाही तर उत्तम प्रगती कराल. उदा. भाषेच्या विद्याथ्र्यानी तोच तोच पाठय़क्रम/ विद्यापीठाचा शिक्षणावर अवलंबून न राहता उ412ी1ं/ ी7ि यावर क्रिएटिव्ह रायटिंग/लिंग्विस्टीक्स वर काम करणं आणि त्याचा प्रत्यक्षानुभव अनेकविध इंटर्नशिप (या इंटरनेटवर उपलब्ध आहेत विनामूल्य !) करून मिळवाव्यात. Internshala.com तिथं इण्र्टनशिपही शोधता येईल.
म्हणजेच आपलं काम हे निरंतर शिक्षण तर आहेच; पण प्रत्यक्षानुभव हापण आहे आणि हे सृजनात्मक काम आपण इंटरनेटच्या साहाय्याने करू शकतो.
परवाची बातमी आहे की सोफिया ही एआय आधारित रोबोट अझरबैजान नावाच्या देशात गेली तेव्हा तिला इ-व्हीसा मिळाला. रॉबॉट्स आणि मानव यांच्या सहअस्तित्वाच्या आगामी कालखंडात आपल्याला यशाचा व्हिसा मिळेल तो बदलांना सामोरं जाण्याची तयारी, सृजनात्मक काम व निरंतर शिक्षण या त्रिसूत्रीवर!
( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)