Learn ability- हे नवीन स्किल नसेल, तर तुम्ही आऊट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:39 PM2018-12-20T12:39:33+5:302018-12-20T12:40:53+5:30

21 अपेक्षित आणि गाइडवर रट्टा मारून आपण आजवर निभावून नेलं, आता यापुढे तसं केलं तर, संपलंच करिअर!

Learn capacity - If you do not have a this new skill, then you're out! | Learn ability- हे नवीन स्किल नसेल, तर तुम्ही आऊट!

Learn ability- हे नवीन स्किल नसेल, तर तुम्ही आऊट!

googlenewsNext
ठळक मुद्देखुद्द एआय तंत्र विकसित करण्यातही भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे हे लक्षात असू दे!!

- भूषण केळकर

काहीच दिवसांत ािसमसची सुट्टी आहे. त्यावरून आठवण आली ती सॅम्युएल या बायबलमध्ये वर्णन केलेल्या एका धर्मज्ञाच्या ‘डेव्हिड अ‍ॅण्ड गोलायथ’ या कथेची. त्यात वर्णन असं आहे की, गोलायथ नावाच्या महापराक्रमी व अतिविशाल योद्धय़ाला डेव्हिडसारखा लहानसर, सामान्य; पण चपळ आणि हुशार वीर केवळ दगडाचे शस्र म्हणून वापर करून कसा पराभूत करतो. आजकाल असणार्‍या लहानसर ‘स्टार्टअप्स’ या सुप्रतिष्ठित मोठय़ा व्यवसायांना कशा टक्कर देत आहेत, नामोहरम करत आहेत याबद्दलची साधम्र्य ! ‘युवल हरारी’ या इस्नयली इतिहातज्ज्ञाच्या ‘सेपिअन्स’’ व ‘‘होमो डुऑस’’ या पुस्तकांमध्ये एआयच्यामुळे मानवी जीवनात कसे फरक पडणार आहेत त्याचे विलक्षण वर्णन केलेले तुम्ही वाचाल. आता असं वाटणारे एआयचे रोबोट हे दिसायला डेव्हिडसारखे कमी ताकदवान वाटतील; पण भविष्यकाळात मानवाला पुरून उरतील आणि ‘डेव्हिड-गोलायथ’ कथा परत एकदा लिहिली जाईल, अशी चिन्हे आहेत!
टेडवर जसं तुम्ही युवल हरारीचे भाष्य ऐकणं जरुरी आहे, तसंच तुम्ही सर केन रॉलिन्सन् या जगद्विख्यात शिक्षणतज्ज्ञाचेही विश्लेषण ऐकावेत, असं मी सुचवेन. ही ती 6ीु2्र3ी.
केन रॉबिन्सन यांच्या विश्लेषणात ते असं म्हणत आहेत की, आज जी मुलं-मुली ज्या पद्धती व अभ्यासक्रमासाठी शिकत आहेत; त्या प्रकारची कामं उरतील की नाही हे विवाद्य आहे. नुसते एवढेच नाही तर ज्या प्रकारची कामे भविष्यात उपलब्ध असतील/होतील, त्यासाठीचे शिक्षण कसे असावे याबद्दल या घडीला अनभिज्ञता आहे !
मग तुम्ही म्हणाल की, आम्ही, आताच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी करायचं तरी काय? तर पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो की, नावीन्यपूर्णता, नवतंत्रांचा वापर व निरंतर शिक्षण ही त्रयी तुम्हाला तारून नेईल अशा तत्त्वावर सर्व तज्ज्ञांच एकमत आहे !
या पुढच्या काळात कळीचा मुद्दा राहणार आहे तो छीं1ल्लुं्र’्र38 ! म्हणणे जलद गतीने बदलणार्‍या तंत्रज्ञानाला तेवढय़ाच पटकन् आत्मसात करण्याची क्षमता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात असणारा ‘‘21 अपेक्षित’’वाला साचा मोडीत निघतो आहे. थोडक्यात, आपण सर्वानी ‘‘21 अपेक्षित’’ ‘‘22 अनपेक्षित’’ची तयारी करायला हवी !
या पुढचं शिक्षण हे ‘‘लर्न-अनलर्न-रिलर्न म्हणजे’’ शिका - ते कालबाह्य बाजूला करा - आणि नवीन शिका’’ या पद्धतीवर आधारित असणार आहे. अहो हेच बघा ना- दहावीचा पॅटर्नसुद्धा ‘घोका आणि ओका’पासून येत्या मार्चपासून फारकत घेणार आहे !
एका मागील लेखात मी ‘व्हिडीओ रेझ्युमे’ हा नवा फंडा रुजतोय हे सांगितल्यावर अनेक   फोन आले की याबद्दल काही माहिती द्या. अर्थात अनेक वाचक याबद्दल जागरूकपणे विचारताहेत हे चांगलंच आहे. "www.themase.com" यावर तुम्हाला video resume ची माहिती कळेल.
भारतात खुद्द एआयबद्दलचे जॉब्जबद्दल बोलाल तर आपल्या देशाचा क्रमांक जगात पाचवा आहे आणि भारतातील रिपोर्ट आताच उपलब्ध झालाय.  खुद्द एआय तंत्र विकसित करण्यातही भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे हे लक्षात असू दे!!
Learn ability याु बरोबरच यापुढील काळात, तुम्हाला अजून काय महत्त्वाचं असेल तर ज्याला आपण बुद्धय़ांक म्हणतो त्याचा एवढा; किंबहुना जास्त महत्त्वपूर्ण असेल भावनांक मला वाटतं की हे समजायला फार अवघड नाही की एआय आणि robots  आपल्याला आयक्यूमध्ये हरवू शकतील; पण इक्यूमध्ये आपण दबंग आहोत!!
 काय, खरं की नाही?

 

Web Title: Learn capacity - If you do not have a this new skill, then you're out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.