डाव्या हाताला माऊस

By admin | Published: February 5, 2015 05:49 PM2015-02-05T17:49:36+5:302015-02-05T17:49:36+5:30

कॉम्प्युटर वापरणंही डावखुर्‍यांसाठी सोपं काम नाही. कॉम्प्युटर वापरताना कि-बोर्डच्या उजव्या बाजूस माऊस ठेवलेला असतो.

The left hand mouse | डाव्या हाताला माऊस

डाव्या हाताला माऊस

Next
>कॉम्प्युटर वापरणंही डावखुर्‍यांसाठी सोपं काम नाही.  कॉम्प्युटर वापरताना कि-बोर्डच्या उजव्या बाजूस माऊस ठेवलेला असतो. माऊसवरील डावं बटण लेफ्ट-क्लिकसाठी तर उजवे बटण राइट-क्लिकसाठी वापरले जातं. आपण जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर वापरतो तेव्हापासून ते याच पद्धतीनं वापरायचं असतं, असे समजलं जातं.
त्यामुळेच की काय,कि-बोर्डच्या डाव्या बाजूस नेऊन आपण माऊस वापरू शकतो याचा डावखुरे कधी विचारच करत नाही. माऊस डाव्या बाजूस ठेवून वापरल्यानंतर डावखुर्‍यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. *माऊस डाव्या बाजूस नेल्यानंतर लेफ्ट आणि राईट-क्लिकची बटणंही उलटी करावी लागतात. त्यासाठी विंडोज ७ मधील स्टार्ट पर्यायावर क्लिक करा. 
*त्यात माऊस असा सर्च द्या. आलेल्या रिझल्ट्समधील चेंज माऊस सेटिंग्ज वर क्लिक करा.   
* माऊस सेटिंग्ज ओपन होतील.
* त्यातील बटण या टॅबमधील पहिल्या पर्यायासमोरील (स्विच प्रायमरी अँड सेकंडरी बटण्स) चौकटीत चेकमार्क द्या. 
*आता ओकेवर क्लिक करा. हे क्लिक करताना राईट-क्लिकच्या बटणाने क्लिक करा, कारण राईट आणि लेफ्ट क्लिकची बटणं आता उलटी झालेली असतील. 
*आता माऊस की-बोर्डच्या डाव्या बाजूस ठेऊन डावखोरी मंडळी अधिक सफाईदारपणे कॉम्प्युटर वापरू शकतील. 

Web Title: The left hand mouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.