दक्षिणी मराठीत ‘ऑक्सिजन’ला आलेलं हे एक पत्र.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:38 PM2018-07-05T16:38:37+5:302018-07-05T16:40:07+5:30
दक्षिणी मराठी नेमकी कशी असते, कशी बोलतात हे सांगणारं हे दक्षिणी मराठीतच लिहिलेलं एका दोस्ताचं पत्र.
आनंदराव वसिष्टा, बंगळुरू
नमस्कार,
आजचं लोकमत पत्रांत तुमचे लेख वाचून संतोष झालं मला. वाचाला बेष होतं. हळूहळू दक्षिणी मराठी विषयीन, म्हणजे तंजावूर मराठी विषयीन महाराष्ट्राचं लोकांस कळून याच पाव्हून आनंद होतं. महाराष्ट्राच लोके अम्हाला विसरले तरीन, अम्ही अमचं मराठी विसरलों नाही. अपभ्रंश झालाहे तरीन सोडलों नाही.
तुम्ही सांगिटलं सार्ख फेसबुक अणी यू टय़ूब हे दोन माध्यम वाटे अम्ही अमचं भाषा दत्तन (जत्तन) ठिवाला अणी पुनरुद्धार कराला प्रय} करत आहों. यशवंत पिंगळे यांच यू टय़ूब प्रकल्प अता-अता आरंभ झालं अणी भरून लोकांकडून अभिनंदन पणीन आलाहे. मुख्यविणी फेसबुक मध्ये अम्चं दोन तीन वेगळं वेगळं प्रकल्प आहे.
तुम्हाला अण्खी एक विषय सांगतों अता. दक्षिणी मराठीच पहिल-पहिलच प्रकल्प मी 2009 एप्रिल महिनेंत आरंभ करलों. हे विना, मझं अण्खीन दोन ब्ळोग आहे. www.vishnughar.blogspot.com दक्षिणी मराठीच पहिलं-पहिलचं शब्दकोश तुम्हाला ह्यांत वाचाला मिळेल. हे ब्ळोगाच मुख्यत्व काय म्हणजे, दक्षिण देशाला आलं नंतर अमचं अत्तचं सामाजिक आचार-विचार ह्या विषयीन एक झळक तुम्हाला मिळेल.
आण्खीन एक सांगाच आहे. हे पत्र दक्षिणी मराठींत लिव्हाला एक कारण आहे. अमचं भाषा अणी महाराष्ट्राच मराठी हे दोनां मध्ये काय व्यत्यास आहे, हे दाखिवाला एक लहान उदाहरण तुमचं कडे असूनदे, एवढेच मझं उद्देश. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं म्हणूनहीं मला कळेलं !
नमस्कार.