जिंदगी और बादशाह
By admin | Published: October 16, 2014 07:49 PM2014-10-16T19:49:56+5:302014-10-16T19:49:56+5:30
काय घ्यायचं हेच ठरत नाहीये. त्यासाठीच तर या अंकात तुम्हाला खास मदत करतोय. यंदाच्या दिवाळीत एकदम खास, ट्रॅडिशनल आणि तरीही फॅशनेबल असं काय घ्यायचं याची एक एकदम अपडेटेड लिस्टच तुम्हाला या अंकात वाचायला मिळेल.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
ऑल सेट फॉर दिवाली.?
झालं शॉपिंग? काय म्हणता,
काय घ्यायचं हेच ठरत नाहीये. त्यासाठीच तर या अंकात तुम्हाला खास मदत करतोय.
यंदाच्या दिवाळीत एकदम खास, ट्रॅडिशनल आणि तरीही फॅशनेबल असं काय घ्यायचं याची एक एकदम अपडेटेड लिस्टच तुम्हाला या अंकात वाचायला मिळेल.
सो, जस्ट गो फॉर इट!एक मात्र खरं, आपण वर्षभर कितीही शॉपिंग करत असलो, चिवडा-शंकरपाळे खात असलो तरी दिवाळी ती दिवाळीच.
दिवाळीत नवीन कपडे घेतले नाहीत, मस्त फराळाचं हाणलं नाही आणि दोस्त-नातेवाईक मिळून जमवले नाही पत्त्याचे अड्डे आणि केला नाही कल्ला तर काय मज्जाच नाही. वर्षभराचा कल्ला एकट्या दिवाळीत घाऊक भावात करतोच आपण.? आणि त्याचकाळात येतात दिवाळी अंक? वाचता तुम्ही ते? तरुण मुलं काही वाचतच नाही, त्यांना वाचण्याची गोडीच माहिती नाही अशी नेहमीची वार्षिक चर्चा याकाळात होते.
पण ते काय खरं नाही. तरुण मुलं वाचतात, पण वाचण्यासारखं, डोक्यात भर घालण्यासारखं काहीतरी असेल तर वाचतात. तसाच खुराक तुम्हाला मिळावा म्हणून तर यंदाही ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक सज्ज झालाय.
त्यानिमित्त शाहरूख खानशी जी गप्पांची मैफल सजली, त्याची एक झलक या अंकात आहे. पूर्ण मुलाखत वाचायची, तर अंकच घ्यावा लागेल.
यापूर्वीची जी काही तुमच्या मनात इमेज असेल शाहरूखची ती पार पुसली जाईल आणि तुम्हाला एक नवीन ‘बादशाह’ भेटेल, जिंदगी का बादशहा हे नक्की. कारण असा शाहरूख आपल्याला कधी भेटलेलाच नाहीये, तो सिनेमात दिसतो तसा नाही, एरव्ही मुलाखतीत पाहतो तसा नाही. तो वेगळाच आहे. त्या खर्याखुर्या शाहरूखला भेटायला विसरू नका. कारण शाहरूख म्हणतो तसं, कुठलीही संधी सोडायची नाही, मागे हटायचं नाही.