लिंगो
By admin | Published: November 27, 2015 08:53 PM2015-11-27T20:53:48+5:302015-11-27T20:53:48+5:30
सेल्फी काढण्याचा क्रेझी ट्रेण्ड तर तरुणांमधे आहेच, त्यापाठोपाठ एक नवीन क्रेझ डोकं वर काढतेय,
Next
सेल्फी काढण्याचा
क्रेझी ट्रेण्ड तर तरुणांमधे आहेच,
त्यापाठोपाठ एक नवीन क्रेझ डोकं वर काढतेय,
तिचं नाव भाषा शिक्षण!
लिंगो
नव्या संधीसाठी तरुणांच्या जगात
नव्या भाषेला जागा
तुम्हाला किती भाषा येतात?
या प्रश्नाचं उत्तर आपण या ना त्या कारणानं अनेक फॉर्ममधे भरतो.
ठोकून देतो.
तीन भाषा येतात.
मराठी (म्हणजे खरंतर मातृभाषा), हिंदी (सिनेमावाली) आणि इंग्रजी (येते म्हणायचं अनेकांना नाम के वास्ते).
पण त्या खरंच येतात का हे आपलं आपण ताडूनही पाहत नाही!
पण आता काळ बदललाय.
देशातल्या शहरी तारुण्यामधे एक नवीनच ट्रेण्ड सुरू होतोय.
तो म्हणजे नवीन भाषा शिकण्याचा!
तसेही आपण सगळे बहुभाषिक आहोत. किमान तीन भाषा आपल्याकडे सगळ्यांनाच मोडक्यातोडक्या का होईना बोलता येतात, समजतात.
पण आता ‘चाल से’ जमाना राहिला नाही. नव्या मेक इन इंडियाच्या काळात जर ्रआपल्याला नवीन संधी हव्या असतील तर आपला ‘रीच’ वाढला पाहिजे हे अनेकांना कळतं. मग त्यावर उपाय काय तर बरीच तरुण मुलं आता एखादी नवीन भाषा शिकताहेत.
पूर्वी विदेशी भाषा म्हटली की फक्त फ्रेंच किंवा जर्मन शिकली जायची. आता तसं नाही. आता संस्कृत, अरबी, मॅँडरिन आणि जपानी यासोबत हायलेव्हल इंग्रजीही अनेकजण शिकत आहेत.
ही नवीन भाषा आपल्यासाठी संधीचं एक नवीन दालन खुलं करेल असा त्यामागचा विश्वास!
एका आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सव्र्हेनुसार भारतातल्या मेट्रो सिटीत राहणा:या तरुण मुलामुलींमधे सगळ्यात क्रेझी ट्रेण्ड कुठला असेल तर सेल्फी काढणं आणि त्यापाठोपाठ नवीन भाषा शिकणं!
संधीसाठी आणि पैशासाठी का होईना भाषांचं वेड वाढतंय ही चांगली गोष्ट!
त्या भाषेतून नवीन संस्कृतीही ही मुलं शिकतील कधी ना कधी, अशी आशा ठेवायलाही म्हणूनच जागा आहे.
- मृण्मयी सावंत