बाटलीतलं भूत जगण्यावर

By admin | Published: August 6, 2015 05:23 PM2015-08-06T17:23:52+5:302015-08-06T17:23:52+5:30

शिकल्यासवरल्या माणसांना वाटतं, मला सगळं कळतं.व्यसन कसं सोडायचं हे पण कळतं, मग मी कशाला कुणाचं ऐकू? हा त्यांचा अहंकारच पुन्हा पुन्हा त्यांना दारूच्या बाटलीत नेऊन बसवतो!

Living the bottled ghost | बाटलीतलं भूत जगण्यावर

बाटलीतलं भूत जगण्यावर

Next
व्यसनाचं ओझं उतरवायचं तर दुस:याच्या मदतीचा हात घ्यायला लाजता कशाला?
 
 
शिकल्या-सवरल्या माणसांना कळतं मग वळत का नाही?
मुक्तांगणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर यांनी एका लेखात लिहिलेला हा उल्लेख वाचनात आला. त्या नुकत्याच एम.ए.ला मानसशास्त्रत सुवर्णपदक मिळवून प्रत्यक्ष कामासाठी मुक्तांगणमध्ये येऊ लागल्या होत्या. त्या काळात रु ग्णमित्रंचा घरच्यांना भेटायचा दिवस होता. एका सुशिक्षित रु ग्णमित्रला भेटायला त्याची पत्नी आली होती. तिच्याबरोबर तिची गोड दोन मुलंसुद्धा आली होती. त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग ऐकून त्या खिन्न झाल्या. त्यांच्यासमोर एक प्रश्न भुंगा घालू लागला. शिकला सवरलेला हा तरुण मित्र आपल्या पत्नी आणि लहान मुलांकडे पाहून तरी नशा का थांबवत नसेल?
दुस:या दिवशी हा प्रश्न त्यांनी आपल्या आईला म्हणजेच मुक्तांगणच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट यांना विचारला. त्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. ‘यालाच आजार म्हणतात’. या तीन शब्दांनी मुक्ता मॅडमचा रु ग्णमित्रकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णपणो बदलला. उपचारांसाठी येणारी व्यक्ती ही व्यसनाच्या आजाराने पीडित आहे आणि त्या आजाराचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे नशा.   त्याच्या जीवनातील सर्वात पहिले प्राधान्य या नशेला असते. प्रेम, जबाबदारी, वस्तुस्थिती आणि आपले आरोग्य याचा विचार व्यसनी व्यक्ती मनात येऊनसुद्धा प्रत्यक्ष वागण्यात उतरवू शकत नाही.
व्यक्ती आजारी आहे आणि तो बरा होईपर्यंत त्याला उपचार देत राहणं हे मुक्तांगणचे पायाभूत तत्त्वज्ञान मानले गेले आहे. आणि उपचार करताना त्याच्या वर्तनापासून सुरु वात करून त्याचे व्यसनाकडे नेणारे विचार बदलण्याचा प्रयत्न करणो आणि त्याच्या भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणो ही मानसोपचाराची दिशा मुक्तांगणने स्वीकारली आहे. त्याशिवाय त्याचे शारीरिक आजार आणि मानसिक आजार याकरता कमीतकमी औषधं वापरली जातात.
हे सगळे मला पटत होते परंतु माङया काही शंकांना मला हवे तसे उत्तर मिळत नव्हते. कदाचित मी जरुरीपेक्षा जास्त चौकस आहे म्हणून असे असेल. मागे धावले सर म्हणाले होते त्याची आठवण झाली. ते म्हणाले होते- साधारण गावातून आलेली, कमी शिकलेली माणसे आम्ही सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि पहिल्याच अॅडमिशननंतर लगेचच व्यसनमुक्त राहतात. याउलट रु ग्णमित्र जितका जास्त शिकलेला तितके त्याचे शिकून घेण्याचे प्रमाण कमी. मी इतका शिकलेला, माङयासमोर बसलेला पण एकेकाळी दारू पीत होताच. त्यात शिक्षणही बेतास बात. मग मी त्याचं म्हणणं का ऐकून घेऊ? असा अहंकार आणि वस्तुस्थिती नाकारण्याची वृत्ती त्याच्या रिकव्हरीच्या आड येते.
मला त्या उच्चशिक्षित मित्रचे प्रश्न सयुक्तिक वाटले. पण धावलेसरांनी लगेच सांगितले की आम्ही त्याला उलटा प्रश्न विचारतो- ‘‘अरे मित्र, तुझं शिक्षण, तुझी बौद्धिक ङोप, तू करीत असलेले विशेष काम, तुङया क्षेत्रत झालेला उत्कर्ष हे सगळे आम्हाला मान्यच आहे. प्रश्न इतकाच आहे की तुङयापेक्षा कमी शिकलेल्या, तङयापेक्षा तुङया मते हलकं काम करणा:या तुङया समुपदेशकाला एक गोष्ट बावीस र्वष कळली आहे की व्यसन केलं तर मलाच काय माङया कुटुंबीयांना त्रस होईल. आणि तो व्यसनमुक्त राहिला आहे. इतकी साधी गोष्ट. त्यात तू किती शिकला याला महत्त्व नसून समोरचा माणूस व्यसनमुक्त जीवन कसे जगावे हे प्रत्यक्ष दाखवून देण्याला आहे. काय पटतंय का माङो म्हणणो?’’
पुढे त्याला आम्ही हेही सांगतो की, कुठल्याही एका माणसाला सर्वच क्षेत्रतलं कळतं असं नसतं. तुला चप्पल दुरु स्त करता येते? तुला टायर पंक्चर झालं तर ते काढता येतं? तू इंजिनिअर आहेस तोही विशिष्ट शाखेतला. दुस:या ज्ञानशाखेत तू कितपत पारंगत आहेस? लक्षात घे, आपली पदवी ही फक्त जगण्यातला एक मानदंड असतो. तो तू मिळवलास हे चांगले आहे. पण तुङयापेक्षा अधिक बुद्धिवान माणसे ज्यांना त्यांच्या क्षेत्रतलं ज्ञान तुङयापेक्षा अधिक आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रतले मला काहीच कळत नाही ही वस्तुस्थिती तेव्हा तू मान्य करशील. तुझा समुपदेशकाकडे व्यसनमुक्त होण्याचा आणि सलग बावीस वर्षे व्यसनमुक्त राहण्याचे अनुभवसिद्ध ज्ञान आहे. ते आहे का तुङयाकडे? नाही ना! ते जर असते तर इथे दाखल होण्याची वेळच आली नसती.
आणि तो त्यावेळी तरी निरु त्तर होतो. आणि आपल्या समुपदेशकाचे सांगणो कान किलकिले करून ऐकू लागतो. मुक्तांगणच्या उपचारातील हा भाग महत्त्वाचा आहे. जी गोष्ट आपल्याला कळत नाही ती ज्याला कळते अशा माणसांकडून नम्रपणो जिज्ञासेने शिकली तर परिवर्तन होणो सोपे असते. परंतु अहंकार ही अशी गोष्ट आहे की ती नेहमीच प्रामाणिकपणाच्या आणि नम्र भावनेच्या आड येते. 
पण समजा एखाद्या माणसाला तरीही आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो आणि ते आपणच घडवायचे असते अशी भूमिका घेत असेल तर? धवलेसरांनी क्षणार्धात सांगितले, ‘‘मला मान्य आहे की तुङया जीवनाचे शिल्प तू घडवत आहेस. पण ते करता करता शिल्पच बिघडले तर? त्याला ते दुरु स्त करण्यासाठी अपार मेहनत करावी लागेल. आणि त्याचवेळी दारू नावाचा पदार्थ पोटात घालत राहिलास तर न होईल शिल्प साकार आणि शिल्पकार ते करण्यास उपयुक्त ठरणार. अशावेळी तुङयाकडे दोन पर्याय राहतात. तुङया जीवनाचे शिल्प तुङया अपेक्षेनुसार चांगले होण्यासाठी तुङयापेक्षा जास्त अनुभवी शिल्पकाराची मदत घेणं किंवा शिल्प आणि स्वत: दोन्ही नष्ट करत जाणं. निवड तुझी आहे. व्यसनी राहायचे का आमची मदत घेऊन पुढे जायचे?
अशी मदत योग्यवेळी घेऊन स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला तरच व्यसनाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल!
- मनोज कौशिक
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो

 

Web Title: Living the bottled ghost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.