लॉकडाऊन हायलायटर पण ते करताना काळजी घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:47 PM2020-07-16T17:47:56+5:302020-07-16T17:50:50+5:30
लॉकडाऊन काळात जगण्यात रंग भरायचे म्हणून केस हायलाइट करण्याचा ट्रेण्ड.
- निकिता बॅनर्जी
पार्लर हा विषय अनेकांसाठी सध्या बाद आहेत. आता पार्लर सुरूहोत असली तरी अजूनही तिथं जाणं अनेकांना (तरुण-तरुणी दोघे) असुरक्षित वाटू शकतं. लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी केस कापून झाले. अगदी टक्कलही केलं अनेकांनी. कुणीकुणी तर केसांचा बुचडा या हेअरस्टाइलपलीकडे गेलंच नाही. मात्र काही हौशींनी एक नवीन ट्रेण्ड आणला आहे. त्याचं नाव लॉकडाऊन हायलायटर.
घरच्या घरी आपल्या केसांची फक्त एकबट कलर करणं, किंवा खाली टोकं फक्त कलर करणं, किंवा अगदी कानावर रूळेल इतपतच एक बट कलर करणं असे आयुष्यात रंग भरणो सुरू आहे.
तर त्यापैकी काही ट्रेण्ड म्हणून तुम्ही करून पाहणारच असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.
1) हायलाइट करताना सगळ्यात पहिले हे ठरवायला हवं की, आपण जी बट हायलाइट करणार ती आपल्याला कॅरी करता येणार आहे का? ते ठरलं की मग आपला आत्मविश्वास नंतर रंगवलेले केस पाहून डळमळणार नाही.
2) लाल-हिरव्या रंगात हायलाइट करतात; पण तसा अॅटिटय़ूड पाहिजे, नाहीतर मग ते बावळंही दिसू शकतं.
3) पहिल्यांदाच हायलाइट करत असाल तर चॉकलेटी, तपकिरी, ब्राऊन या शेड्स वापरणं उत्तम.
4) हौसच करायची तर सोबर कलरची एक बट रंगवा. तीही कानाच्या जवळ. ते आवडलं तर मग अगदी दिसेल अशी बट किंवा केसांची टोकं किंवा एक अख्खा पट्टा रंगवा.
5) हायलायटरचे फोटो सोशल मीडियात टाकल्यावर कमी लाइक्स आले तर आले, हिरमुसू नका, आपण आपल्यासाठी रंग लावतोय, इतरांसाठी नाही.