लोकमत ब्लॉग्ज : लिहा तुमच्या मनातलं आणि पोहचा जगभरात
By Admin | Published: March 4, 2016 11:57 AM2016-03-04T11:57:15+5:302016-03-04T11:57:15+5:30
ऑनलाइन जगात दाखल होण्याचं एक विशेष आमंत्रण. आणि एक नवीकोरी डिजिटल संधीही!
>कधी कधी वाटतं लिहावं आपण,
मनात साचलेलं, डाचणारं, सलणारं
मांडावं कुठंतरी.
कधी वाटतं, किती सुंदर, छोटुसे, इवलेसे अनुभव येतात दिवसभरात, जगण्याचं बळ देतात, हे जगणं सुंदर आहे असा विश्वास वाटतो काही माणसं आणि घटनांकडे पाहून, ती घटना, ते समाजचित्र, व्यक्तिचित्र काही क्षण दिसतं; पण ते क्षण पाहूनच जगण्याची ओढ वाढते आणि चांगुलपणावरचा विश्वासही!
कधी वाटतं, कसली राष्ट्रीय विषयांवरची चर्चा करताहेत मीडियात नि प्राइम टाइममध्ये, त्या घटनांमुळे आमच्या आयुष्यात प्रत्यक्ष काय बदलणार आहे हे कुठं माहिती असतं कुणाला?
काही धोरणांमुळे आयुष्यच बदलतं, झळ लागते जगण्याला; पण ‘सामान्य’ माणसाला काय वाटतं हे कुठं येतं कधी या प्राइम टाइम चर्चामध्ये?
वाटतं डायरी लिहावी; पण डायरी लिहिणं तसं खाजगी, अगदी व्यक्तिगत. आपल्याला तर आता आपले अनुभव शेअर करण्याची, आपल्याला जे सुचलंय, जे भिडलंय ते कुणाला तरी सांगण्याची अत्यंत गरज वाटते आहे.
मग त्यावर उपाय म्हणून आपण फेसबुकवर आपल्या पोस्ट टाकतो. व्हॉट्सअॅपवर लिहून मित्रमैत्रिणींना पाठवतो. कधी त्या चर्चामध्ये वाद घालतो, तासन्तास चर्चा करतो.
मात्र तरीही रुखरुख राहतेच की, आपल्याला जे सांगायचं होतं ते आपल्या मित्र-मैत्रिणींच्या वतरुळापलीकडे पोहचलंच नाही.
मग यावर इलाज काय?
- ब्लॉग!
जगभरात सध्या अनेक लोक तेच करत आहेत.
अगदी मोठे जानेमाने पत्रकार-लेखकसुद्धा ब्लॉग लिहून आपली मतं ठामपणो मांडत आहेत. या माध्यमातून अनेक लोकांर्पयत पोहचत आहेत. आणि काही ब्लॉग तर इतके गाजताहेत की, लोक हे ब्लॉग वाचण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत.
अर्थात हा फार पुढचा प्रवास झाला, पण निदान ब्लॉग लिहून डिजिटल जगात आपली ‘पहचान’ बनवायला काय हरकत आहे?
आता तुम्ही विचाराल ते जमणार कसं?
आम्ही कुठं ब्लॉग लिहायचा?
आणि तो लिहिला तरी वाचणार कोण?
त्याचं उत्तर आहे ‘लोकमत’कडे!
लोकमत ब्लॉग,
तुमच्यासाठी खास
ऑनलाइन जगात व्यक्त होण्याची एक खास संधी
या ऑनलाइन कट्टय़ावर तुम्हाला तुमची मतं तर मांडता येतीलच; पण तुम्हाला कळकळून जे वाटतं ते ‘लोकमत’च्या जगभर पसरलेल्या करोडो वाचकांर्पयत पोहचवता येईल.
मोठमोठे संपादक, पत्रकार, लेखक जिथं ब्लॉग लिहितात तिथं तुम्हाला तुमचा ब्लॉग सादर करण्याची संधी मिळू शकते.
आपल्या अवतीभोवतीच्या जगण्याविषयी, आपल्या स्वत:च्या अनुभवांविषयी, बदलत्या शहरांविषयी, मोठय़ा होणा:या ‘शहरी’ खेडय़ांविषयी, शैक्षणिक प्रश्नांविषयी, लहानमोठय़ा कलांच्या संवर्धनाविषयी आणि अर्थातच राजकारणाविषयीही तुम्हाला लिहिता येईल. अट एकच, मनात असेल ते प्रांजळपणो लिहिता यायला हवं..
ब्लॉग लिहायचा कसा?
1) ‘लोकमत’ ऑनलाइनसाठी ब्लॉग पाठवताना तुम्ही संगणकावरऑपरेट करून पाठवू शकता. मात्र तसं पाठवताना वर्ड आणि पीडीएफ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये फाईल पाठवा. सोबत त्यावर तुमचं नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आणि अगदी थोडक्यात स्वत:विषयी माहिती पाठवा. सोबत छोटासा फोटोही पाठवा.
2) तुम्ही आधी कुठल्या दैनिकात किंवा मासिकात किंवा अन्य कुठल्या ब्लॉगवर लिहिलेला लेख यासाठी पाठवू नये. ताजं, स्वत: लिहिलेलं लेखनच ब्लॉगसाठी पाठवावं.
3) व्हॉट्सअॅप, फेसबुकवरचे फॉरवर्डही आपल्या नावानं ब्लॉग म्हणून पाठवू नयेत.
अत्यंत महत्त्वाचं आणि बंधनकारक
1) तुमचा ब्लॉग निवडला गेल्यास लोकमत ऑनलाइनतर्फे तुमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला जाईल.
2) तुमच्या लेखनावर आवश्यक वाटल्यास संपादकीय संस्कार केले जातील.
3) निवडीचा आणि प्रसिद्धीचा अंतिम निर्णय ‘लोकमत’च्या ऑनलाइन टीमचाच असेल.
पाठवायचं कधी? कुठं? कुणाला?
तुम्ही तुमचं लेखन onlinelokmat@gmail.com
या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकता.
लेखन फक्त ई-मेलच करा. पोस्टानं पाठवू नका.
‘ऑक्सिजन’ला
ई-मेलनं लेख पाठवताय?
‘ऑक्सिजन’ला अनेक वाचक मित्रमैत्रिणी
आता ई-मेल करतात.
फोन करून विचारतात की, तुमचा व्हॉट्सअॅप नंबर असेल तर द्या, डायरेक्ट व्हॉट्सअॅपच करतो.
लहानशा गावातही इंटरनेट पोहचत असल्यानं आता पत्रंबित्रं पाठवण्यापेक्षा सरळ मेल केलेलं बरं असं अनेकांना वाटतं.
मात्र या उत्साहाच्या भरात अनेकजण काही ‘तांत्रिक’ गडबडी करतात असं या सगळ्या इमेल्स वाचताना आमच्या लक्षात येत आहे.
त्यामुळेच ई-मेल करताना या काही गोष्टींची काळजी घ्या..
1) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मजकूर शक्यतो युनिकोड फॉण्टमध्येच पाठवा.
2) ते शक्य नसेल तर हरकत नाही, फक्त ज्या फॉण्टमध्ये आपण मजकूर टाइप केला आहे, त्याची ओपन फाईल (म्हणजे वर्डची फाईल) पाठवा मात्र सोबत त्याची पीडीएफ फाईलही पाठवा.
3) पीडीएफ फाईल नसेल आणि फॉण्टही कन्व्हर्ट होत नसेल तर अनेक लेख वाचताच येत नाहीत, म्हणून ही काळजी घ्यायला हवी. लेख पाठवताना वर्ड आणि पीडीएफ अशा दोन्ही फाईल्स पाठवणं आवश्यक.
4) ई-मेलमध्ये विषय लिहिताना आपला लेख नेमका कशाविषयी आहे, ते अगदी थोडक्यात ‘सबजेक्ट’मध्ये लिहावं.
5) हातानं लिहिलेला मजकूर स्कॅन करूनही पाठवता येऊ शकतो. मात्र हा मजकूर जेपीजी किंवा पीडीएफ या फॉरमॅटमध्ये पाठवावा. अनेक पानं असल्यास सगळ्या कॉपीज झीप करूनही पाठवता येऊ शकतात.
6) संगणकावर मराठी लिहिता येत नसेल तर रोमन लिपीत मराठी लिहून पाठवू नका. ((mhanaje he asa marathit lihu naka) त्याऐवजी सरळ हातानं लिहून, फोटो काढून मेल करणं सोपं.
7) ही एवढी काळजी घेतली तरी तुमचा मजकूर आमच्यार्पयत पोहचून तो लवकरात लवकर वाचणं अधिक सोपं होऊ शकेल.
धन्यवाद
-ऑक्सिजन टीम
oxygen @lokmat.com