लव्ह स्टोरीत व्हायरस

By admin | Published: February 11, 2016 08:01 PM2016-02-11T20:01:13+5:302016-02-11T20:01:13+5:30

जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे तर आजही प्रेमात अडसर आहेतच. आणि ते इतके भीषण आहेत की, त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत.

Love store virus | लव्ह स्टोरीत व्हायरस

लव्ह स्टोरीत व्हायरस

Next
कुठून प्रेमात पडलो असं वाटावं 
इतकी भांडणं सतत होतात
कारण प्रेमाला छळणारे 
आणि त्यासाठी टपून बसलेले
काही शत्रू आपल्याच पिढीनं
जन्माला घातले आहेत.
ते आपल्याला घेरताहेत 
आणि आपल्या प्रेमावर
मेणचट काजळी धरताहेत
हे अनेकांच्या लक्षात येतं 
तोवर त्यांचा ब्रेकअप 
होऊन गेलेला असतो.
ते हे प्यार के नए दुश्मन
 
प्यार के दुश्मन हजार.
जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे तर आजही प्रेमात अडसर आहेतच. आणि ते इतके भीषण आहेत की, त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत.
आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको म्हणून किती मुलंमुली सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात, हे आपल्या समाजातलं वास्तव आहेच.
मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही, तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही.
अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात, कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत.
ते आपल्याला घेरताहेत आणि आपल्या प्रेमावर मेणचट काजळी धरताहेत हे अनेकांच्या लक्षात येतं तोवर त्यांचा ब्रेकअप होऊन गेलेला असतो.
सध्या तरुण मुलांना घेरणारे हे प्यार के नए दुश्मन.
नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.
अॅण्टी व्हायरस ज्यानं त्यानं आपापल्या पर्सनल लाइफमध्ये स्वत: इन्स्टॉल करावेत.
पण निदान हे व्हायरस कोणते हे तरी लक्षात ठेवलेलं बरं !
 
1) वेळ आहे कुठं ?
प्रेमाबिमात पडतात पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. कुणी दोन लांबच्या शहरात, देशातही. फोनवर बोललं की भांडणच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यामुळे वेळ नाही, एकमेकांना समजून घेता येत नाही. त्यातून गैरसमज वाढत जातात.
 
2) पझेसिव्हनेस
प्रेमात पङोसिव्हनेस असतोच. तो येतोच. पण किती यावा. आपल्यापलीकडे त्यानं/तिनं कुणा मित्रमैत्रिणीशी बोलूच नये. कुणाबरोबर बाहेर फिरायला जाऊ नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात.
 
3) सोशल मीडिया
काहीही. सोशल मीडिया कसा काय शत्रू असू शकतो? पण तो आहे खरं. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं या सगळ्यातून गैरसमज वाढू लागतात. आणि परिणाम, भांडण-वाद-वैताग.
 
4) ओव्हर शेअरिंग
तुम दिल मै धडकन, दो जिस्म एक जान वगैरे फिल्मी बोलणं सोपं असलं, तरी प्रत्यक्षात असं सतत एकमेकांच्या जगण्याचा भाग होणं हे जरा जास्तच छळकुटं होऊ लागलं आहे. त्यातून सतत शेअरिंग. खाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की नात्यातला सरप्राईज एलिमेण्टच संपून चाललाय. आणि ओव्हर शेअरिंग हीच समस्या बनते आहे.
 
5) टाइमपास
अनेक जणांना प्रेम हा एक खेळ वाटतो. कमिटमेण्ट करायची नसते. त्यातून मग त्या नात्याला स्थैर्य येत नाही. आणि हा टाइमपास किमान एकाच्या तरी प्रेमाचा खेळखंडोबा करतो.
 
6) करिअरची स्पर्धा
आता समवयीन मुलंमुली, त्यांच्या महत्त्वाकांक्षाही सारख्याच. करिअर एकाचवेळी सुरू होतं. अनेक जणांत तर त्यातून नकळत स्पर्धाही सुरू होते. त्यातून कुणी कुणासाठी कॉम्प्रमाईज करायचं यावरुन वाद होतो. आणि मग ही स्पर्धा प्रेमाचा बळी घेते.
 
7) स्पेसची मागणी
प्रेमात अखंड तर बुडायचं, पूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम पण हवं, मात्र त्यात स्पेसही हवी असं त्रंगडं सध्या होऊन बसलं आहे. त्यामुळे एकीकडे मुलींना प्रियकरानं आपले लाडकोड करावेत, आपल्याला स्पेशल फील करवावं असं वाटतं. दुसरीकडे, त्यानं आपल्या इंडिपेडण्ट असल्याचाही मान राखत योग्य स्पेस द्यावी असंही वाटतं. नेमका हा समतोल मुलांना साधता येत नाही आणि लव्ह स्टोरीत दी एण्ड येतो.
 
 
- अजिंक्य सोनारीकर

Web Title: Love store virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.