लाइक्स-लव्हचा दिवाळी शो ऑफ तुमच्या आनंदाचा विचका करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:54 AM2020-11-12T07:54:36+5:302020-11-12T07:55:01+5:30

आता तुम्ही उत्तर ठरवा की, तुम्हाला खरोखर आनंदी व्हायचं आहे की फक्त आनंदाचा शो ऑफ करायचा आहे.

Like-Love's Diwali show off will make you upset! | लाइक्स-लव्हचा दिवाळी शो ऑफ तुमच्या आनंदाचा विचका करणार!

लाइक्स-लव्हचा दिवाळी शो ऑफ तुमच्या आनंदाचा विचका करणार!

Next

-प्रतिनिधी 

झाली दिवाळी शॉपिंग? ते करतानाच डोक्यात होतं का तुमच्या यंदा कोणत्या पोजमध्ये फोटो काढणार? इन्स्टावर कोणता फोटो टाकणार ? फेसबुकवर कोणता? फ्रेण्ड्सच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर कोणता? डीपी कोणत्या फोटोचा ठेवणार? स्टेटसला कोणता फोटो टाकणार?  या प्रश्नांची उत्तरं जर दिवाळीपूर्वीच तुमच्या डोक्यात आलेली असतील, तर तुम्ही दिवाळी सेलिब्रेशनचा नाही तर फक्त शो ऑफचाच विचार करता आहात.

आता तुम्ही उत्तर ठरवा की, तुम्हाला खरोखर आनंदी व्हायचं आहे की फक्त आनंदाचा शो ऑफ करायचा आहे.

सोशल मीडिया अभ्यासक टीकाकार म्हणतात की, आनंद साजरा करण्यापेक्षा आपण आनंदी आहोत हे दाखवण्यातच हल्ली अनेकांचा जास्त वेळ जातो. आणि मग अपेक्षित लाइक्स, कमेण्ट‌्सपेक्षा आपल्यापेक्षा दुसऱ्याला जर जास्त लाइक्स-लव्ह-कमेण्ट्स आल्या, कुणीतरी खासने खास कौतुक कमेण्ट केली तर इकडे जळून कोळसा व्हायला होतं, आणि आनंदाचा विचका होतो.

या दिवाळीत असा आनंदाचा विचका, जमलं तर टाळाच.. हॅपी दिवाळी

Web Title: Like-Love's Diwali show off will make you upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.