तुमच्या त्वचेला प्रेमळ साथ
By admin | Published: December 25, 2014 07:32 PM2014-12-25T19:32:16+5:302014-12-25T19:32:16+5:30
एक अगदी सहज साधा प्रश्न. तुम्ही रोज मॉयश्चरायझर लावता का? अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना हातापायाला मॉयश्चरायझर लावायला हवं
Next
मोहिनी घारपुरे
एक अगदी सहज साधा प्रश्न. तुम्ही रोज मॉयश्चरायझर लावता का? अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना हातापायाला मॉयश्चरायझर लावायला हवं, हे अनेकींना माहितीही नसतं.
आणि ज्यांना माहिती असतं, त्यातल्या अनेकींना आपण शेवटचं कधी हाताला मॉयश्चरायझर लावलं हे आठवतदेखील नाही.
वेळच मिळत नाही, असं एक कारण आपण सरकसकट पुढं करतो पण ते खरं नाही हे आपलं आपल्यालाही माहिती असतंच.
त्यामुळे स्वत:ची काळजी घेत, स्वत:च्या त्वचेचं भरणपोषण करत, तिला तजेला आणि ओलावा देत आपण त्वचेला अधिकाधिक काळ तरुण ठेवू शकतो.
त्यासाठी मात्र आपल्याला माहितीच हवं की मॉयश्चरायझर कधी आणि कुठं लावायचं!
थंडीत कोरडी होत जाणारी त्वचा, तिचा रखरखाट, त्यातून दिसणारा भकास रंग हे सारं टाळायचं असेल तर तुमच्या त्वचेवरुन हवाच मॉयश्चरायझरचा ओलावा, संरक्षण देणारा तुमचाच मायेचा हात फिरायलाच हवा.
सुंदर पाऊलखुणांसाठी.
आपल्या पायांची आपण कितीशी काळजी घेतो, त्यातही पाऊलांची!
म्हणायला लक्ष्मीची पाऊलं वगैरे अशा उपमा दिल्या जातात बायकांच्या पावलांना!
पण एरव्ही ती पाऊलं बिचारी नुस्ती धावत राहतात. त्या पाऊलांना मॉयश्चरायझर नियमित लावायला हवं. विशेषत: घोटय़ाजवळ, तिथल्या हाडाजवळ त्वचा कोरडी होते. काळी-हिरवट अगदी रखरखीत होते. थंडीत तर अनेकजणींना वाताचाही त्रस होतो.
अशावेळी पाय/पाऊलं कोमट पाण्यात घालून ठेवावेत. आणि कोरडे करुन त्यांना मॉयश्चरायझर लावावं. पाऊलं कोमल सुंदर दिसायला त्यानं मदत होते.
अंघोळीनंतर मॉयश्चरायझर
सकाळची घाई, त्यात गडबडीत कसंबसं अंगावर पाणी घ्यायचं हाच अनेकींचा दिनक्रम. ब:याच जणी तर थंडी खूप वाजते म्हणून खूप कढत पाणी अंगावर घेतात. तसं करू नये, फार गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेला अपाय होतो. त्यापेक्षा कोमट पाण्यानं आंघोळ करुन लगेच आपल्या त्वचेला साजेसं मॉयश्चरायझर संपूर्ण शरीराला लावलं तर त्वचेला मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो.
मॉयश्चरायझर कुठं लावावं?
अनेकजणी चेह:यालाच क्रीम चोपडतात. मात्र थंडीत तरी तसं करू नये. हात-पाय, घोटे, ढोपरं, गुडघे, कोपरं, मान, पाठ या सा:या ठिकाणी त्वचा जास्त ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागांना आवजरून मॉयश्चरायझर नियमित लावायलाच हवं.