गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग’- हे पुस्तक वाचलंय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:49 PM2018-10-04T16:49:25+5:302018-10-04T16:50:43+5:30
गांधीजींचे विचार समजून घ्यायचे तर वाचायलाच हवं असं पुस्तक
- प्रज्ञा शिदोरे
तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल; पण गांधींना स्वतर्ला अजिबात आत्मचरित्न वगैरे लिहायचं नव्हतं. त्यांच्या मते आत्मचरित्नात स्वतर्बद्दलच्या खोटय़ा कल्पना जगापुढे मांडल्या जातात. अशा स्व-स्तुतीमुळे व्यक्तिपूजा वाढते. गांधी स्वतर् व्यक्तिपूजेच्या पूर्ण विरोधात होते; पण दुर्दैव असं की ते स्वतर्च या व्यक्तिपूजेचे बळी पडले. असो.
तर आपण वाचायलाच हवं असं एक त्यांचं पुस्तक म्हणजे ‘माझे सत्याचे प्रयोग’. गांधींजींनी ‘द स्टोरी ऑफ माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रुथ’ हे पुस्तकही एका दमात, एक पुस्तक लिहायचं म्हणून नाही लिहिलं, तर 1925 ते 29 या चार वर्षात दर आठवडय़ाला एक भाग असं लिहिलं. ते तेव्हा ‘नवजीवन’ नावाच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम बघायचे. तर या ‘नवजीवन’मध्ये एका कॉलमच्या स्वरूपात प्रकाशित केलं. याचंच इंग्रजी रूपांतर (भाषांतर नव्हे तर रूपांतर. गांधींच्या मते भाषांतरामध्ये अनेक गोष्टी शब्दांच्या अभावामुळे नीट व्यक्त होऊ शकत नाहीत, तेव्हा भाषा बदलली की संस्कृतीचे संदर्भ बदलतात, म्हणून त्यांनी प्रत्यक्ष शब्दशर् रूपांतर न करता, हे पुस्तक मूळ गुजराथी भाषेत लिहून मग रूपांतरित केलं.) ‘यंग इंडिया’ मध्येही प्रकाशित झालं.
हे पुस्तक अतिशय खरं आहे. त्यामध्ये कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. गांधी या पुस्तकातून त्यांचं यश आणि अपयश दोन्हीही वाचकांसमोर ठेवतात. अर्थातच पुस्तकामध्ये त्यांचा दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाचा भाग मोठा आहे. तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध, मुलं वाढवताना झालेल्या चुका हे त्यांची स्पष्टपणे काबूल केलं आहे.
ज्यांना गांधी हा विचार समजून घ्यायचा असेल आणि त्या विचारामागची व्यक्ती समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.
याबरोबरच तुम्हाला यूटय़ूबवर 1982 साली रिचर्ड अटेनबरो यांचा ऑस्कर विजेता चित्नपट ‘गांधी’ बघायला मिळेल. हा मूळ इंग्रजी चित्नपट हिंदीत अनुवादित केलेला आहे.