झोप, व्यायाम आणि आहार यांचं गणित सांभाळा!

By admin | Published: December 11, 2015 02:15 PM2015-12-11T14:15:35+5:302015-12-11T14:15:35+5:30

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढणं, चेह:यावर पिंपल्स येणं ही सुरुवातीची लक्षणं. केस गळणं, केसात कोंडा, वजन वाढणं, त्वचा काळवंडणं हे त्यापाठोपाठ होतं. हे सारं सुरू झालं की आपण जरा बघायला हवं की, नेमकी काय गडबड होते आहे ते.

Maintain the math of sleep, exercise and diet! | झोप, व्यायाम आणि आहार यांचं गणित सांभाळा!

झोप, व्यायाम आणि आहार यांचं गणित सांभाळा!

Next
>डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढणं, चेह:यावर पिंपल्स येणं ही सुरुवातीची लक्षणं. केस गळणं, केसात कोंडा, वजन वाढणं, त्वचा काळवंडणं हे त्यापाठोपाठ होतं. हे सारं सुरू झालं की आपण जरा बघायला हवं की, नेमकी काय गडबड होते आहे ते.
एखादी गोष्ट करण्यास आपल्याला वेळ लागतोय किंवा ती जमतच नाहीये आणि जमली तरी तिचा मोबदला हवा तसा मिळत नाही, असं वाटतंय का? तसं वाटू लागल्यानं मग अनेकजण हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात. डिप्रेशनचा हल्लाही अगदी सायलेंट होतो. मूड नसणं, फक्त विचार करणं आणि  मग काहीच न करता नुसता विचार करणं असंही काही जणांचं होतं. काहीजण नुस्ते खात राहतात, परिणामी वजन वाढू लागतं.
दुसरीकडे कामाच्या ताणात स्वत:कडे, आहाराकडे दुर्लक्ष होतं नि शरीरातल्या पचनक्रियेपासून सगळ्याच  संस्था आपल्याशी असहकार पुकारू लागतात.
आणि मग आपल्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. 
 
त्वचेवर दिसणारे हे परिणाम टाळायचे कसे?
डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढण्यामागचं कारण न मिळालेली पुरेशी झोप.  कुठल्याही आजारात पूर्ण विश्रंती, झोप ही महत्त्वाचीच असते. त्यामुळे पुरेशा झोपेला पर्याय नाही. व्यायामामुळेही मन, शरीर ताजंतवानं राहतं. म्हणून व्यायाम करून शरीरावरचा अनावश्यक ताण काढून टाकायला हवा. त्वचेला घाम आला पाहिजे. आहाराकडे तर लक्ष द्यायलाचं हवं. आहारात अँटी ऑक्सिडंट्स फळांचा, विविध भाज्यांचा समावेश करावा. केळींचे सेवन उपयुक्त ठरू शकते. केळं खाल्ल्याने मेंदूतील सेंराटोनिन हार्मोन सक्रि य होते. हे हार्मोन काही काळ नैराश्य कमी करण्यास मदत करते. कॅडबरीमुळेही सेंराटोनिन हार्मोन सक्रिय होते. मात्र कॅडबरीचे अतिसेवन टाळावे. आंबट फळांच्या सेवनानेही मेंदूला तरतरी येते. 
हे असे प्रयत्न आपण करून पाहायला हवे.
मात्र तरीही ताण, टेन्शन दूर होत नसेल तर समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांची भेट घ्यायला हवी. आपलं मन, शरीर काय म्हणतंय, हे जरा समजून घ्यायला हवं!
- डॉ. केतकी गोगटे
त्वचाविकारतज्ज्ञ

Web Title: Maintain the math of sleep, exercise and diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.