तुफान बार्गेन करा
By admin | Published: October 9, 2014 06:16 PM2014-10-09T18:16:56+5:302014-10-09T18:16:56+5:30
सहलीला गेलात की, बिंधास्त रहा, नाहीतर नव्या गावात निभाव लागणं अवघड !
Next
>आता ऑक्टोबर सुरु झाला. अनेकजण ट्रीप्सचं बुकिंग करू लागतील. काहीजण तर बॅगपॅकची तयारी करतील.
सहलीला जातील. कॅम्प फायर सजू लागतील. आणि आता तर प्रवासातही स्टायलिशच रहायचं हा एक मोठा ट्रेण्ड आहे.
पण त्यापलीकडे जाऊन खरा प्रॉब्लम होतो तो वेगळाच. अनेकजण आपल्या सहलीचा शेवटचा दिवस शॉपिंगसाठी राखून ठेवतात. त्यादिवशी दम लागेपर्यंत शॉपिंग करतात.
आणि मग काही चुका हमखास होतात, अशा गोष्टी घरी येतात ज्या आपण कधीच वापरत नाहीत.
सो, यावेळी ट्रीप प्लॅन कराल, नव्या जागी शॉपिंगला जाल तेव्हा काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
शॉपिंग पैसावसूल झालीच समजा.
तिथलं ‘खास’ तेच घ्या.
हल्ली सगळं सगळीकडे मिळते. त्यामुळे त्या जागेची खासियत काय, असं काय आहे जे फक्त तिथंच मिळतं तेच घ्या. बाकीचं कशाला घ्यायचं? त्यासाठी जिथं जाल त्या जागेविषयी आधीच जरा होमवर्क करा. काहीनाही तर तुम्ही जिथं उतराल तिथल्या लोकांना, रिक्षावाल्यांना विचारा इथं खास काय मिळतं. आनॅलाइन माहिती तर सगळीकडे मिळते. बोगस वस्तूंची खरेदी अनेकजण करतात आणि मग पस्तावतात.
बिंधास्त करा बार्गेनिंग
घासाघीस करून खरेदी जगभर होते. त्यामुळे बार्गेनिंग करणं म्हणजे भलतंच चीप असलं काहीतरी डोक्यातून काढून टाका. घासाघीस करण्यात अजिबात लाजू नका. बाजारात जाण्यापूर्वी जरा भावांची एकंदर चाचपणी करा. मनात दोन आकडे धरा. एक म्हणजे तुम्ही कमीत कमी किती द्याल तो आकडा, कुठे तोलमोल तोडाल, तो आकडा. मात्र बार्गेनिंग मात्र कराच.
पाकीट जरा रिकामंच ठेवा.
रोख रक्कम देऊन खरेदी करायला जाणार असाल तर खर्चायचे पैसे फक्त वॉलेटमध्ये ठेवा. बाकी बिल्स वगैरे अन्यत्न ठेवा. यामुळे दोन हेतू साध्य होतील. एकतर विकणार्याला कळेल की, याच्या पाकिटात फार काही पैसे नाही, गिर्हाईक जेमतेम आहे. बरोबर बार्गेन करतंय आणि दुसरं म्हणजे स्वत: ठरवलेल्या बजेटच्या बाहेर तुम्ही खर्च करणार नाही आणि पाकीट कापलं गेलंच तर निदान घरी जाण्यापुरते पैसे राहतील कुठंतरी हाताशी जपून ठेवलेले. शक्य असल्यास क्रे डीट कार्डद्वारे खरेदी करा.
भेट द्यायला काय आणाल?
गावाला गेलं की नातेवाईक मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी आठवण म्हणून सगळेच आणतात. पण आणणार काय असं यादगार? तर असं काहीतरी आणि जे त्या जागेची ओळख असेल. कीचेन्स, मग्स, टीशर्ट असं काहीतरी आणा, त्या गावाची स्पेशालिटी सांगणारं !
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर