माणसाला वादविवादात हरवणारा AI डिबेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:16 PM2018-06-28T15:16:53+5:302018-06-28T15:16:59+5:30

डिबेटर नावाचं एआयवर आधारित मशीन आयबीएमने विकसित केलंय. इस्नयलमधल्या सर्वात तज्ज्ञ वादविवादपटू बरोबर या आयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला त्यात हा डिबेटर उत्कृष्ट ठरला !

man lost to AI debater | माणसाला वादविवादात हरवणारा AI डिबेटर

माणसाला वादविवादात हरवणारा AI डिबेटर

googlenewsNext
ठळक मुद्देआयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला व त्यात आयबीएमचा डिबेटर उत्कृष्ट ठरला !

- डॉ. भूषण केळकर

2010चा फुटबॉल विश्वविजेता कोण असेल हे ‘पॉल’ नावाच्या ऑक्टोपसने अचूक सांगितलं होतं, हे आपण सारे जाणतोच. आता फिफा जसा पुढे सरकतोय तसं आपण पाहतोय की स्पेन-पोतरुगल (3-3), ब्राझील-स्वित्र्झलड (1-1) बरोबरीत व जर्मनी तर मेक्सिकोकडून 1-0 हरलं, हे सगळं सांगायचं कारण की, आपल्या एआयचा वापर करून जी मॉडेल्स (प्रारूपे) तयार केली आहेत त्यांनी स्पेन-जर्मनी-ब्राझील या उतरत्या क्रमाने, फिफा 2018चा वर्ल्डकप विनर असेल असं सांगितलंय. आताच्या फेरीमधल्या धक्कादायक निकालांनी हे प्रेडिक्शन आश्चर्यकारक वाटतंय - पण हातच्या कांकणाला आरसा कशाला? 15 जुलैचं घोडामैदान दूर नाही ! 2010चा पॉल हा खराखुरा ऑक्टोपस होता. पण 2018चा हा एआयचा अनेक हात-पाय असणारा (चांगला) ऑक्टोपस आपल्या-जीवनाची अनेक दालनं स्पर्शून टाकत जाणार आहे. अगदी क्रीडा क्षेत्रसुद्धा!
आजचीच बातमी आहे की, आपण आधी जिला भेटलोय ती अ‍ॅमॅझॉनची अ‍ॅलेक्झा आता मॅरिअट या हॉटेलमध्ये सेवा देईल. हाऊस कीपिंगसाठी व ग्राहकांना काय हवं - नको हे पाहण्याचा अतिथ्य व पाहुणचार करण्यासाठी अलेक्झा कार्यरत असेल.
अजून एक ताजी बातमी आहे की, आयबीएम डिबेटर नावाचा एआयवर आधारित मशीन आयबीएमने विकसित केलंय. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध ।’ हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आयबीएमने एआयच्या स्वरूपात आणलंय म्हणा ना! इस्नयलमधल्या सर्वात तज्ज्ञ असणार्‍या वादविवादपटूबरोबरचा या आयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला व त्यात आयबीएमचा डिबेटर उत्कृष्ट ठरला ! हे वाचून मला तर दिसायला लागलं की आपल्याकडे टीव्हीवर वादविवाद होत असतो त्यात प्रचंड गोंधळ, शेरेबाजी असते. त्याऐवजी जर प्रत्येक पक्षाचे ‘प्रवक्ते’ म्हणून ‘एआय प्रवक्ते’ दिले तर? असो.
.तर या एआयच्या तांत्रिक गाभ्याला आपण पोहचतो आहोत. मागील भागात आपण सांख्यिकी व एक्सपर्ट सिस्टीम्स हा भाग बघितला आता या भागात मी तुम्हाला फॅझी लॉजिक व न्यूरल नेटवर्कबद्दल थोडी माहिती देतो.
फॅझी लॉजिकमध्ये फॅझी हा शब्द आहे. त्याचा अर्थ गडबड गोंधळ असा आहे ! लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नावात फॅझी असलं तरी हे तंत्रज्ञान अचूक आहे. याला फॅझी म्हणतात. याची दोन कारणं पहिलं म्हणजे ज्या गोष्टींचं अचूक मापन अवघड आहे. अशा गोष्टींसाठी हे अत्यंत सुयोग्य आहे. उदा. एखाद्याचं व्यक्तिमत्त्व एखाद्या कामासाठीची योग्यता इ. आपण अनेक विषयांवर टक्क्यांच्या भाषेत सांगू शकतो की, याला 85 टक्के पडले.
पण एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व असं टक्क्यात मोजता येत नाही. अजून साधं उदाहरण देतो. एखादा कपडा किती मळाला आहे - एखादा माणूस किती उंच आहे, या गोष्टीसुद्धा सापेक्ष आहेत - उंची मोजता येत असूनही ! मापन करण्यास अवघड/सापेक्ष संज्ञांसाठी फॅझी लॉजिक उत्तम काम करतं. दुसरं कारण म्हणजे ज्या संज्ञांमध्ये वर्गीकरणात सुस्पष्ट ‘कप्पे’ नसतात तिथे फॅझी लॉजिक वापरतात. एखादा माणूस 75 किलो वजनाचा असेल तर तो जाड व 74.5 किलो असले तर बारीक ठरत नाही ! खरं तर तुमच्या लक्षात येईल की जीवनात बहुतांशी संज्ञा या फॅझीमध्येच मोडतात. अनिश्चितता असणार्‍या!
न्यूरल नेटवर्क ही मेंदूमध्ये असणारे मज्जासंस्थेचं अनुकरण करणारी संगणकप्रणाली. एक न्यूरॉन (मज्जातंतू) दुसर्‍याबरोबर संवाद करून आपण ज्याला ‘शिकणं’ म्हणतो ते होत राहते. अनेक थर असणारे न्यूरॉक किंवा नोड्स हे असं त्यांना दाखवल्या जाणार्‍या डाटामधून शिकत जातात व ते नियम गणिती भाषेत/सांकेतिक भाषेत संगणक शिकून ते योग्य वेळी वापरू शकतो.  क्रेडिट कार्डचा गैरवापर वेळीच सांगणं यासाठी गेली 40 वर्षे हे तंत्रज्ञान वापरलं गेलंय. यातील अजून विशेष तांत्रिक बाबी आपण पुढील लेखात बघूया.
व्हिस्कीची चव ही अत्यंत फॅझी संज्ञा आहे. माझ्या स्कॉटलॅण्डमधील पीएच.डी.चा विषय हाही व्हिस्कीची चव सुधारणे होता ! माझ्या पीएच.डी.त मी जीव ओतून काम केलं, हे सांगणे न लगे.


(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)

Web Title: man lost to AI debater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.