मनाला लावा strong वळण

By admin | Published: November 27, 2014 09:55 PM2014-11-27T21:55:31+5:302014-11-27T21:55:31+5:30

पण ऐनवेळेला काही क्षुल्लक कारणांमुळे त्याला व्हिसा मिळायला अडचण आली आणि परदेशी उच्च शिक्षणाचं स्वप्न ध्यानीमनी नसताना भंग पावलं.

Mana Lava strong turn | मनाला लावा strong वळण

मनाला लावा strong वळण

Next

 

 
तेजस. लहानपणापासूनच हुशार. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच परदेशी विद्यापीठात पीएच.डी करायला जाण्यासाठी त्यानं तयारी केली. परदेशी विद्यापीठात गुणवत्तेप्रमाणेच प्रवेशही मिळाला. पण ऐनवेळेला काही क्षुल्लक कारणांमुळे त्याला व्हिसा मिळायला अडचण आली आणि परदेशी उच्च शिक्षणाचं स्वप्न ध्यानीमनी नसताना भंग पावलं. पण तेजस हरला नाही त्यानं इतर उपलब्ध ऑप्शन्सचा विचार केला आणि कामाला लागला. रडत बसला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज त्याचं संशोधन नावाजलं जातं आहे.
पण तेजसला जे जमलं ते अनेकांना जमत नाही. आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही तर लोक मोडून पडतात. हारतात. मात्र तेजससारखी मनानं काटक माणसं मात्र जिद्दीनं उभी राहतात. आलेल्या अडचणीवर मात करतात.
अर्थात हे सांगणं सोपं असलं तरी स्वप्नभंग, प्रेमभंग, आयुष्यातली कोणतीही महत्त्वाची गोष्ट / व्यक्ती कोणत्याही कारणाने गमावून बसणं ही तशी कुणासाठीच साधी गोष्ट नसते. परिस्थितीच कधीकधी अशी येते की, मोडून पडल्यासारखं वाटणं स्वाभाविक असतच.  खूप हताशपणाही येतो. पण अशाच प्रसंगात हा मनाचा काटकपणा उपयोगी पडतो. स्वत:च स्वत:ला मदत करणारी यंत्रणा सुरू करावी लागते. आपल्याच मनानं उभं राहण्यासाठी मारलेल्या हाका ऐकाव्या लागतात. मनाची ताकद गोळा करावी लागते. या आघाताने विखरून गेलेले मनाचे तुकडे पुन्हा गोळा करावे लागतात. हे सारं सोपं नाहीच. मनाची ही एक मोठी प्रक्रिया आहे. पण मनानं काटक असणारी माणसं स्वत:ला अशी मोडून पडण्याची, काहीच न करण्याची परवानगी देत नाही. आपण हारलो असा निर्णय घेत नाही. ते अशा कठीण प्रसंगांमध्ये स्वत:ला नव्याने जोखतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे झालेल्या प्रसंगांमध्ये आपली, आपल्या चुकांची जबाबदारीही ते स्वीकारतात. दोषारोप करणं, इतरांना दोषी मानून, दोष देणं, रडून कांगावं करणं, मोडून पडणं अशावेळी खरंतर सहजच शक्य असतं. पण तसं केलं तर आयुष्य थांबून जाऊन शकतं. आणि आपली गुणवत्ताही वाया जाण्याची शक्यता असतेच. म्हणजे मग जे काय घडतं त्याचं दु:खच अशा माणसांना होत नाही का, ते होऊ देत नाहीत का? दगड असतात का? 
- तर नाही !
मनानं काटक असणारी माणसं निराशा, नाउमेद करणारे क्षण, दु:ख नाकारात नाहीत. पण त्यात अडकून तेच उगाळत नाही. ते जगण्यात नवा अर्थ शोधत राहतात. तसा प्रयत्न करतात. आयुष्यात काही वाईट घडलं म्हणून ते सारं जगणंच अर्थहीन होऊ देत नाहीत.
मात्र असं नव्यानं जगण्यासाठी काही गोष्टी त्याही परिस्थितीत कराव्याच लागतात. त्या कुठल्या?
 
श्शी, मदत काय मागायची?
लाज न वाटता मदत मागता येणं हासुद्धा मनाने काटक असणार्‍या व्यक्तींमध्ये असणारा महत्त्वाचा गुण. अनेकांना कुणाची मदत मागण्यात कमीपणा वाटतो. आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवतो असं वाटतं. मात्र ज्याला आपलं आयुष्य नव्यानं बांधायचं, जे पॉझिटिव्हली जगण्याचा विचार करतात ते मदत मागण्यात कमीपणा मानत नाही.  योग्य वेळी योग्य मदत मिळाली तर  आपली वाटचाल थोडी सुकर होईल, याचं त्यांना भान असतं.
 
अँडजस्टमेण्ट आणि मी? 
बर्‍याचजणांना असं वाटतं की, बदल करणं किंवा आयुष्यातल्या काही गोष्टी स्वीकारणं, अँडजस्ट करणं म्हणजे काहीतरीच. त्यांना अशी तडजोडच मान्य नसते. तडजोड केली म्हणजे काहीतरी भयंकर स्वत:ची फसवणूक असंही अनेकांना वाटतं. मग ते स्वत:च्याच मनाची समजूत घालतात. ‘मला परदेशी विद्या पीठातच शिकायचं होतं. आता ते नाही म्हणजे काही अर्थ नाही’, 
‘मला अमुकशीच लग्न करायचं होतं पण..’ असे पण सांगत राहतात. मात्र काहीजण अशा अनुभवातून गेल्यानंतर नव्यानं जगणं साकारतात. आपलं जगणं जित्रं थांबलं होतं तिथून स्वत:विषयी, आयुष्याविषयी  नवं शिक्षण सुरू होतं हे समजून घेतात. या अनुभवातून जाण्याचा तो एक खरं म्हणजे फायदा असतो.  आपल्या क्षमतांचा कस लागतो. आपल्या विचारांची, तत्त्वांची, दृष्टिकोनांची पुनर्बांधणी करावी लागते. ज्यांना हे जमतं, ते आपल्या जगण्याला नक्की एक उत्तम आयाम देतात.
 
- डॉ. संज्योत देशपांडे
-----------------------
१) तुमच्या समस्येचा आवाका काय, समस्या नेमकी किती मोठी आहे याचा अंदाज घ्या. उगीच मनातल्या मनात विचार करुन छोट्या समस्येला डोंगराएवढं बनवू नका
२) आपली माणसं आपल्यासोबत असतील तर त्यांच्याशी बोला. ते आपल्याला मानसिक ऊर्जा देतात. आधार देतात. सपोर्ट करतात. त्यामुळे समस्या आहे म्हणून माणसं तोडत सुटू नका. जवळच्या माणसांना अकारण दुखावू नका. 
३) स्वत:च्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या. 
तब्येत सांभाळा. नीट खा-प्या, वेळच्या वेळी झोपा. व्यायाम करा.
४) स्वत:कडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करा. स्वत:तल्या चांगल्या गुणांचा विचार करा.
५) विचारांमध्ये लवचिकता आणण्याचा प्रयत्न करा. अनेक शक्यता तपासून पहा.
६) बदल होणारच, गोष्टी कालच्यासारख्या आज नसतील हे मान्य करा. ते स्वीकारा.
७) आपल्या भावना मान्य करुन, आपला आनंद कशात आहे, आपल्या आयुष्याचं ध्येय काय, त्या दिशेनं काम करा. आनंदी रहा, खंबीर व्हा.

Web Title: Mana Lava strong turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.