सागरी कासवांचे जिगरी दोस्त
By admin | Published: April 3, 2017 06:28 PM2017-04-03T18:28:26+5:302017-04-03T18:47:25+5:30
कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..
Next
>सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे.
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.