मंगळावर स्वारी, मोबाइल भारी.

By admin | Published: January 22, 2015 06:05 PM2015-01-22T18:05:43+5:302015-01-22T18:36:26+5:30

‘डिजिटल इंडिया’ असं स्वप्नच ज्या देशाचा पंतप्रधान देशवासीयांना देतो, त्या देशात टेक्नॉलॉजीची वाढ किती मोठय़ा प्रमाणात होत असेल याची कुणालाही सहज कल्पना यावी.

Mars invasion, mobile heavy. | मंगळावर स्वारी, मोबाइल भारी.

मंगळावर स्वारी, मोबाइल भारी.

Next

आपण जेव्हा फेसबुकवर पडीक असतो, तेव्हा फेसबुक बनवणारा मार्क झुकेरबर्ग मॅँडरिन ही चिनी भाषा शिकत असतो; ते का?

काय म्हणून तो भारताच्या पंतप्रधानांना मुद्दाम भेटायला येतो?
का स्वत:हून भारतासाठी काही विशेष योजना देऊ करतो?
भारतातले कैक लाख फेसबुक यूजर्स त्याला का महत्त्वाचे वाटतात ?
- त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे बिझनेस! पैसा ! आणि लोकप्रियता!
‘डिजिटल इंडिया’ असं स्वप्नच ज्या देशाचा पंतप्रधान देशवासीयांना देतो, त्या देशात टेक्नॉलॉजीची वाढ किती मोठय़ा प्रमाणात होत असेल याची कुणालाही सहज कल्पना यावी. हातात आलेला मोबाइल ही आपली ताकद आहे, आणि त्या एका मोबाइलच्या जोरावर आपण यंत्रणांना जाब विचारू शकतो, सरकारी कामकाजात पारदर्शकताच हवी, अशी मागणी करू शकतो आणि तसा पारदर्शक कारभार होतोय की, नाही यावर लक्ष ठेऊ शकतो, तेही घरबसल्या असा विश्वास या तरुण देशाला टेक्नॉलॉजीनं दिला आहे. मुळात माहितीच न मिळाल्यानं किंवा दडवून ठेवल्यानं इतके दिवस जे नुकसान होत होतं ते नुकसान टाळून आता प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी ‘जागा’ होऊ शकतो ही नवीन ताकद या देशाच्या तरुण डोक्यांच्या लक्षात येत आहे.
मात्र इथवरचा प्रवास सोपा नव्हताच, आता चोवीस तास शे-दीडशे चॅनल्स आपण घरबसल्या पाहतो पण, जेव्हा या देशात पहिल्यांदा टीव्ही आला आणि घरी लॅण्डलाइन फोन येऊ लागले. तेव्हा खायला भाकरी नाही, तर फोन कशाला हवा, नी रिकाम्या पोटी लोकांना टीव्ही पहायला लावाल का? असे प्रश्न उपस्थित झाले. हेच सारं झालं भारतीय अंतराळ विज्ञानाच्या संदर्भात. पूर्णत: देशी ताकदीच्या जोरावर जेव्हा आपल्याकडे इस्त्रोचं काम सुरू झालं तेव्हा सुरुवातीला रॉकेट सायकल आणि बैलगाडीतून नेण्यात आले. ज्या देशात लोकांना दोनवेळा धड खायला मिळत नाही, ते काय रॉकेट उडवणार नी अवकाशात उपग्रह सोडणार म्हणून यथेच्छ टिंगल झाली जगभरात!
आणि आज काय दिसतं आहे?
जगभरातल्या लोकांचे उपग्रह भारत अवकाशात सोडतो आहे, आपल्याकडच्या उड्डाणातली बिनचुकता जगभरातल्या शास्त्रज्ञांना चकीत करत आहे. आणि आता तर आपल्या देशाचे पंतप्रधान छातीठोकपणो सांगत आहेत की, जेवढय़ा पैशात आम्ही यान मंगळावर पाठवलं त्यापेक्षा जास्त पैसा तर हॉलिवूड फिल्म बनवायला लागतो. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम, हे यश ही आमची ताकद आहे. भारत 2020 र्पयत चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत आहे. 
घरोघर मोबाइल, वाढतं इंटरनेट पेनिट्रेशन, वाढता आयटी उद्योगाचा पसारा, जगभरातल्या सॉफ्टवेअर व्यवसायात असलेली भारतीयांची मातब्बरी. त्यात सोशल नेटवर्किग साइट्सचा वाढता पसारा, त्यातले काही लाख यूजर्स, त्याची मतं, त्यांच्या मागण्या, आणि गरजा हे सारं नव्या काळात कुणालाच नजरेआड करता येणार नाही.
हे सारं म्हणजेच आपली ताकद आहे!
म्हणून तर जगभरातली माणसं या खंडप्राय देशातल्या वाढत्या ताकदीविषयी, डिजिटल प्रवासाविषयी जाणून घ्यायला उत्सुक आहेत.
आणि त्याच ताकदीतून उद्याचा वेगळा भारत दिसेल अशी अनेकांना खात्रीही आहे.
 
आकाशात ङोप
 
* मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन यामध्ये भारतीय माणसांचं योगदान सातत्यानं वाढत आहे. साधारण 2क्क्क् पासून भारतीय योगदानाला वेग आला असा एका अभ्यासाचा दावा आहे. 2001र्पयत साधारण सायन्स जर्नलमध्ये भारतीय माणसांची 17,000 आर्टिकल्स प्रसिद्ध होत. 2007पर्यंत हा आकडा 27,000यत पोहोचला होता. 
 
* बंगळुरू ही भारताची टेक कॅपिटल, म्हणजे तंत्रज्ञान राजधानी. या शहरात सिंगापूरपेक्षा जास्त ए ग्रेड ऑफिसेस आहेत. आणि सर्वाधिक ऑफिसेस सुरू होण्याची संख्या या शहरात जगात सर्वात जास्त आहे.
 
* जगातली सगळ्यात मोठी आयटी सव्र्हिस इंडस्ट्री म्हणून भारतीय इंडस्ट्रीकडे पाहिलं जातं. 4700 कोटी रुपयांची साधारण ही इंडस्ट्री आहे.
 
* भारताचं पहिलं रॉकेट जेव्हा लॉँच झालं तेव्हा ते सायकलवर आणि बैलगाडी नेण्यात आलं होतं हे तर सारेच जाणतात, पण आजच्या घडीला जगातल्या पहिल्या पाच अंतराळ विज्ञान संशोधन संस्थात इस्त्रोचा आणि अर्थातच भारताचा समावेश होतो.
* अमेरिका आणि जपाननंतर सुपर कॉम्प्युटर बनवण्याचा मान भारताला मिळतो.
 
 
ई- बिङिानेस
* भारतात आजच्या घडीला ऑनलाइन अडव्हरटायङिांग मार्केट हे 2,938 कोटी रुपये इतके आहे.
 
* भारतात ई-कॉमर्सची वाढ झपाटय़ानं होत आहे. 2015 पर्यंत ई-कॉमर्स इंडस्ट्री 1,07,800 कोटी रुपये इतकी महाकाय झालेली असेल.
 
* भारतीय बाजारपेठेत ऑनलाइन विक्री करणा-या कंपन्याच नाही, तर फेसबुक, ट्विटरसारखे सोशल मीडियावालेही ऑनलाइन शॉपिंगसाठी उतरले आहेत.  सोशल मीडिया आणि ऑनलाइन शॉपिंगचा हा नवा प्रयोग ते भारतात राबवत आहेत आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे जगभराचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
 
सोशल मीडियाची ताकद
 
* फेसबुक भारतात आजच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय आहे.
फेसबुकचे भारतात 10 कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे जगभरात फेसबुकची लोकप्रियता उतरणीला लागली तर भारतावर फेसबुकची मोठी भिस्त आहे.
 
* फेसबुक वापरणा-यांपैकी 80टक्के लोक त्याचा वापर आपापल्या मोबाइल फोनवरून करतात. यावरून मोबाइल वापरणारे आणि मोबाइलरून इंटरनेट वापरणारे याचं प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढतं आहे हे सहज लक्षात यावं.
 
* ट्विटर वापरणा:यांची संख्या आहे साधारण 3 कोटी 30 लाख. त्यापैकीही 76टक्के लोक फोनवरूनच अकाउण्ट हॅण्डल करतात.
 
* लिंकडीन हे नव्यानं लोकप्रिय होऊ लागलेलं प्रोफेशनल नेटवर्किग. त्याचेही भारतात 2 कोटी 60 लाख यूजर्स आहेत.
 
* इन्स्टाग्रामानंही नव्यानं भारतीय तारुण्याला वेड लागलं आहे. पण इन्स्टाग्रामाचा वापर मुलींपेक्षा मुलं जास्त करताना दिसतात. त्याच कारण कदाचित सामाजिक सुरक्षिततेत असेल म्हणून मुली आपले फोटो इन्स्टाग्रामवर जास्त अपलोड करत नसाव्यात कारण, शंभरात फक्त 25 मुली इन्स्टाग्राम वापरतात तर 75 मुलं त्याचा वापर करताना दिसतात.
 
* भारतात सगळ्यात जास्त ऑनलाइन शेअर काय होतं तर सिनेमाचे ट्रेलर.
 
इंटरनेट /मोबाइल यूजर्स
 
* भारतात आजच्या घडीला 24 कोटी 30 लाख इंटरनेट यूजर्स आहेत. (ही संख्या सतत वाढत आहे.)
* गूगल इंडियाच्या मते, काही दिवसांत अमेरिकेपेक्षा भारतात जास्त इंटरनेट यूजर्स असतील.
* 2018 र्पयत भारतात 50 कोटी इंटरनेट यूजर्स असतील असा अभ्यासकांचा दावा आहे.
 
पण, तरीही.
 
 
* सायबर क्राइमची संख्या प्रचंड असलेल्या पहिल्या पाच देशात भारताचं नाव आहे.
 
* इंटरनेट फ्रॉडचं प्रमाणही आपल्या देशात प्रचंड आहे. 24, 630 कोटी रुपयांचे इंटरनेट फ्रॉड अलिकडच्या काही वर्षात झाले आहेत.
 
* तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात गर्भजल चिकित्सेचे प्रमाण मोठे आहे. भारतात हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त 900 आहे. देशात दर दोन तासाला एका महिलेला असुरक्षित गर्भपातामुळे जीव गमवावा लागतो.

 

Web Title: Mars invasion, mobile heavy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.