पायानं दार उघडण्याचं तंत्र
By admin | Published: January 7, 2016 10:01 PM2016-01-07T22:01:46+5:302016-01-07T22:01:46+5:30
जयप्रकाशचं एक स्वप्न आहे, मोठं होऊन खूप पैसे कमवायचे आणि जगभर प्रवास करायचा. खूप फिरायचं. त्याचे वडील शेतकरी, आई गृहिणी आहे.
Next
>जयप्रकाश रंधवा
इयत्ता बारावी, गांधीनगर, गुजरात
जयप्रकाशचं एक स्वप्न आहे, मोठं होऊन खूप पैसे कमवायचे आणि जगभर प्रवास करायचा. खूप फिरायचं. त्याचे वडील शेतकरी, आई गृहिणी आहे. तो हॉस्टेलला राहतो. गावी गेला की शेतात कामही करतो. गांधीनगर जवळच्या बारमोली गावात तो राहतो. एकदा गावात त्यानं पाहिलं की एक माणूस दाराजवळ उभाय, त्याला दार उघडायचं आहे पण त्याला हातच नाहीत. त्यावेळी त्याला वाटलं की, हा माणूस रोज स्वच्छतागृहाचं, बाथरूमचं, घराचं दार कसं उघडत असेल? तिथून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की, हातानं दार उघडता येत नसेल तर पायानं उघडता यायला हवं. कुठल्याही दाराला तळाशी एक सेन्सर लावलं की ते दाबून दार उघडता येईल अशी ती कल्पना. हॉटेल्स, पब्लिक टॉयलेट इथंही ही कल्पना वापरता येईल आणि हाताला होणारा जंतुसंसर्गही टाळता येऊ शकेल असं त्याचं मत. त्यातून त्यानं हा मेमॅनिझम डेव्हलप केला.
अशीच आयडिया पुण्याच्या तन्मय टकलेलाही सुचली.
जयप्रकाश म्हणतो, ‘उत्तरं शोधली तर अवघड गोष्टींचीही उकल होते असं मला वाटतं. पण ती शोधायची सवय आपण स्वत:ला लावायला हवी!’