गावातल्या खोपटात ग्राफिक कंपनी सुरू करणाऱ्या या दोस्ताला भेटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 07:11 PM2020-08-27T19:11:28+5:302020-08-27T19:25:09+5:30

बीड जिल्ह्यात सांगवी पाटण नावाचं गाव आहे, तिथला हा दादासाहेब भगत. त्यानं एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कंपनीचं काम सुरूकेलं. आणि.

Meet dadasaheb bhgat, who started a graphic company in the village in maharashtra | गावातल्या खोपटात ग्राफिक कंपनी सुरू करणाऱ्या या दोस्ताला भेटा!

गावातल्या खोपटात ग्राफिक कंपनी सुरू करणाऱ्या या दोस्ताला भेटा!

googlenewsNext
ठळक मुद्देदादासाहेब भगतचा एक फोटो सध्या सोशल मीडियातही व्हायरल आहे.गावात ग्राफिक्स कंपनी

- अविनाश कदम

खेडय़ापाडय़ातली मुलंही जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर काय करू शकतात, याच उत्तम उदाहरण म्हणजे दादासाहेब भगतचा एक फोटो. जो सध्या सोशल मीडियातही व्हायरल आहे.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात सांगवी पाटण नावाचं गाव आहे, तिथला हा दादासाहेब भगत.
त्यानं डूग्राफिक्स या नावानं एक ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवलं आहे. संपूर्णत: भारतीय बनावटीचं हे ऑनलाइन ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे. 
15 ऑगस्टपासून ते सर्वत्र ऑनलाइन उपलब्धही करण्यात आलं. एका टपरीवजा शेडमध्ये हा मुलगा आपली कंपनी चालवतो असा त्याचा फोटोही व्हायरल झाला.


दादासाहेबशी यानिमित्तानं भेट घेतली आणि समजून घेतलं की नेमकं त्यानं काय काम सुरूकेलं आहे.
शेतकरी कुटुंबातला हा मुलगा. त्याचे वडील पांडुरंग भगत हे सहा महिने ऊसतोडणीसाठी कारखान्यावर जात व सहा महिने शेती करून कुटुंबाची गुजराण करत. आर्थिक परिस्थिती बेताचीच मात्र मुलांनी शिकावं अशी त्यांची इच्छा होती. दादासाहेब दहावीर्पयत गावीच शिकला. मग बीडमध्ये त्यानं आयटीआयचा कोर्स केला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना कडा साखर कारखान्यामध्ये काम केलं. नंतर पुण्यात गेला, तिथं त्यानं ऑफिस बॉय म्हणून काम केलं.
त्याकाळात त्याला अॅनिमेशनबद्दल माहिती मिळाली. पार्टटाइम काम करत त्यानं आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि मग दादासाहेबला एका अॅनिमेशन कंपनीत जॉब लागला. जॉब करत असतानाच त्यानं आपली एक कंपनी सुरूकेली.
नोकरी आणि स्वत:ची कंपनी असं दोन्हीकडे ग्राहकसेवा देताना त्यानं जो अनुभव घेतला त्यातून त्यानं ठरवलं की उद्योगधंद्यांना आपली जाहिरात करण्यासाठी मदत करेल असं काहीतरी हवं.
त्यातूनच त्यानं ‘डूग्राफिक्स’ हे ग्राफिक्स बनवण्याचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्यात विविध ग्राफिक डिझाइन्स करता येतात.
डूग्राफिक्स हे सॉफ्टवेअर 15 ऑगस्टला ग्राहकांच्या सेवेत दाखल झालं. ते बनवण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली.
हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी त्यानं पैसाही तोच वापरला जो त्यानं आपल्या नोकरीतून बचत करत जमवला होता.
आता त्यानं आपलं काम जोरदार सुरू केलं आहे. आणि तो सांगतो की, ‘आताच आम्ही 2क् ते 25 लोकांना रोजगार दिला आहे. पुढील वर्षभरात एक हजार तरु णांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. सध्या कोरोनामुळे जे उद्योगधंदे बंद झाले आहेत, त्यांना मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंगसाठी हा प्लॅटफॉर्म मदत करेल, असा मला विश्वास आहे.’

दोस्त आले सोबत.
लॉकडाऊनमुळे शहरात शिकणारी, नोकरी करणारी अनेक तरुण मुलं गावी आली होती.
काही दोस्तांच्या नोक:याही गेल्या. त्यांना सोबत घेऊन दादासाहेबने आपलं काम सुरू केलं. काही फ्रीलान्सर्सही या कामाशी जोडले गेले.

डूग्राफिक्स कसे वापरता येईल.
हा प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करण्याची काहीही गरज नाही त्यासाठी DooGraphics.com या लिकंवर जाऊन ग्राफिक्स डिझाइनचं काम करता येऊ शकतं. सोशल मीडिया पोस्ट, लोगो डिझाइन , व्हिजिजिटिंग कार्ड यांसह अनेक गोष्टींचं डिझाइन करत येऊ शकतं.

(अविनाश लोकमतचे आष्टी तालुका वार्ताहर आहेत.)

Web Title: Meet dadasaheb bhgat, who started a graphic company in the village in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.