उत्तम करिअर सोडून जळगावात कचरावेचक मुलांसाठी काम करणारी प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:48 PM2019-11-14T14:48:33+5:302019-11-14T14:49:11+5:30

बायोटेक्नॉलॉजी आणि मानववंश शास्र याविषयातल्या पदव्या हातात होत्या, तेव्हा मी स्वतर्‍ला विचारत होते, माझ्या कामाचा उपयोग कुणाला? माझी नेमकी गरज कुठं आहे? या प्रश्नांचं उत्तर शोधत जळगावात मी कचरावेचक मुलांसोबत काम सुरू केलं. आणि.

meet pragati from Jalgav, who works for kids education. | उत्तम करिअर सोडून जळगावात कचरावेचक मुलांसाठी काम करणारी प्रगती

उत्तम करिअर सोडून जळगावात कचरावेचक मुलांसाठी काम करणारी प्रगती

googlenewsNext
ठळक मुद्देमला सापडलेलं आनंदघर

प्रणाली सिसोदिया

मी मूळची धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गावची. 17 माणसांच्या मध्यमवर्गीय एकत्न कुटुंबात मी वाढले. पाचवीर्पयतचं आयुष्य छोटय़ा गावात, एवढय़ा माणसांच्या गोतावळ्यात अलगद झेललं गेलं. नंतर वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे धुळे शहरात येऊन स्थायिक झालो. माझं बी.एस्सी.र्पयतचं सगळं शिक्षण धुळ्यातील नामवंत अशा जयहिंद शाळा आणि कॉलेजमधून झालं.
गावाकडे असेर्पयत एक उच्चभ्रू माज माझ्या डोक्यात होता; पण धुळ्यात आल्यावर इतर जातीतल्या मैत्रिणींच्या संपर्कात आल्यावर माझे विचार बदलले. पुढे जसजसं वाचन वाढलं तसतसं लक्षात यायला लागलं समाजात मागे राहून गेलेल्या, वंचित माणसांच्या व्यथा काय आहेत. तिथून माझ्या अस्वस्थतेला सुरुवात झाली. समाजाने मागास ठरवलेल्या जातीतल्या लोकांकडे मी माणूस पाहायला शिकले आणि या बदलाने माझा आधीचा माज व्यवस्थित उडवून लावला. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन वर्ग समोर आले. या ‘नाही रे’ वर्गातल्या लोकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल आस्था वाटू लागली.
याचवेळी एका बाजूला बारावी पूर्ण करून मी बायोटेक्नोलॉजीला प्रवेश घेतला. यादरम्यान आनंदवनला एका मित्नासोबत एका शिबिरासाठी गेले होते. या शिबिरात साधनाताई, डॉ. अभय बंग (नायना), अंशू गुप्ता अशा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्नात काम करणार्‍या लोकांना ऐकलं, समजून घेतलं. इथे मला निर्माणबद्दल समजलं; परंतु जाता आलं नाही. ही माणसं आणि आनंदवनातील जग हे मात्न माझ्यासाठी शब्दशर्‍ परग्रहावरचं जग होतं. काही लोकं संपूर्ण आयुष्य एका कामात झोकून देऊन हे प्रश्न सोडवताय हे मला नव्याने समजलं आणि मग मी पुढील 2-3 र्वष आनंदवनात जात राहिली. दुसर्‍या बाजूला वाचनानेही गती पकडली होती. घरी अभ्यासाव्यतिरिक्त सतत अवांतर वाचायला परवानगी नसल्याने जर्नलमध्ये पुस्तक ठेवून गांधी, काव्र्हर, विनोबा, सिमोन, टॉलस्टॉय, अनिल अवचट यांना वाचत गेले आणि त्यातून स्वतर्‍ची अशी एक विचारप्रक्रि या होत गेली, मूल्यव्यवस्था तयार होत गेली आणि या सगळ्यांतून एक वेगळी प्रणाली घडत गेली. 
सोबतच बायोटेक्नोलॉजीच्या अभ्यासाचा भाग म्हणून खूप मोठ-मोठय़ा मशिन्ससोबत माझा रोजचा संपर्क वाढू लागला तसं जाणवू लागलं की या मशिन्समध्ये माझं मन रमत नाहीये, मशिन्ससोबत काम करताना गुदमरायला होतंय. सोबतच याच्याने ‘नाही रे’ वर्गाला कितपत उपयोग होईल याचीही काही समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. या गुदमरण्याने काय नाही करायचं हे ठरवायला मदत झाली, त्यातून बायोटेक्नोलॉजीमध्ये पुढे शिकायचं नाही हे ठरलं.
दरम्यान, युनिसेफ आणि गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स x इकॉनॉमिक्सने आयोजित केलेल्या सव्र्हेमध्ये चार महिने काम केलं. त्यासाठी मला महाराष्ट्रातील आदिवासी, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी अशा सर्व भागांत जाऊन माहिती मिळवायची होती. हे काम आम्ही रात्नंदिवस करत असू; पण कधीही मला त्याचा कंटाळा आला नाही, तेवढय़ाच एनर्जीने दुसर्‍या दिवशीही मी काम करत होती कारण लोकांसोबत राहून, त्यांना समजून घेणं हे जास्त आवडत होतं. या सव्र्हेच्या अनुभवांची मला माझी निर्णयप्रक्रि या ठरवायला खूप मदत झाली. मी माणसांना कुठल्याही प्रकारचं लेबल न लावता माणूस म्हणून पाहायला शिकली. आपला उपयोग समाजातल्या ‘नाही रे’ वर्गाला आणि त्यातही गांधीजींनी मांडलेल्या ‘शेवटच्या माणसा’ला व्हायला पाहिजे हा निर्णय पक्का झाला !
हा निर्णय घेताना ‘या क्षेत्नात तेवढा पैसा नाही’ असं लोकांकडून ऐकवलं जायचं. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एकेकाळी माझ्या आई-वडिलांना पै पै सेव्हिंग म्हणून बाजूला ठेवताना आणि तेवढय़ा कठीण काळातही पोटाला चिमटे मारून आनंदात राहताना पाहिलेलं असल्याने आपण फार पैसे कमवावे असा विचार मनात कधीच आला नाही. निर्णय घेताना कामातून मिळणार्‍या पैशापेक्षा त्यातलं समाधान आणि आनंद याचं पारडं आपोपाच जड होतं. कामाची गरज म्हणून मी पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी (मानववंशशास्र) केलं. या शिक्षणाने मला समाजाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मिळाली, ज्याची मला आज कामात प्रचंड मदत होतेय.
दरम्यान, माझी आणि अद्वैतची भेट झाली, मैत्नी झाली. पुढे विचार जुळले आणि आम्ही लग्न केलं. आंतरजातीय लग्न असल्याने सुरुवातीला घरून विरोध झाला. जो आता हळूहळू मावळतोय. 
अद्वैतचंही सामाजिक प्रश्नावर काम करावं असं ठरलं असल्याने आम्ही दोघांनीही जळगावात राहूनच काम करायचं हे पक्कं केलं आणि 2013मध्ये ‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सोसायटी’चा जन्म झाला. आमच्या विचारांना घरच्यांचा संपूर्ण आधार असल्याने अजून बिनधास्त होऊन विचार करता आला. सुरुवातीला नेमक्या कुठल्या विषयावर काम करावं याची फारशी स्पष्टता नव्हती; परंतु समाजातल्या ‘नाही रे’ वर्गासोबत काम करावं हे पक्कं होतं. त्यातही फक्त भावनिक आधारावर काम न करता आपल्या कामाला काहीतरी शास्रीय आधार असला पाहिजे हाही विचार होता म्हणून जे काही करावं ते माहितीच्या आधारावर करावं असं ठरलं होतं. निर्माणच्या शिबिरांतून नायना नेहमी सांगतात की, ‘मला काय करायचंय त्यापेक्षा माझी कुठे गरज आहे याला आपण जास्त महत्त्व द्यावं.’ त्यामुळे आम्ही दोघेही याबद्दल शोध घेत होतो. दरम्यान, एका उपक्रमाला मदत म्हणून आम्ही वर्धिष्णूच्या माध्यमाने जळगाव शहरातील कचरावेचक समुदायाचा अभ्यास केला. जवळ जवळ 400 कचरावेचकांशी आम्ही बोललो. या अभ्यासातून आम्हाला कचरावेचक समजाच्या नेमक्या काय समस्या आहेत हे नीट समजून घेता आल्या. त्यांची जीवन जगण्याची पद्धती, त्यामागची हतबलता समजून घेता आली. हा समाज किती कठीण अशा दुष्टचक्रात अडकलाय आणि त्यामुळे पुढील पिढय़ांची; विशेषतर्‍ लहान मुलांची किती नासाडी होतेय हे लक्षात आलं. कचरावेचक म्हणून काम करताना मुळात सगळ्यात आधी ही मुलं मुख्य प्रवाहाच्या शिक्षणप्रक्रियेतून बाद होतात, दिवसातला बराच वेळ कचर्‍याच्या ढिगावर घालावण्याने कितीतरी आजारांना ही मुलं बळी पडतात. लहान वयातच हातात पैसा आल्याने हळूहळू व्यसनाकडे वळत जातात. हे वास्तव समोर आल्यानंतर आम्ही कचरावेचक मुलांना सुरक्षित, आनंददायी बालपण आणि  सन्मानपूर्वक आयुष्य मिळावं या हेतूने मुलां‘सोबत’ (‘साठी’ नाही !) शिक्षण, आरोग्य आणि व्यसन यावर काम करायचं ठरवलं. कामाचा भाग म्हणून जानेवारी 2014 मध्ये जळगाव शहरातील तांबापुरा या वस्तीत एका मंदिराच्या आवारात प्रेम आणि अनुकंपा या दोन मूलभूत तत्त्वांवर आधारित लर्निग सेंटर (ज्याला आता मुलांनी ‘आनंदघर’ नाव दिलंय) सुरू केलं. रोज संध्याकाळी वस्तीत जाणं, मुलांसोबत वेळ घालवणं, विविध खेळ खेळणं, लॅपटॉपवर काहीतरी मजेशीर दाखवणं यातून आम्ही मुलांचा विश्वास आणि प्रेम मिळवू शकलो. पुढे हळूहळू मुलांसोबत अंकओळख, अक्षरओळख आणि मूल्यशिक्षण यावर काम करू लागलो. मुलांशी होणार्‍या गप्पांतून शाळा सोडण्याचं कारण समजून घेतलं तेव्हा असं समोर आलं की, या मुलांना कचरावेचक म्हणून तुच्छ दर्जाची वागणूक काही शाळांतून दिली जाते, सोबत अभ्यास येत नसल्याने रागवणे व प्रसंगी शारीरिक मारहाण मुलांना मोठय़ा प्रमाणावर होते. अतिशय मोकळ्या वातावरणात राहिलेल्या या मुलांना चार भिंतींच्या बंद खोलीत बसणं शक्य होत नाही. मुलांच्या या अनुभवांतून आनंदघरात काय होऊ नये हे ठरवणं आम्हाला सोप्पं गेलं. त्यात मुलांना कुणीही रागावणार नाही, मारणार नाही, माणूस म्हणून त्यांना आदराने-प्रेमाने वागवेल, मुलांना आनंदघरातील शिक्षक हे शाळेसारखे शिक्षक न वाटता त्यांचे मोठे ताई-दादा वाटतील हे नियम ठरवले गेले. आजही आनंदघर याच नियमांवर टिकून आहे. सोबतच शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया ही आनंददायी आणि  कृतियुक्त असावी हेही आम्ही कटाक्षाने पाळत आलोय.
मग हळूहळू आम्ही मुलांना वर्गात काय सुरू आहे हे बेसिक तरी कळेल एवढं तयार करून आणि पालकांशी बोलून मुलांना मुख्य प्रवाहातल्या शाळांमध्ये दाखल करू लागलो. मात्न नुसतं शाळेत दाखल करून मुलांचे प्रश्न सुटत नव्हते. मुलांना शाळेत मिळणारी वागणूक जर बदलायची असेल शाळेतील शिक्षकांसोबतही काहीअंशी काम करणं आम्ही सुरू केलं.  कचर्‍याच्या ढिगार्‍यावरचा वेळ शाळेत जाऊ लागल्याने मुलांचे आरोग्याचे प्रश्न बर्‍याचअंशी कमी झाले. 
कामाच्या सुरुवातीपासूनच आकडय़ांच्या मागे धावायचं नाही हे पक्कं असल्याने जळगावात फक्त आनंदघरांची संख्या न वाढवता खोलात जाऊन वस्तीपातळीवरील मुलांसोबत शिक्षणावर काम करण्याच्या पद्धती, पेडॅगॉजी पक्की करणं, स्वतर्‍ची कामातली समज वाढवणं यावर आम्ही जास्त काम केलं. जेव्हा आम्हाला याबाबतीत विश्वास वाटला तेव्हा आम्ही जळगावमधील इतर दोन वस्त्यांमध्ये आनंदघरं सुरू केली.
दरम्यान, आम्हा दोघांपैकी कुणालाही आधी कामाचा फारसा अनुभव नसल्याने तो घेण्याच्या आणि आर्थिक गरज भागवण्याच्या दृष्टीनेही मधले तीन मी वर्ष महाराष्ट्र नॉलेज फाउण्डेशन, पुणे आणि निर्माण, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चालणार्‍या ‘कुमार निर्माण’ प्रकल्पासोबत काम केलं. कुमार निर्माण सोबत काम करताना मीदेखील निर्माणला गेली. 
या अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन मी जानेवारी 2019 पासून पुन्हा एकदा वर्धिष्णूला जॉइन केलंय. साडेपाच वर्षाच्या प्रयत्नांत वर्धिष्णूच्या कामाला नेमकेपणा आलाय. मी आणि अद्वैत व्यतिरिक्त अजून 7 कार्यकर्ते (पूर्ण व अर्ध वेळ) संस्थेत काम करताहेत. या कामातून मिळणारा आनंद आणि समाधान व्यक्ती म्हणून मला उन्नत करत जातोय आणि उत्क्रांतीचा माझा हा प्रवास सुरू ठेवण्याला ऊर्जाही देत राहतोय ! 
 

Web Title: meet pragati from Jalgav, who works for kids education.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.