टॉपर इंजिनिअर कॉर्पोरेट जॉब सोडून चहास्टॉल टाकतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 07:05 AM2019-03-14T07:05:00+5:302019-03-14T07:05:01+5:30

कॉलेजात टॉपर. व्हीजेटीआयचा सिव्हिल इंजिनिअर. आणि आता काय करतो तर चहाचं शॉप? मात्र मी ठरवलं होतं, आपण आवडतं ते करून पाहायचं!

meet shubham dabare, a Nagpur boy who left engineering to peruse a dream to work for tea & cooking. | टॉपर इंजिनिअर कॉर्पोरेट जॉब सोडून चहास्टॉल टाकतो तेव्हा...

टॉपर इंजिनिअर कॉर्पोरेट जॉब सोडून चहास्टॉल टाकतो तेव्हा...

Next
ठळक मुद्देमाझा एलओसीवरचा हा प्रवास आत्ता सुरू झाला आहे. बघायचं आम्ही कसं पुढं जात राहातो.

- शुभम डबरे

मी नागपूरचा. दहावी, बारावीत टॉपर होतो. बारावीनंतर काय करणार तर सगळे टॉपर करतात तेच मी केलं, मुंबईत व्हीजेटीआयसारख्या संस्थेत मला प्रवेश मिळाला. मी सिव्हिल इंजिनिअर झालो. कॅम्पस इंटरव्ह्यूतच जॉब मिळाला. सगळं एकदम परफेक्ट. लग्न करण्याच्या दृष्टीनंही परफेक्ट. सगळं उत्तम सुरू होतं. मी दोन वर्षे पुण्यात कार्पोरेटमध्ये जॉब केला. पहिलं वर्ष तर भरपूर सॅलरी, मजा-मस्ती यातच गेलं. मग मात्र जरा बोअर व्हायला लागलं. तेच नऊ ते सहाचं रूटीन. तेच कार्पोरेट काम. तेच जग. मला वाटत होतं, आपण वेगळं काही करावं. असं काही जे करताना मजा येईल. रोज ऑफिसला जावंसं वाटेल, उद्या सोमवार असं वाटून मनात कसंतरी होणार नाही. पण मी पहिल्यापासून टॉपर, काय करायचं नेमकं जे आपल्याला शोभेल हे ठरत नव्हतं. म्हणून मग मी एमबीए करायचं ठरवलं. क्लास लावले. पण तरी त्यातही काही मजा येत नव्हती. मला असं काहीतरी करायचं होतं जे आपण केलं नाही, याची भविष्यात रुखरुख लागता कामा नये. आपण भले तर अपयशी ठरू, भले तर चुकेल पण करून पाहिलं हे तरी मनात राहील. असं सगळं मनात होतं. मात्र त्याच काळात या विचारांनी मला भयंकर बोअर होत होतं, मार्ग दिसत नव्हता. मुळात मला आर्टक्राफ्ट आणि स्वयंपाकाचा छंद लहानपणापासून होता. बोअर झालं की मस्त काहीतरी पदार्थ करून मित्रांना खाऊ घालायचो. मग मनात आलं की, ही कुकिंगची कला हेच आपलं करिअर का असू नये. जे आपल्याला आवडतं, तेच करू. मग माझ्या मनात होतं की, फुड ट्रक सुरू करू. पुण्या-मुंबईत तर त्याची मोठी क्रेझ होती. पण नागपुरात ते चालेल का, मला जरा शंका वाटली. शक्यता तपासून पाहिल्या पण ते काही जमलं नाही. 
मी स्वतर्‍लाच विचारत होतो, तुला काय आवडतं? नेमकं काय करायला आवडेल? असं काय आहे जे नाही जमलं तरी मला करून पाहण्याचा पश्चाताप नाही होणार?
उत्तर आलं- चहा!
मला स्वतर्‍ला चहा खूप आवडतो.
पुण्यात तर चाय के चर्चे बरेच होते. लोक चहा पिण्यासाठी गर्दी करताना मी पाहिले होते. मग मी ठरवलं आपण असंच एक चहाचं स्टार्ट अप नागपूरमध्ये का सुरू करू नये? 
मग मी घरी सांगून टाकलं की मी नोकरी सोडणार आहे आणि चहाची टपरी टाकणार आहे!
घरच्यांना धक्काच बसला. आपला टॉपर, इंजिनिअर मुलगा, चहाची टपरी टाकणार हे पचनीच पडणं अवघड होतं. 
मी मात्र ठाम होतो. मी पुण्यामुंबईत जे चहा स्टॉल चांगले चालतात तिथं गेलो, चहा पिऊन पाहिला, चवींचा अभ्यास केला. मित्र सोबत होते. त्यांनी खूप आधार दिला. माझ्या घरचे मात्र सतत सांगत होते, या शहरात टॉपर म्हणून तुझे होर्डिग लागलेत आणि आता मुलगा काय करतो, चहाची टपरी टाक तो. लोक काय म्हणतील, असा त्यांचा प्रश्न होता. मात्र माझे जिजाजी उज्‍जवल सहारे माझ्या पाठीशी होते. घरच्यांना घेऊन मी पुण्याला गेलो, त्यांना चहाच्या लोकप्रिय जागा दाखवल्या, तिथलं वातावरण दाखवलं. समजावून सांगितलं की, लोक काय म्हणतात ते जाऊ द्या, मी ट्राय नाही केलं असं मला वाटू नये म्हणून तरी मला प्रय} करु द्या. मला करून पाहू द्या. त्यांना पुण्यात चारपाच दिवस सारं दाखवलं तेव्हा ते तयार झाले. माझ्या वडिलांचंही दुकान आहे, व्यवसाय करणं इतकं सोपं नसतं हे ते सांगत होते, ते खरंच आहे. मात्र तरीही मला हे करून पाहायचं होतं.
आणि शेवटी सगळे राजी झाले. माझे जिजाजी सोबत होतेच. त्यांनी सपोर्ट केला आणि आम्ही दोघांनी पार्टनरशीपमध्ये हा बिझनेस करायचं ठरवलं. मी स्वतर्‍चे काही पैसे त्यासाठी साठवले होते, काही आम्ही कर्ज काढलं. काही मदत घरच्यांनीही केली.  आम्ही एक चहाचं आउटलेट सुरू केलं. त्याचं नाव एलओसी. लाइफ ऑफ चाय.
आता फक्त दोनच महिने झाले आहेत, आमचं एलओसी सुरू होऊन. सारंच नवीन आहे. मात्र मला आनंद आहे की, मी पायाखालची वाट सोडून स्वतर्‍ला हवं ते करून पाहण्याची तयारी केली. ते प्रत्यक्षात आणलं.
माझा हा चहा कुणासाठी आहे असं मी स्वतर्‍लाच विचारलं. तर तो सगळ्यांसाठी आहे. मजुरापासून ते श्रीमंतांर्पयत. ज्यांनी कधी टपरीवर जाऊन निवांत चहा प्याला नाही त्यांच्यासाठी ही चार घटका निवांत बसण्याची जागा आहे. महिला/मुलींना बाहेर जाऊन चहा पिण्यासारखी सुरक्षित जागा आम्ही तयार करू शकलो याचा आनंद आहे. आणि आमच्या चहाच्या चवीवर आमचा विश्वासही आहे.
यातून मी काय शिकलोय तर आपल्याला जे करावंसं वाटतं ते करून पाहणं ही एक ताकद आहे, ती आपल्यात असते, आपण प्रय} करून पाहायला हवा.
माझा एलओसीवरचा हा प्रवास आत्ता सुरू झाला आहे.
बघायचं आम्ही कसं पुढं जात राहातो.
 

 

Web Title: meet shubham dabare, a Nagpur boy who left engineering to peruse a dream to work for tea & cooking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.