भेटा दोन इंजिनिअर मित्रांना- ऐन विशीत ते स्टार्टअप काढून उद्योगाला लागलेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 04:48 PM2019-06-13T16:48:36+5:302019-06-13T16:49:28+5:30

इंजिनिअर होता होताच ठरवलं आपला उद्योग करायचा. मनीष 24 वर्षाचा, जुनैद 23 वर्षाचा. आता दोघं मिळून डिजिटल मार्केटिंग याविषयात सॉफ्टवेअर बनवण्याचं स्टार्ट अप चालवत आहेत.

Meet two engineer friends, just 20 years old & working on their on start up. | भेटा दोन इंजिनिअर मित्रांना- ऐन विशीत ते स्टार्टअप काढून उद्योगाला लागलेत!

भेटा दोन इंजिनिअर मित्रांना- ऐन विशीत ते स्टार्टअप काढून उद्योगाला लागलेत!

Next

-मनीष बूब

माझं वय 24 आणि माझा दोस्त जुनैद शेख 23 वर्षाचा आहे. आम्ही दोघांनी ठरवलं की, आपलंही स्टार्टअप असावं. म्हणून मग आम्ही विचार आणि अभ्यास करून  सॉफ्टवेअर, मोबाइल एप्लिकेशन आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात एक स्टार्टअप सुरू केलं. त्यामागची कल्पना अशी होती की, जनसामान्यांना भेडसावणारे दैनंदिन जगण्यातले प्रॉब्लेम डिजिटल स्वरूपात कशाप्रकारे सोडवता येतील.
आता आमचा प्रवास सुरू झाला आहे, मात्र मनात हे बरंच आधी रुजलं होतं. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात असताना एक प्रोजेक्ट करत होतो, तेव्हाच वाटलं की सॉफ्टवेअर क्षेत्रात काहीतरी नवीन करायला हवं. खासकरून ‘डिजिटल मार्केटिंग’ या क्षेत्रात काही कामं केलं, अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीने करता येईल. म्हणून मग सॉफ्टवेअर आणि मोबाइल एप्लिकेशनचा वापर करून दैनंदिन जीवनातील आणि व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठीचं काम, प्रयोग आम्ही सुरू केले. स्वतर्‍चा उद्योग सुरू करण्याचा विचार होताच. ‘कोएक्सिस टेक’ (ूी7्र2 3ीूँ) या नावानं स्टार्ट अपची सुरू केलं.
दरम्यान, कॉम्प्युटर इंजिनिअर झालो.  सुरुवातीला मी आणि जुनैदनं ठरवलं की अनुभव घेता यावा म्हणून नोकरी करायची. एका स्टार्टअप कंपनीतच एक वर्ष काम केलं. त्यातून सॉफ्टवेअर क्षेत्रात नेमके काय खाचखळगे असतात, कशाप्रकारे काम चालतं हे आम्ही शिकलो.
नोकरी करतानाच आम्ही रात्री रूमवर आलो की कामाला लागायचो. वेगवेगळ्या समस्या विचारात घेऊन काही सॉफ्टवेअर व एप्लिकेशन तयार केले. रात्रीची वेळ आम्ही आमच्या डेव्हलपमेण्टच्या कामाला देत होतो.
मग नोकरी सोडली. तो निर्णय सोपा नव्हता.   स्वतर्‍चा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. मेहनत तर घेतली होती; पण आता त्याची नेमकी सुरुवात कुठून करणार असा प्रश्न होता. ग्राहक वर्ग कसा तयार करणार? कारण ज्या व्यवसायात ग्राहक नाही तो व्यवसाय असूच शकत नाही आणि टिकूही शकत नाही. ज्या गोष्टी आम्ही शिकलो, जे सॉफ्टवेअर आम्ही बनवलं होतं ते लोकांर्पयत कशाप्रकारे पोहचवणार असा प्रश्न पडला. त्यात व्यवसाय म्हटल्यावर ऑफिस लागणार आणि त्यासाठी भांडवल लागणार, ते कुठून आणणार?  
मात्र सुदैवानं आमच्या आई-वडिलांकडून आमच्या निर्णयाला कुठलाही विरोध नसल्यानं आणि त्यांच्या आमच्यावर विश्वास असल्यानं आम्ही आमच्या राहत्या रूमवरून कामाला सुरुवात केली.
सुरुवातीला ओळखीतून काही छोटय़ा सॉफ्टवेअरची ऑर्डर आम्हाला मिळाली.  आमचं पहिलं सॉफ्टवेअर डिलिव्हर केल्यानंतर त्यातून जी रक्कम मिळाली त्याचा आनंद हा शब्दापलीकडचा आहे. ती रक्कम आणि तो आनंद आमच्या व्यवसायाचा निर्णय बरोबर आहे हेच सांगत होता.
चार महिन्यांनंतर आम्ही भाडेतत्त्वावर छोटं ऑफिस घेतलं. या काळात इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करून नवीन गोष्टी शिकलो. ज्याचा फायदा आम्ही आमच्या व्यवसायात करून घेतला. इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला परदेशातील सॉफ्टवेअरच्या ऑर्डर कशा मिळवता येतील हे शिकलो आणि त्याद्वारे आम्ही आमची पहिली ऑर्डर मिळवलीही.
आज 8-9 महिन्यांनंतर आमच्याकडे भारतातील 10-15 आणि परदेशातील 5-6 क्लायंट आहेत. हा आकडा जरी फार मोठा नसला तरी आम्हाला प्रेरणा देणारा आहे.
आमच्या व्यवसायाचा यूएसपी द4ं’्र38 कल्ल3ीॅ1ं3्रल्ल 6्र3ँ ू1ीं3्र5ी ्रल्लल्ल5ं3्रल्ल हा आहे. कारण सॉफ्टवेअर क्षेत्रात क्वॉलिटी हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय की, नवीन सॉफ्टवेअर मागील सॉफ्टवेअरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कसं करता असेल. जेणेकरून यूझर एक्सपिरीअन्स अधिक चांगला होईल.  
आम्ही मध्यमवर्गीय उद्योगांना कशाप्रकारे डिजिटल स्वरूपात सहाय्य करता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत. इ कॉमर्समुळे मध्यमवर्गीय उद्योगांना आपलं अस्तित्व टिकवणं खूप कठीण जात आहे. त्यांना डिजिटल युगात टिकाव कसा धरता येईल आणि व्यवसाय कसा वाढवता येईल यावर आम्ही काम करत आहोत. काळाची गरज समजून न घेता परंपरागत पद्धतीने व्यवसाय केला तर तो आजच्या डिजिटल युगात टिकु शकत नाही हे तर उघड आहे. त्यासाठीच आमचं स्टार्टअप मदत करत आहे.
आत्ता आम्ही मोबाइल एप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात सुविधा पुरवत आहोत. आत्ताच्या घडीला आमची टीम लिमिटेड आहे; परंतु आता आम्ही ती वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. भांडवल उभारण्याचा प्रय} करत आहोत. 
मध्यमवर्गीय उद्योगांना डिजिटल युगाशी जोडणं आणि कमी खर्चात त्यांचा उद्योग वाढवायला तंत्रज्ञान देणं हे आमच्या स्टार्ट अपचं ध्येय आहे.

 

Web Title: Meet two engineer friends, just 20 years old & working on their on start up.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.