मेहंदीवाला

By admin | Published: May 9, 2014 11:50 AM2014-05-09T11:50:40+5:302014-05-09T11:50:40+5:30

मुलींची मक्तेदारी मोडत प्रोफेशनल झालेलं एक पुरुषी काम

Mehndiwala | मेहंदीवाला

मेहंदीवाला

Next
 
लग्न ठरलं की नवर्‍या मुलीला हमखास विचारला जाणारा एक प्रश्न.
मेहंदीवाली शोधलीस.!
पण आता या प्रश्नाचं उत्तर, ‘हो, शोधलाय एक मेहंदीवाला’ असं कुणी दिलं तर चमकू नका.
कारण मेहंदी आणि मुली हे समीकरणच मोडीत काढत काही मुलं मेहंदी काढायला सरसावले आहेत आणि जे मुलींना जमलं नाही, ते त्यांनी करून दाखवलंय. मेहंदी काढणं हे काम प्रोफेशनली करत त्यांनी मेहंदी आर्ट स्टुडिओच सुरू केलेत.
त्यातलाच एक, मनीषकुमार.
 
मेहंदी निकालना, लडकीयोंका काम नही.
 
मेरे ग्रुप मे मेहंदी निकालनेवाले सारे लडकेही है. लडकीयोंको नहीं जमता ये काम ठीकसे.
रात्री उशिरापर्यंत चालतात मेहंदी लावायची काम, मुली उगीच कुरकुर करतात. लवकर जायचं घरी म्हणून. आणि आता लग्नात मेहंदी लावायचं काम हे फक्त नवर्‍या मुलीपुरतं उरलेलं नाही. लग्नात आलेल्या शंभर-दोनशे बायकांना मेहंदी लावायचे कॉण्ट्रॅक्ट्स आम्ही घेतो.
हे सारं करायचं तर प्रोफेशनल कंपनीच हवी. मी ती स्वत: पुण्यात सुरू केली. तिचं नाव शिवा मेहंदी आर्ट स्टुडिओ. आता पुण्या-मुंबईत आमच्या शाखा आहेत.पण मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे काय होतं. मी मूळचा इंदौरचा. मेहंदी काढता यायची. मग आम्ही जेव्हा व्यवसाय म्हणून हे सुरू केलं तेव्हा असं काही डोक्यातही नव्हतं की हे काम बायकांचं आहे. मी कसं करू? सगळं जमायला लागलं. आता अरेबिक, मुस्लीम, राजस्थानी, मारवाडी अशा सगळ्या पारंपरिक पद्धतीच्या मेहंदी आम्ही लावतो. त्याचे पॅकेज ठरलेले आहेत. दुल्हन मेहंदीचे वेगळे. ते २५00 रुपयांपासून पुढं सुरू होतात. बाकी प्रत्येक हाताचे शंभर रुपये असा रेट. लग्नात तर एकावेळी शंभराहून अधिक बायकांचे हात आम्ही रंगवतो. माझ्याकडे १५-२0 मुलं आहेत कामाला. त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलंय. माझा भाऊ राकेशकुमारही माझ्याबरोबरच काम करतो. 
माझा अनुभव एकच सांगतो, बायकांचं-पुरुषांचं असं काम काही वेगळं नसतं, फक्त तुम्ही केलेलं काम वेगळं दिसलं की लोक तुम्हाला मान देतात.
 
.हे ‘एवढं’ तरी हवंच.
 
१)  तुम्हाला चांगलं बोलता यायला हवं, बायकांना कन्व्हिन्स करणं सोपं नसतं.
२) त्यासाठी तुमच्या डिझाईन्स उत्तमच हव्यात.
३) हाताला उरक पािहजे आणि कामाचा झपाटाही.
 
मनीष कुमार, मेहंदी आर्टिस्ट

Web Title: Mehndiwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.