कानाचे पडदे फाटण्यापूर्वी..
By admin | Published: April 27, 2017 04:12 PM2017-04-27T16:12:17+5:302017-04-27T16:12:17+5:30
- किमान आठ गोष्टी.करायलाच हव्यात.
Next
- मयूर पठाडे
कर्णकर्कश, कंठाळी आवाजानं सार्यांच्याच आयुष्यावर विपरीत परिणाम होतो आहे.
सध्याच्या घडीला तरुणांचा त्यातला वाटाही खूप मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
परिसरातील वाढत्या गोंगाटाला अनेक जण, अनेक कारणं जबाबादार असली तरी तरुणांची लाईफस्टाईलही त्यात भर टाकते आहे हे नक्की.
अर्थातच या कंठाळी आवाजाच्या प्रदुषणात त्यांचा वाटा जसा वाढतो आहे, तसंच त्याचे परिणामही त्यांनाच जास्त भोगावे लागताहेत.
त्यासाठी काय कराल?
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
निदान आपल्यापुरती तरी काय काळजी घ्याल?.
1- 85 डेसिबल तीव्रतेच्या आवाजापासून तुमच्या कानांवर अत्याचार व्हायला सुरुवात होते. प्रत्यक्ष मीटर लावून हे आवाज मोजता आले नाही, तरी कोणता आवाज कर्कश आहे, हे तर आपल्याला कळतंच. त्यापासून आपला बचाव करा.
2- हेडफोन लावून म्युझिक ऐकू नका. त्यानं तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच.
3- म्युझिकचा आवाज कायम कमी ठेवा. लोकांना ऐकवण्यापेक्षा आपल्यालाच फक्त ऐकायला येईल एवढाच आपल्या म्युझिकचा आवाज ठेवा.
4- ज्या ठिकाणी आवाज खूपच लाऊड आहे, अशा ठिकाणी इअरप्लग्ज किंवा इअरमफ्स वापरा.
5- आपल्या आजूबाजूला खूप कानठळी आवाज नाही ना याकडे कायम लक्ष द्या. असेल, तर त्यावर आवाज उठवा.
6- लहान मुलांना या कर्कश, कंठाळी आवाजांपासून वाचवा. कारण त्यांचे कान खूपच संवेदनाक्षम असतात. त्यांच्यावर विपरित परिणाम झाल्यास त्याचे दुष्परिणाम त्यांना आयुष्यभर सोसावे लागतात.
7- आपले कुटुंबिय आणि मित्रमंडळी यांना कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम समजावून सांगा आणि त्यासंदर्भात जागरुकता करा, त्याचं मनपरिवर्तन करा.
8- आपल्याला कमी ऐकू येतंय अशी थोडी जरी शंका आली, तरी लगेच डॉक्टरांना दाखवा आणि त्यासंदर्भातल्या सार्या तपासण्या लगेचंच करून घ्या. उपचार सुरू करा.
किमान एवढं तर आपल्या हातात आहेच.
मग ते करायला काय हरकत आहे?