मामीहलापीनतपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:01 PM2017-07-19T17:01:28+5:302017-07-19T17:14:58+5:30
‘ए तू लिखता रहता है ना कुछ कुछ? बता, तेरा फेवरेट वर्ड कौनसा है?’‘अं.. कवडसा - मराठी शब्द है.’
- प्रसाद सांडभोर
कशाला हवा या शब्दाचा अर्थ?
‘ए तू लिखता रहता है ना कुछ कुछ? बता, तेरा फेवरेट वर्ड कौनसा है?’
‘अं.. कवडसा - मराठी शब्द है.’
‘... कवडसा ... साउंड नाईस, इस का मतलब?’
‘मतलब.. यार, हिंदी या इंग्लिशमें पता नहीं क्या कहते हैं पर किसी खिडकीसे या फिर पेड के पन्नो के बीच से जो रोशनी आती है ना - जिसमे धुल चमकती दिखती है - वैसीवाली धूप... दॅट इज कवडसा.
ओ! नाईस नाईस. हिंदीमें शायद झरोका कहते हैं. इंग्लिश नहीं पता!’
‘है ना? इसीलिये फेवरेट है - कवडसा!’
‘तेरा क्या है फेवरेट वर्ड?’
‘सॉँडर.’
‘मतलब?’
‘एस ओ एन डी ई आर - गुगल कर लेना!’
***
काही शब्दच मुळी असे की त्यांची मजा त्यांच्याच भाषेत. भाषांतराला वाव नाही. आणि केलं तरी ते एकदम कृत्रिमसं वाटणार. जपानी इकिगाय म्हणा किंवा याघन भाषेतला मामीहलापीनतपाई - काय सांगावेत या शब्दांचे अर्थ?
मुळात काही भावना, जाणिवा आणि नेणिवाच अशा शब्दांमध्ये बिलकुल व्यक्त न करता येणाऱ्या. त्यासाठी कधी एखादं चित्रच काढायला हवं किंवा कधी एखाद्या नृत्यातली एखादी मुद्रा करून दाखवायला हवी. एका घट्ट मिठीपुढे ‘धन्यवाद’, ‘थँक यू’ किंवा ‘सी यू, बाय बाय’ असे शब्द किती पोकळ वाटतात!
मग अशा शब्दांपलीकडल्या गोष्टी कशा बरं सांगायच्या?
पण त्या ‘सांगायच्या’ तरी का म्हणून?
कशाला एवढा अट्टाहास? शब्दांमधून व्यक्त होण्याचा? भाषांतराचा?
अशा गोष्टी असतात तशा नुसत्या अनुभवाव्यात.
***
तरीसुद्धा वर उल्लेख झालेल्या शब्दांचा अर्थ मराठीतून सांगण्याचा एक निष्फळ प्रयत्न.
मामीहलापीनतपाई = दोन अनोळखी माणसांदरम्यानचा एक शांत क्षण - जेव्हा दोघे एकमेकांकडे पाहतायत आणि विचार करतायत की मी नाही पण समोरची व्यक्ती आधी ओळख काढून बोलायला सुरुवात करेल!
इकिगाय = रोज सकाळी झोपेतून उठण्याचं कारण, जगण्याचं कारण, उद्देश.
सॉँडर = ?? (बोला ना, गुगल कर लेना!)