मीरा राजपूतने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस पाहिला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 03:32 PM2018-07-26T15:32:27+5:302018-07-26T15:34:46+5:30
मॅटर्निटी स्टाइलिंगच कशाला, तो एरव्हीही वापरता येईल!
- श्रुती साठे
करिना कपूर, मीरा राजपूत, सोहा अली खान या आणि इतर सेलेब्सनी प्रेग्नन्सीत टिपिकल कंटाळवाणे, ढिलेढाले कपडे न वापरता छान मस्त कपडे घातले. त्यांची मॅटर्निटी स्टाइल ही चर्चेचा विषय ठरली. त्या काळात करिना कपूर रॅम्प वॉक चालली. मीरा राजपूत तर सुंदर कपडय़ांत दिसली.
हा नवीन मॅटर्निटी स्टायलिंगचा प्रकारही सध्या चर्चेत आहे. मीरा राजपूतचे हटके मॅटर्निटी स्टाइल कपडे नक्कीच वापरायला सोपे, आरामदायी आहेत. अंबानींच्या घरच्या रिसेप्शनला मीराने घातलेला लेहेंगा आणि लांबीने मोठी असलेली चोली तिला सुरेख दिसलीे. भरजरी चोली आणि दुपट्टा आणि त्याला प्लेन जॉर्जेटचा लेहेंगा शोभून दिसला.
तिने वापरलेला पांढर्या रंगाचा शर्ट ड्रेस नक्कीच वापरायला सुटसुटीत आहे. लांब बाह्या, फ्रण्ट बटन आणि कंबरेला नॉट अतिशय साधे आणि सुंदर दिसले हे स्टायलिंग.
मीराने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस हा कॅज्युअल, पार्टी तसेच स्मार्ट फॉर्मल म्हणूनसुद्धा इतरवेळीही वापरला जाऊ शकतो.
नव्या काळात अनेक तरुण आया गरोदरपणात चांगले फॅशनेबल ड्रेस घालताना दिसतात.
मात्र त्यावेळीही काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या बर्या.
1. या दिवसांत घट्ट फिटिंगचे कपडे अतिशय त्रासदायी ठरतात. थोडे लूज, लांब बाह्यांचे, छातीला चुण्या किंवा पिन टक असलेले टॉप, ड्रेस, कुर्ते निवडा.
2. पॉलिस्टरऐवजी कॉटन, लिनन, रेयॉन, सिल्क यांना प्राधान्य द्या.
3. हिल्स, उंच टाचेच्या चप्पल जरूर टाळा. सध्या स्नीकर्स म्हणजेच रबरी सोल असलेले कापडी कॅज्युअल शूज ट्रेण्डमध्ये आहेत. वेगवेगळ्या रंगातले, प्रिण्टमधले जोड नक्की तुमच्याजवळ असूद्यात.
4. काढायला-घालायला सुटसुटीत असे फ्रण्ट हुक - बटनचे कुर्ते निवडा.