मिक्स मॅच
By admin | Published: June 9, 2016 05:45 PM2016-06-09T17:45:56+5:302016-06-09T18:02:14+5:30
स्टाईल मारायला जाल, तर पस्तावाल. बेसिक्सचा हात धराल, तर बनाल कॉलेजचे स्टाईल आयकॉन!
Next
>- प्राची खाडे
स्टाईल मारायला जाल,
तर पस्तावाल.
बेसिक्सचा हात धराल,
तर बनाल
कॉलेजचे स्टाईल आयकॉन!
निकालाच्या मौसमानंतर सुरू होतो
शॉपिंगचा मौसम.
कॉलेजला जायचं या एकाच भावनेनं अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत दणादण कपडे घेत सुटतात.
आपला लूक चेंज करायचा म्हणून हेअरस्टाईलच पार बदलून टाकतात.
आणि घरच्यांची अजिजी करत, थोडे जास्त पैसे मागत आपलं बजेट वाढवत नेतात.
मित्र म्हणतात अरे अमुक घे, मैत्रिणी म्हणतात तमुक घे म्हणून जे एरवी कधी घातलंही नसतं असं काहीबाही विकत घेत सुटतात.
आणि मग जातात कॉलेजात.
तिथं जाऊन आठवडा होत नाही तर लक्षात येतं की, आपण महागडे कपडे तर घेतले पण आता तेच ते कपडे घालतोय. सतत रिपीट करतोय. फॅशन भलतीकडेच आपण भलतीकडेच.
आणि आपल्या स्टाईलचा जो इम्पॅक्ट व्हायला हवा असं आपल्याला वाटलं होतं ते तर दूूरदूर्पयत काहीच घडलं नाही.
- असं का झालं?
का होत असेल?
त्याचं उत्तर एकच- आपलं शॉपिंग चुकलं, नव्हे शॉपिंगचा खयालच चुकला!
आधीच्या अनेक पिढय़ांनी जी चूक केली, ती तुम्ही करू नका आणि कॉलेजसाठीचं शॉपिंग करताना ‘बेसिक्स’ विसरू नका.
म्हणून तुम्ही खरेदी करायला जाणार असाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा- ‘स्टिक टू बेसिक!’
ते कसं?
त्याचीच चर्चा - तुमच्यासारखे तुम्हीच!