एक मिसळ, बारा पाव. लाल तर्री आणि तीन जण

By admin | Published: June 18, 2015 05:33 PM2015-06-18T17:33:13+5:302015-06-18T17:33:13+5:30

मिसळला ‘बेस्ट व्हेज फूड’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला खरा; पण त्या पुरस्काराहून मोठी आहे मिसळची फायर!

A mix, twelve pounds Red Lion and three people | एक मिसळ, बारा पाव. लाल तर्री आणि तीन जण

एक मिसळ, बारा पाव. लाल तर्री आणि तीन जण

Next
>मिसळ खायला लागणे हे महाराष्ट्रात तरी ब:याच ठिकाणी आपण तरुण झालो आणि आता स्वतंत्र झालो ह्याची अनाऊन्समेण्ट आहे. तेजतर्रार काळीभोर किंवा गर्द लाल मिसळीचा रंग आपणही आता जहाल झालो आहोत ह्याची जाणीव करून देतो. महाराष्ट्रात प्रतिष्ठा भावगीतांना असेल पण लोकांची आवड जशी लावणीच असते  तशी मिसळ खायला प्रतिष्ठा नाही. पण ती खाणो हे आपण आता रांगडेपणाच्या लीगमध्ये आलो आहोत हे स्वत:ला आणि जगाला ठणकावून सांगणे आहे.
त्यामुळे मिसळ खाणारा कोणत्याही वयाचा असो,  तिची तिखटजाळ चव जेव्हा जीभ जाळते 
तेव्हा कोणत्याही वयात आपल्यातला रांगडेपणा अजून गेला नाही ह्याची सुखद जाणीव मनाला देत राहते.
 
नुकताच मिसळला खवय्यांचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मला घरचाच कोणीतरी बोर्डात आल्याचा आनंद झाला.
मिसळ नावाच्या या पदार्थाने ज्याला वेड लावले नाही असा माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणो अवघड आहे. साधारण दहावीनंतर कॉलेजात गेल्यावर घरचा ‘राजस’ डबा मी नेणार नाही असे घरी सांगायचे बळ येते तेव्हा पहिल्यांदा हा ‘तामस’ पदार्थ आयुष्यात येतो. आयुष्य र्तीदार व्हायला खरी सुरुवात पण तिथूनच होत असावी. 
घराघरांत उसळीत फरसाण, कांदा घालून आणि ब्रेडबरोबर देता येण्याजोगा एक मिसळ वाटावा असा पदार्थ बनतोच. कौटुंबिक दडपणाखाली आपण तो खातोसुद्धा. पण त्याला हॉटेलात मिळणा:या मिसळीचा डौल नाही. 
मिसळ खायला लागणो हे महाराष्ट्रात तरी ब:याच ठिकाणी आपण तरु ण झालो आणि आता स्वतंत्र झालो ह्याची अनाऊन्समेण्ट आहे. तेजतर्रार काळीभोर किंवा गर्द लाल मिसळीचा रंग आपणही आता जहाल झालो आहोत ह्याची जाणीव करून देतो. महाराष्ट्रात प्रतिष्ठा भावगीतांना असेल पण लोकांची आवड जशी लावणीच असते तशी मिसळ खायला प्रतिष्ठा नाही. पण ती खाणो हे आपण आता रांगडेपणाच्या लीगमध्ये आलो आहोत हे स्वत:ला आणि जगाला ठणकावून सांगणो आहे. त्यामुळे मिसळ खाणारा कोणत्याही वयाचा असो, तिची तिखटजाळ चव जेव्हा जीभ जाळते तेव्हा कोणत्याही वयात आपल्यातला रांगडेपणा अजून गेला नाही ह्याची सुखद जाणीव मनाला देत राहते. कितीही गैरसोयीची असली तरी आजही बुलेट चालवायला जो रुबाब आहे तोच रुबाब मिसळ खायला आहे. कॅलरी मोजत खायचा हा भ्याड पदार्थच नाही. र्तीचा रंग जितका गडद तितके ती जास्त मागण्यात शौर्य अधिक! 
कॉलेज कॅण्टीनमध्ये मिसळ खायला जाणो या कृतीतच एक तोरा आहे. मुळात एकटय़ाने जाऊन गुपचूप भुरटय़ासारखी मिसळ खाताच येत नाही. मिसळ खायची तर जो जो भेटेल त्याला बोलावून, बरोबर घेऊन एकत्र जाऊन खायचाच हा पदार्थ आहे. कितीही पोरं ऐनवेळेला बरोबर आली तरी आपल्याकडे जितके पैसे असतील तितक्यातच सगळ्यांना पोटभर खायला मिळेल हा विश्वास फक्त मिसळच देऊ शकते ते तिच्या काही युनिक वैशिष्टय़ांमुळे. एक मिसळ, बारा पाव आणि तीन जणांनी पोटभर खाल्लं असे दुस:या कोणत्याच पदार्थाबाबत घडत नाही. र्ती किंवा रस्सा हा कधीही न संपणारा आणि हॉटेलवाल्याच्या नळालाच येणारा पदार्थ आहे यावर आमचा ठाम विश्वास होता. त्यामुळे तो कितीही वेळा मागितला तरी मिळेलच याची आम्हाला खात्रीच असायची. आमच्या कॅण्टीनवाल्याने पण त्याला कधी तडा जाऊ दिला नाही. जास्तीत जास्त र्ती ओतून मिसळ खाणो हे शौर्याचेच लक्षण होते. विशेषत: चार-पाच  पोरी बरोबर असतील तर त्यांनी उगाचच ‘आम्ही नाही जास्त र्ती खाऊ शकत’ असे म्हणायचे आणि मुलांनी मात्र भरपूर र्ती ओतून घेऊन आपले धाडस दाखवायचे हा खेळ टेबलाटेबलावर रंगायचा.
 
एकटय़ा मुलीबरोबर हॉटेलात जायला मिळण्याचे भाग्य फार कमी लोकांच्या वाटय़ाला यायचे आणि ज्यांच्या वाटय़ाला यायचे त्यांतल्या अनेकांनाही  कॅण्टीनपलीकडची लक्झरी परवडायची नाही. हे सगळेच फार विशेष लोक असायचे. 15/16 टेबलच्या गोंगाटात सेपरेट टेबल त्यांना मिळायचे, ते समोरासमोर किंवा शेजारीशेजारी आपापल्या धाडसानुसार बसायचे, मग त्या टेबलवर दुसरा कोणीही जाऊन बसायचा नाही, फक्त आपल्यालाच टेबलवर बसायला मिळणो हा सर्वोच्च सन्मान फक्त एकटय़ा मुलीबरोबर आलेल्या एकटय़ालाच मिळायचा, अन्यथा बाकी जिथे जागा मिळेल तिथे कोणीही बसावे असाच मामला असायचा. कॅण्टीनचा पो:या ह्या टेबलवर न सांगता फडका मारायचा. इतर वेळेला कितीही वेळा हाक मारली तरी स्वत:ला पाहिजे तेव्हाच येणारा पो:या त्या टेबलवाल्यांनी नुसती मान वर केली तरी हजर व्हायचा. 
       कॅण्टीनमधून बाहेर पडताना गल्ल्यावर बसलेल्या शेटला, ‘शेट आज नाही उद्या पैसे देतो’ असे सांगून टेचात निघून जाता यायचे आणि शेटही असल्या कॉलेजकंगालांचा मान ठेवायचा. माङो तेव्हा स्वप्न होते, कधीतरी आपल्या वाढदिवसाला सगळे कॅण्टीन बुक करायचे, आपल्या सगळ्या मित्रंना बोलवायचे आणि टेचात कॅण्टीनच्या पो:याला सांगायचे प्रत्येकाला सेपरेट मिसळ दे! कॉलेजात असताना तितके पैसे कधी जमले नाहीत आणि आज पैसे जमले तर तितके मित्र जमवता येणार नाहीत.   
किती वेळ कॅण्टीनमध्ये बसायचे आणि त्यासाठी किमान किती रु पयांचे बिल करायला हवे असले धोरणी हिशेब दोन्ही बाजूने नव्हते. आम्ही तर अनेकदा थेट कॅण्टीनमध्येच जायचो, तिथेच बसायचो आणि मग कॅण्टीन बंद व्हायची वेळ झाली की कॉलेज संपले असे समजून घरी निघून जायचो. 
दिवसाच्या कोणत्याही प्रहरात तेव्हा भूक लागायची आणि ती भूक फक्त मिसळनेच भागायची. कॉलेज सोडल्यावर तशी भूक कधी लागलीही नाही आणि तशी भूक कधी भागलीही नाही.
कॉलेज कॅण्टीनने जी मिसळीची सवय लावली ती कॉलेज संपल्यावर बाहेरच्या मिसळीच्या हॉटेल्सने सांभाळली. पंचतारांकित हॉटेल हे ज्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे त्यांनाही निदान रविवारी तरी पत्र्याच्या हॉटेलमध्ये बाकडय़ावर बसून मिसळ खात घाम गाळावासा वाटतोच. तिखटजाळ मिसळ रोजच्या धकाधकीत पिचलेल्यांना ‘तुङयातही अजून फायर आहे ह्याची जाणीव करून देते!’ आणि मग त्या फायरसाठी पुन्हा पुन्हा मिसळ खात राहावी लागते! 
त्या मुंबईच्या मिसळला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा माङयासारख्या अनेकांना वाटलं की, आमच्या गावची मिसळ जर परीक्षकांनी खाल्ली असती तर त्यांनी आमच्या गावच्याच मिसळीला पुरस्कार दिला असता! शेवटी आपल्यातल्यासारखा फायर दुस:या कोणात थोडीच असणार आहे, काय बोलता !!! 
 
- मंदार भारदे

Web Title: A mix, twelve pounds Red Lion and three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.