‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलांना काय ‘नकोसं’ वाटतं?

By Admin | Published: January 8, 2015 08:38 PM2015-01-08T20:38:36+5:302015-01-08T20:38:36+5:30

खरंतर ‘तिचा’ मोबाईल नंबर मिळवण्यासाठी ‘तो’ किती धडपड करतो. किती फिल्डिंगा लावतो. कधीतरीच एखादा मॅसेज येतो तिचा तर हरखून जाऊन तोच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचतो.

'Mobile love'; Do young children feel 'unwanted'? | ‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलांना काय ‘नकोसं’ वाटतं?

‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलांना काय ‘नकोसं’ वाटतं?

googlenewsNext
>सतत प्रश्न,नुस्त्या चौकशा 
 
खरंतर ‘तिचा’ मोबाईल नंबर मिळवण्यासाठी ‘तो’ किती धडपड करतो. किती फिल्डिंगा लावतो. कधीतरीच एखादा मॅसेज येतो तिचा तर हरखून जाऊन तोच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचतो. 
काहीजण तर ‘तिच्या’कडे मोबाईल नसेल तर पै-पै साचवून, उधारउसनवार्‍या करुन ‘तिला’ मोबाईलच गिफ्ट करतात. का तर, आपण सतत टचमधे राहू. जेव्हा वाटेल तेव्हा तिच्याशी बोलता येईल. तिच्या मैत्रिणींना भाव ैद्यायचीच गरज नाही.अनेकजण जर तर नियमित तिच्या मोबाईलचा रिचार्जही मारतात. आणि ज्यांना असा आर्थिक भुरदंड पडत नाही ते ही तिचं नाव ‘कॉलर’ म्हणून मोबाईलवर झळकलं की पिसाटल्यसारखे आनंदी होतात. काहीजण तर मित्रांमधे बढाया मारतात की, ती मला दिवसाला पाच-दहा फोन करतेच करते. आपण नाही केला तिला फोन तर शंभरदा करते, नाय उचलला तर लयीच  हायपर होऊन जाते, रडतेसुद्धा!
ही पत्रंच सांगतात की, आपण कसे तिला फार कॉल्स करत नाहीत, तीच सतत आपल्याला मिस कॉल मारते, हे मित्रांमधे बढा-चढाके बोलणं हेसुद्धा एक नवीन स्टेटस सिम्बॉल बनलं आहे.
हे सारं असं एकीकडे ‘दाखवलं’ जात असताना अनेक तरुण मुलं मात्र ‘तिच्या’ मोबाईल वर्तनाला कंटाळलेली असतात. जाम त्यांची आतून चिडचिड झालेली असते, आपण बांधले जातोय, आणि त्यातून सुटायचंय अशी धडपड सुरू असते. सतत आपल्यावर पहारा ठेवायला आणि प्रश्न विचारायला ती काही बायको नाही, बायको नसताना इतकं छळते, चुकून लग्नच केलं तर श्‍वास घेणं मुश्किल होईल असं अनेक तरुणांनी आपापल्या पत्रात वैतागून लिहिलेलं आहे.
जिच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे, जिच्याशी आपण तासंतास बोलतो, ती सतत आपल्यावर ‘डाऊट खाते’ अर्थात संशय घेते अशीच बहुतेकांची भावना. ती पोलीस आपण चोर, सतत थर्ड डिग्री लावल्यासारखं इंटोगेशन सुरू होतो, त्याचा भयंकर त्रास होतो असं ही मुलं सांगतात.
त्या पत्रातून एक यादीच हाती येते की, मुलींच्या ( म्हणजे खरंतर प्रेयसीच्याच) कुठल्या वागण्याचा मुलांना अतिशय त्रास होतो.आणि पार ब्रेकप करुन टाकण्यापर्यंत त्यांचं डोकं बिथरतं आणि ते ‘तिला’ टाळायला लागतात.
ही घ्या यादी.
१) ‘हॅलो, कुठेस?’ बोलण्याची सुरुवातच या शब्दांनी करते, ते पार डोक्यात जातं अनेकांच्या! सतत प्रश्न. कुठेस? कुणासोबत आहेस? पण आत्ता तर तू अमूक ठिकाणी जाणार होतास, मग तिकडे का गेलास? एका प्रश्नाचं उत्तर दिलं की पुढचा प्रश्न. प्रश्न टाळायचे म्हणून कमी बोललं की सुरू, काय झालं, असा का बोलतोहेस, माझ्यापासून काय लपवतोहेस?
२) त्यात सेण्टी प्रश्नांचा तडका. कधीही फोन करुन विचारणार, जेवलास?काय जेवलास? अजून नाही जेवलास, काय करत होता, मी कितीदा सांगते, असलं काही खाऊ नको, वजन वाढतं; माझ्या म्हणण्याची काही किंमतच नाही तूला.
बाई गं, कामाचं बोल! रोज तेच ते टिपीकल प्रश्न का विचारतेस, जेवेन नाही तर नाही, तूझी बोलणी ऐकूनच भरतं पोट! अवं सांगितलं तर मेलोच. 
३) कुणाशी बोलायचं स्वातंत्र्यच नाही, कारण सतत तिचा फोन येणार, जरा फोन बिझी लागला, कॉल वेटिंगवर गेला की तळफळाट. पुन्हा प्रश्न कुणाशी बोलत होता इतका वेळ?
४) आपण ऑफिसात, बॉस समोर, आणि तिचे फोन, मिसयू आणि लव्हयू चे एसएमएस, काय उत्तर देणार? डिस्ट्रॅक्शन होतं कामात, हे समजूनच घेत नाही. सतत माझ्याशी बोल, अरे काय बोल.? 
५) कधीकधी फोन करणार, काही बोलणारच नाही, फक्त हो/नाही, विचारलं तर म्हणणार काही नाही, आणि पुन्हा तीच टेप, तुला माझ्या मनातलं काही कळतच नाही. फोनवरुन हिचं मन कसं वाचणार, काय तो प्रॉब्लम सांग ना बाई एकदाचा; असं म्हटलं की लगेच अपमान होतो, लगेच भांडण.
६) तिच्या टोनचाच त्रास होतो, सतत रुबाब केल्यासारखा, आपण तिचे गुलाम असल्यासारखा आवाज. सतत प्रश्नात्मकच बोलणार, आणि आपण काही विचारलं की, लगेच स्त्री स्वातंत्र्यावर गदा.
७) मी काय घालायचं, कुणाशी बोलायचं, घरी काय सांगायचं, मित्रांना भेटायचं की नाही, आपण कधी भेटायचं, कितीदा फोनवर बोलायचं हे सारं ती ठरवणार , ते सारे ‘नखरे’ आम्ही झेलायचे, आणि यातलं काही तू कर म्हटलं की, येतेच पुन्हा स्त्री स्वातंत्र्यावर गदा.
८) कमी बोल, मुद्दयाचं बोल, महत्वाचं नसेल तर नंतर बोल, हे तिला सांगूनही कळतंच नाही. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते, तेच ते बोलते, सतत स्वत:विषयीच बोलते, आणि मला समजून घे म्हणते.पण गप्प काही बसत नाही.
९)आपण तिला फोन केला तरी प्रॉब्लम, नाही केला तरी प्रॉब्लम. बोललो तरी प्रॉब्लम, नाही बोललो तरी प्रॉब्लम. काहीही करा, तिचा पापड मोडकाच, पुन्हा वरुन चिकटपट्टी लावतेच, की तूला काही हार्टच नाही, माझ्या भावनाच कळत नाहीत. किती कन्फ्यूज कराल याला काही लिमिट आहे की नाही.?
१0) तिची सतत भूणभूण, सतत प्रश्न, सतत फोन करकरुन छळणं, सतत संशय, सतत मला समजून घे अशा डिमाण्डस, तिचे मूड स्विंग्ज, त्याप्रमाणे बदलणारे फोन आणि त्यावरचं बोलणं, यामुळे मी वैतागतो, खचतो, सैरभैर होतो, संपतो, हरतोच अनेकदा.
आणि नको होतो जीव, हे सारं तिला कळत कसं नाही, हा अनेक प्रेमात पडलेल्या मुलांचा थेट आणि रोखठोक सवाल आहे.

Web Title: 'Mobile love'; Do young children feel 'unwanted'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.