मोनालीचं लक्ष्य
By admin | Published: February 19, 2016 02:48 PM2016-02-19T14:48:51+5:302016-02-19T15:17:19+5:30
दक्षिण आशियाई खेळासाठी श्रीलंकन नेमबाजी संघाची प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं कोचिंग करिअर सुरू करणारी नाशिकची नेमबाज खेळाडू.
Next
>शूटिंग प्रशिक्षक आणि पंच हे वेगळ्याच वाटेचं
करिअर निवडणारी एक जिद्दी गोष्ट.
ऑक्सिजन टीम
तिनं शूटिंग हा खेळ पूर्णवेळ खेळायचा, त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलं तेव्हा नाशिक शहरात साधी शूटिंग रेंजही नव्हती.
पण या खेळावरचं तिचं एकचित्त प्रेमच असं की, शूटिंग खेळ म्हणून शिकताना, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा गाजवताना त्याच खेळात तिनं प्रशिक्षक म्हणून नाव कमावलं आणि आज ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची प्रशिक्षक आणि पंच आहे. आणि विशेष म्हणजे गुवाहाटीत नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई खेळात तिनं श्रीलंकन शूटिंग टीमची प्रशिक्षक म्हणून एक नवीन लक्ष्य गाठलं.
नाशिकची मोनाली गो:हे.
शूटिंगमध्ये खेळाडू म्हणून नाव कमावणा:या अनेक मुली आहेत पण शूटिंग याच खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक आणि पंच म्हणून काम करण्याचा बहुमान मोनालीनं पटकावला आहे. शूटिंग या खेळात एक अत्यंत नव्या आणि अतिशय डिमाण्डिंग, गुणवत्तेची कसोटी पाहणा:या करिअरची वाट ती चालते आहे.
हा प्रवास सुरू कसा झाला, हे विचारलं तर मोनाली सांगते, ‘1999मध्ये मी एमपीएससीची तयारी करत होते. पोलीस खात्यात काम करण्याची इच्छा होती. तेव्हाच नाशिकमध्ये निवृत्त पोलीस महासंचालक आणि क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम सरांची भेट झाली. सरांनी शूटिंग या खेळाशी एका कॅम्पमध्ये ओळख करवली. त्याआधी साहस शिबिरात हौस म्हणून शूटिंग केलं होतं, पण तेवढंच. शूटिंग शिकताना हातात बंदूक घेऊन गोळ्या मारायला मजा आली. त्यानंतर मग दुस:या शूटिंग कॅम्पसाठी मी छोटीमोठी कामं करायला बाम सरांच्या मदतीला गेले. त्यानंतर रोज शूटिंगचा सराव सुरू झाला. तेव्हा नाशिक शहरात शूटिंगची रेंजही नव्हती. पण खेळ आवडू लागला आणि बाकीचे सारे खेळ बंद करून मी शूटिंगवर लक्ष केंद्रित केलं. 2क्क्3 मध्ये ‘साई’चा इन्स्ट्रक्टर म्हणून कोर्स केला. शिकवणंही सुरू झालं. त्या काळात लक्षात आलं की, शिकवण्याचं स्कील आपल्यात आहे. म्हणून मग प्रोफेशनली कोचिंगही सुरू केलं. आणि मग शूटिंग या खेळातला माझाच एक वेगळा प्रवास सुरू झाला!’
त्यानंतर फिनलण्डला जाऊन मोनालीनं इंटरनॅशन शूटिंग फेडरेशनचा कोचिंग कोर्स केला. त्यात उत्तम यश मिळवून ती प्रशिक्षक म्हणून आणि शूटिंग स्पर्धाची पंच म्हणून काम करू लागली.
आणि आता त्यापुढचा एक अत्यंत वेगळा टप्पा तिच्या वाटय़ाला आला. कुणाही प्रशिक्षकाचं एखाद्या दुस:या देशातल्या टीमला तयार करणं, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून काम करणं हे स्वप्न असतं. तशी संधी तिला मिळाली आणि श्रीलंका शूटिंग फेडरेशनने तिला शूटिंग कोच म्हणून काम करण्याची विनंती केली.
मोनाली सांगते, ‘एका देशाच्या संघाचं प्रशिक्षक होणं ही खूप मोठी जबाबदारी असते. त्या देशाची, त्या फेडरेशनची प्रतिष्ठा तुमच्यावर अवलंबून असते. आणि त्यांनाही रिझल्ट्स हवे असतात. दुस:या देशाच्या टीमशी रॅपो तयार करून त्यांच्याकडून उत्तम खेळ करवून घ्यायचा असतो. महिला कोच वगैरे असे प्रश्न सुदैवानं आले नाहीत, त्या तरुण टीमनंही माङयावर विश्वास दाखवला आणि श्रीलंकेचा संघ घेऊन मी आशियाई स्पर्धेत उतरले.’
मोनालीकडे प्रशिक्षण घेणा:या तीन खेळाडूंनी दिल्लीत झालेल्या ट्रायल स्पर्धेत आपापले नॅशनल रेकॉडर्स मोडले. आणि आशियाई स्पर्धेत तर तीन सांघिक पदक अशी नऊ पदकं आणि एक व्यक्तिगत शूटिंग पदकही जिंकलं! नोव्हेंबर 2क्15पासून श्रीलंकन प्रशिक्षक म्हणून तिचा प्रवास सुरू झाला आणि आता पुढची काही वर्षे ती श्रीलंकन तरुण शूटर्सना प्रशिक्षण देणार आहे.
मोनाली सांगते, ‘ एक काळ होता की, मुलगी आणि शूटिंग हे दोन शब्द एकत्र उच्चरले गेले की लोक चकीत होत. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. आता शूटिंग हा खेळ मुलीच डॉमिनेट करत आहेत, या खेळात मुली संख्येनंच बहुसंख्य नाही तर यशही मिळवत आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांचे पालक त्यांना आता पाठिंबा देत आहेत. ही एक आशेची गोष्ट आहे. खेडय़ा-पाडयात नसला तरी शहरात हा बदल जाणवतो आहे.’
अशा अनेक बदलांची साक्षिदार होत, श्रीलंकेच्या बहुतांश सैन्यदल आणि पोलिसांत काम करणा:या खेळाडूंचा ताफा घेऊन मोनाली गुवाहाटीत दाखल झाली. भाषा, राष्ट्र यांचे भेद बाजूला सारून सर्वस्वी खेळभावनेतून तिनं त्यांचा खेळ उंचावण्याचा प्रय} केला, हेच तिचं यश म्हणायला हवं!