बहुगुणी ऊसाचा रस

By Admin | Published: April 1, 2017 06:41 PM2017-04-01T18:41:56+5:302017-04-01T18:41:56+5:30

नाकातून रक्त येत असल्यास,रक्तशुद्धीसाठी उपयुक्त

Multicolored sugarcane juice | बहुगुणी ऊसाचा रस

बहुगुणी ऊसाचा रस

googlenewsNext
>उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच चौकाचौकात रसवंती गृहांची घुंगरे वाजू लागतात. नेमका हा काळही लग्नसराईचा असल्याने लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळात बाहेर पडतात आणि मग शॉपिंगनंतर हुश्श म्हणून थंडगार रस प्यायला पावले आपोआपच रसवंतीकडे वळतात. 
किंचित आंबट लिंबाची चव, किंचित तिखट आल्याची चव आणि भरपूर गोड ऊसाची स्वत:ची चव असा हा अप्रतिम संयोग असतो; ज्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते आणि त्यासाठीच लहान थोर सगळ्यांनाच रस प्यायला खूप आवडतं.
 
 
आयुर्वेदाने उसाला एक प्रकारचं गवत मानलं आहे. पूर्वीपासून भारतात उसाचे गुण , त्यापासून रस काढणे आणि मग गूळ किंवा साखर तयार करणे हे सगळं माहित होतं. त्यामुळे ग्रंथांमधून ऊसाचे गुणही दिलेले आढळतात.
ऊसाचे जवळ जवळ तेरा प्रकार वर्णन केले आहेत आणि त्यानुसार त्यांचे विभिन्न गुणही वर्णन केले आहेत, पण आपल्याला त्याचे साधारण गुण जरी माहित असले तरी पुरेसे आहेत .
ऊस हा मधुर रसाचा , गुणाने थंड आहे . त्याचा महत्वाचा गुण म्हणजे तो मूत्नल आहे. याचा अर्थ असा की उसाचा रस प्यायल्याने लघवी साफ होते , मोकळी होते. उन्हाळ्यात अनेकांना मूत्नप्रवृत्तीचे वेळी आग होणे, तिडीक लागणे किंवा गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे असे त्नास जाणवतात. त्यांनी अधून मधून रस पिण्यास हरकत नाही .
रक्त आणि पित्त यांना रस नियंत्नणात ठेवतो, त्यामुळे नाकातून रक्त येत असल्यास ऊसाचा रस उपयोगी आहे. तो रक्तशुद्धि करणारा आहे त्यामुळेच काविळीच्या रु ग्णांना उसाचा रस पिण्यास सांगितले जाते.
थंड गुणाचा असल्याने उन्हाच्या वेळी पिणे हितकर आहे.
www.ayushree.com

Web Title: Multicolored sugarcane juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.