स्टीव्ह जॉब्जचं आत्मचरित्र वाचलं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:11 PM2018-06-28T15:11:59+5:302018-06-28T15:13:31+5:30

ज्याला सर्वोत्तम होण्याचा ध्यास त्यानं वाचायलाच हवं असं पुस्तक

must read : Steve Jobs autobiography | स्टीव्ह जॉब्जचं आत्मचरित्र वाचलं का?

स्टीव्ह जॉब्जचं आत्मचरित्र वाचलं का?

Next
ठळक मुद्देस्टीव्ह जॉब्जने 2005  साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दीक्षाग्रहण समारंभाच्या वेळी केलेलं भाषण नक्की ऐका. भाषणाचं नाव आहे, ‘स्टे हंगरी, स्टे फुलीश’

-प्रज्ञा शिदोरे   

स्टीव्ह जॉब्जने 2009  साली आपलं चरित्र लिहिण्यासाठी जेव्हा वॉल्टर आयझ्ॉकसनची निवड केली तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. आयझ्ॉकसनने आजर्पयत अनेक अमेरिकन महापुरु षांची चरित्रं ज्यांनी अमेरिकेचा आणि जगाचा इतिहास घडवला अशांची व्यक्तिचित्रं उभी केली आहेत. यामध्ये बेंजामिन फ्रॅँकलिन आणि अलबर्ट आइनस्टाइन ही नावं स्टीव्ह जॉब्ससाठी सर्वात महत्त्वाची. पण, आश्चर्य या गोष्टीचं होतं की जॉब्जने स्वतर्‍चं चरित्र स्वतर्‍च का नाही लिहिलं? एवढय़ा मोठय़ा कामासाठी दुसर्‍या व्यक्तीवर विश्वास कसा टाकला?
पण तो टाकला खरा. पुस्तकाचं काम सुरू होण्याआधी अर्थात जॉब्ज आणि आयझ्ॉकसन यांच्यात अनेक भेटी झाल्या. जॉब्जने त्याला एक ‘उत्तम’ ब्रिफ दिल्यावर आपल्या घरी काही काळ राहायला बोलावलं. आजर्पयत तो जिथे जिथे राहिला होता, तिथे जाऊन प्रत्यक्ष गोष्टी पाहून आल्यावरच लिखाणाला सुरुवात झाली. 
स्टीव्ह जॉब्जचं कुटुंब, त्याचा युनिव्हिर्सिटी सोडण्याचा निर्णय, गॅरेजमध्ये सुरू झालेलं त्याचं पाहिलं ऑफिस. मायक्र ोसॉफ्टबरोबर झालेला संघर्ष. अ‍ॅम्पल कंपनीची स्थापना. स्वतर्‍च्याच कंपनीमधून हाकलून दिलं जाणं. पिक्सर या अ‍ॅनिमेशन फिल्म कंपनीची स्थापना, पुन्हा स्वतर्‍च्या कंपनीमध्ये परतणं, हा सगळा प्रवास वॉल्टर आयझ्ॉकसनने उत्तम प्रकारे रेखाटला आहे. आयझ्ॉकसन समोर एका बाजूला टेक्नॉलॉजीमध्ये सर्वोत्तम आणि दुसरीकडे योग, मेडिटेशन करणारा, स्वतर्‍च्या डाएटमध्ये, ते आपल्या शरीराला आणि निसर्गाला अनुसरून राहावं म्हणून सतत प्रयोग करणारा असा एक हिप्पी, अशा दोन व्यक्तींचं एकत्रित चित्न उभं करायचं आव्हान होतं. ते आव्हान त्यानं उत्तमरीत्या सांभाळलं आहे.         
स्टीव्ह जॉब्जबद्दल आयझ्ॉकसनने लिहायला घेतलं, तेव्हा जॉब्ज बराच आजारी होता. त्या कठीण काळात वॉल्टरला जॉब्ज कुटुंबीयांना भेटायची परवानगी होती. पण अशा नाजूक प्रसंगांची कुठेही गरजेपेक्षा अधिक वाच्यता त्यानं केली नाही. 
स्टीव्ह जॉब्जने वॉल्टरला ‘मी या पुस्तकाच्या लिखाणात तुला कुठेही आडकाठी करणार नाही’, असं वचन दिलं होतं. पण केवळ पृष्ठावर मला थोडं काम करू दे, असं तो म्हणाला होता. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जॉब्जचा प्रभाव नक्कीच ओळखता येतो. 
हे पुस्तक म्हणजे स्टीव्ह जॉब्जची फक्त ओळख असं नक्कीच नाही. ज्यांना आपल्या आयुष्यात सर्वोत्तम व्हायचं आहे, स्वतर्‍ला आणि जगाला सतत प्रश्न विचारत राहायचं आहे आणि मुख्य म्हणजे त्यावर उत्तरं शोधायची आहेत, अशा सर्वानी हे पुस्तक वाचलंच पाहिजे!
या पुस्तकाचा मराठीत अनुवाद विलास साळुंके यांनी केला आहे.  ज्याला जगण्याचा ध्यास आहे त्यानं नक्की वाचावं, असं हे पुस्तक आहे.
त्यासोबत  स्टीव्ह जॉब्जने 2005  साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दीक्षाग्रहण समारंभाच्या वेळी केलेलं भाषण नक्की ऐका. भाषणाचं नाव आहे, ‘स्टे हंगरी, स्टे फुलीश’. लिंक अर्थातच यू टय़ूबवर उपलब्ध आहे.

 

Web Title: must read : Steve Jobs autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.