मायेची पुरचुंडी
By admin | Published: October 27, 2016 04:06 PM2016-10-27T16:06:18+5:302016-10-27T16:06:18+5:30
जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा? हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही... सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं?
जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा?
हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही...
सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं? सोडून गेलं कुणी म्हणून रडायचं की नशीब किती चांगलं होतं म्हणून एकत्र जगलो.. सुख वाटून घेतलं म्हणून हसायचं..
हसलो तर सुख वाढतं..
हसऱ्या आठवणींचा मलम मनावर माया करतो
त्या मायेनं मिटावेत डोळे,
मनापासून करावी प्रार्थना की,
त्या माणसानं परत यावं..
तसं केलं तर मन एकाकी होत नाही,
मायेच्या आठवणींची पोटली
रिकामीही होत नाही
पुरचुंडीभर ती माया सोबत घेत
‘भूतकाळाकडे’ करावी पाठ
आणि उद्याला म्हणावं वेलकम बॅक!!
उद्याच्या जगण्यात काल कधी नसतो,
पण आजच्या जगण्यात उद्या मूळ धरतो..
आनंदाचं पाणी घातलंच त्या मुळांना
तर आजही बहरतो..
आपणही बहरतो..
बहर येण्याला काही कुणी
सोबत असण्यानसण्याचा मुहूर्त नसतोच..