नाचो रे
By admin | Published: May 26, 2016 11:03 PM2016-05-26T23:03:45+5:302016-05-26T23:03:45+5:30
नाचणा-या ‘रॉ’ आनंदाची एक सुंदर पण बिंधास्त गिरकी. काजोल आठवते?
Next
वरातीत, गणपतीत, लग्नात नाचणा-या‘रॉ’ आनंदाची एकसुंदर पण बिंधास्त गिरकी. काजोल आठवते? कभी खुशी कभी गममधली? ‘टोली आयी, टोली आयी’ म्हणत धावत सुटणारी,
बिंधास्त नाचणारी, दिलखुलास! स्वत:तच हरवलेली, अत्यंत आनंदानं ढोलाच्या प्रत्येक बिटवर स्वत:त जास्तीत जास्त हरवत जाणारी.
हे असं नाचणं, स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी तर असतंच; पण त्यावेळी आपल्याला जगाचंही भान नसतं आणि आपण ‘अमुकतमुक आहोत, आपल्याला शोभतं का?’ असा सावध व्यवहारी मामलाही नसतो.
दुनियेला काय वाटायचं ते वाटो, असा उद्धटपणाही नसतो.
कारण कुणी आपल्याला पाहतंय का?
कुणी काही म्हणतंय का? कुणी हसतंय का?
या सा:याच्या पलीकडे असतं हे, ‘वाटलं, म्हणून नाचलो’ फिलिंग!
आणि मग असे बेभान नाचणारे आपल्याला कुठल्याही वरातीत दिसतात.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत तर हमखास दिसतात.
घरगुतीच कशाला पण कार्पोरेट पार्टीतही दिसतात.
एरवी चेह:यानं अत्यंत सालस, गंभीर वाटणारेही असे ‘नाचायला’ लागले की वेगळेच भासतात.
त्याक्षणी त्यांच्या चेह:यावरचा आनंदच नाही, तर त्यांची देहबोलीच एकप्रकारे थिरकत असते.
सध्या अशाच ‘रॉ डान्स’ची आणि ती करणा:या आनंदी, बिंधास्त जिवांची जगभर चर्चा आहे.
आपल्याकडे त्या चर्चेचं फार काही कौतुक नाही, कारण आपल्याकडे हा वरात आणि गणपती डान्स सर्रास केला जातो.
पण त्या चर्चेला निमित्त दिलं ते ङिांगाट गाण्यानं.
त्याच्यावर नाचणा:या फुल एनर्जीवाल्या गावोगावच्या पब्लिकनं.
त्यात बडय़ा शहरातलं पबवालं क्राऊड आहे आणि गावखेडय़ातलं थेटरात जाऊन नाचणारं पब्लिक आहेच.
पण हे फक्त नाचणं नाही. नाचण्यापुरतं मर्यादित नाही.
आपल्याला वाटेल तसं नाचायचं आणि स्वत:च्या मनावरची दु:खाची, अपेक्षांची आणि कंटाळ्याची ओझी उतरवून मोकळं व्हायचं हे सांगणारा हा एक जुनाच पण नव्यानं चर्चेत असलेला बिंधास्त ट्रेण्ड आहे.