नागा कटरू

By admin | Published: June 14, 2016 09:01 AM2016-06-14T09:01:59+5:302016-06-14T09:01:59+5:30

गुगलमध्ये नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? भारतातील टॉप कॉलेजमधली मुलं अशी नोकरी मिळावी म्हणून जीवाचा आटापीटा करतात. नाही गुगल तर, सिलिकॉन व्हॅलीमधील कोणत्याही कंपनीचा शिक्का आपल्यावर उमटावा हेच स्वप्न घेऊन ते शिकत असतात. यामागे गलेगठ्ठ पगार हे तर कारण आहेच; पण अमेरिकेत नोकरी करण्याचं आकर्षण जास्त कारणीभूत आहे.

Naga cutter | नागा कटरू

नागा कटरू

Next

 त्याचं नाव नागा कटारू. तो ‘गुगल अलर्ट’चा निर्माता आहे.  आता शेती करतो आहे.

 
 
गुगलमध्ये नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? भारतातील टॉप कॉलेजमधली मुलं अशी नोकरी मिळावी म्हणून जीवाचा आटापीटा करतात. नाही गुगल तर, सिलिकॉन व्हॅलीमधील कोणत्याही कंपनीचा शिक्का आपल्यावर उमटावा हेच स्वप्न घेऊन ते शिकत असतात. यामागे गलेगठ्ठ पगार हे तर कारण आहेच; पण अमेरिकेत नोकरी करण्याचं आकर्षण जास्त कारणीभूत आहे. 
नागा कटारूदेखील आयआयटीचं शिक्षण पूर्ण केल्यावर 2000 साली ‘गुगल एम्प्लॉयी’ झाला. पण आयुष्यभर गुगलमध्ये नोकरी करण्यात धन्यता मानणा:यांपैकी तो नव्हता. काही तरी नवीन आणि वेगळे करण्याच्या ओढ होती म्हणून त्यानं गुगलची नोकरी सोडून आयुष्याला नवीन वळण दिलं. सध्या तो कॅलिफोर्नियामध्ये बदामाची शेती करतो. 
त्याची ही प्रेरणादायी काहाणी..
आंध्रप्रदेशमधील गम्पालगुडेम हे नागा कटारुचे गाव. नव्वदच्या दशकात (किंबहूना आजही!) जशी गावांची स्थिती होती तशीच गम्पालगुडेमचीही होती. शिक्षणाच्याबाबात मागासलेलं ते गाव. हजेरीपटावरील केवळ अर्धेच मुलं रोज शाळेत हजर राहत असत. 
नागा सांगतो, शिक्षण घेणं हे गावासाठी ‘पर्यायी’ किंवा ‘ऐच्छिक’ होते. परंतु माङो वडीलच शाळेचे हेडमास्तर असल्यामुळे मी शिकावं असा त्यांचा आग्रह होता. 
लहानपणापासून अभ्यासात हुशार नागाने पदवीसाठी ‘कॉम्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ची निवड केली. इथंच त्याचा आणि संगणकाचा पहिला संबंध आला. पुढे त्यानं आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. ‘आयआयटी’नंतर त्याची गुगलमध्ये निवड झाली. 
25  वर्षीय नागासाठी ही खूप मोठी गोष्ट होती; पण त्यावेळी गुगल आजसारखी एवढी मोठी कंपनी नव्हती.  त्याने गुगल जॉईन केलं तेव्हा 11क् कर्मचा:यांच्या या स्टार्ट-अप कंपनीत केवळ 39 इंजिनिअर्स काम करायचे. इंटरनेटच्या कायापलटाचा तो काळ होता. 
तंत्रज्ञान हेच भविष्य असणार याची जाणीव ठेवून तो विविध प्रयोग करू  लागला. एका ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचारातून त्याला गुगल अलर्टची कल्पना सुचली. लोक एखाद्या गोष्टी विषयी जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतात. पण जर गुगलने स्वत:हून ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यावर तात्काळ यूजर्सर्पयत पोहचवली तर? 
याच तत्वावर त्यानं ‘गुगल अलर्ट’चा प्रोटोटाईप बनवला.
सर्वात आधी त्याने जेव्हा ही संकल्पना त्याच्या बॉससमोर मांडली तेव्हा त्याने ती साफ फेटाळून लावली. त्याचं म्हणणं होतं की, ‘आपण जर यूजर्सना स्वत:हून माहिती पुरवली तर ते कशाला गुगलवर सर्च करतील? अशाने कंपनीचा व्यावसाय कसा होणार?’
मात्र या नकारामुळे नागा खचुन गेला नाही गेला. स्वत:च्या संकल्पनेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो थेट कंपनीचे संस्थापक सर्गेय ब्रिन आणि लॅरी पेजकडे गेला. त्यांना ‘गुगल अलर्ट’ची संकल्पना समजावून सांगितली. दोघांनाही ती खूप आवडली. त्याचं पेटंटही नागाला मिळालं. 2क्क्3  मध्ये ‘गुगल अलर्ट’ लाँच झाल्यापासून कोटय़ावधी लोक त्याचा वापर करत आहेत.
नागा सांगतो, तंत्रज्ञ म्हणून गुगलनेच माङया क्रिएटिव्हिटीला ख:या अर्थानं चालना दिली. विचारांचं आणि प्रयोगाचं एवढं स्वातंत्र्य मी प्रथमच अनुभवत होता. नव्या गोष्टी जाणून घ्यायला, निर्माण करायला मला मुक्त वातावरण मिळालं ते इथेच! पण आठ वर्षे गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर त्याला काही तरी नवं करण्याची ओढ शांत बसू देईना. माङया डोक्यात विचारांची घुसमट होत होती. आयुष्याच्या इतर वाटादेखील मला धुंडाळायच्या होत्या.’
डोक्यात जेव्हा विचारांचं काहूर माजू लागलं तेव्हा त्यानं नोकरीचा राजीनामा दिला आणि माहितीपट निर्मिती आणि ‘प्रयोगशील’ नाटय़क्षेत्रत उडी घेतली. येथेसुद्धा त्याची मेहनत कामी आली. जगप्रसिद्ध इम्प्रुव्ह थिएटर ग्रुप ‘सेकंड सिटी’चा सदस्य होण्याचा त्याला संधी मिळाली. टिना फे आणि एमी पोहलर यांसारखे कलाकार या ग्रुपचे सदस्य राहिलेले आहेत.
काही काळ तेथे काम केल्यानंतर त्याने पुन्हा ‘गिअर’ बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने निवडलेली वाट जरा अधिकच धाडसी आणि इतरांना आश्चर्यचकित करणारी होती. त्याने ‘शेती’ करण्याचा निर्णय घेतला.
कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे 2क्क्8 साली त्याने 32क् एकर शेती विकत घेतली. तो सांगतो, ‘सुरुवातीला शेती करण्याचा माङया विचार नव्हता. एक गुंतवणूक म्हणून मी जमीन खरेदी केली होती. मला वाटलं पाच वर्षानंतर जास्त किंमतीत ती विकून टाकू. पण डोक्याचं चक्र  पुन्हा फिरलं. ही शेतजमीन त्याला बालपणाची आठवण करून देऊ लागली. लहानपणी भारतात असताना अनुभवलेला फुलं-फळांचा सुगंध त्याला खुणावू लागला. म्हणून मग त्याने या जमीनीवर ‘फुलटाईम’ बदामाची शेती करण्याचे ठरवलं. इथर्पयत ठीक होते पण; शेती कशी करतात याची त्याला काहीच कल्पना नव्हती.
मग सुरू झालं शेतीचे शिक्षण. कोणतीही गोष्ट इच्छा असेल तर शिकता येते यावर त्याचा दृढ विश्वास. मेहनत आणि अभ्यास करून त्यानं शेतीचे तंत्र शिकून घेतलं. अक्षरश: घाम गाळून त्यानं बदामाच्या शेतीत नफा मिळवून दाखविला. आज तो शेतीतून दरवर्षी 2.5 मिलियन डॉलर्सचे (16.7 कोटी रु) उत्पन्न घेतो. 
एवढे करूनही नागा शांत बसण्याच्या मुडमध्ये नाही. 
आता त्यानं स्वत:समोर नवीन ‘चॅलेंज’ ठेवले आहे.
ते चॅलेंज म्हणजे शेतीला अधिक टेक्नो सॅव्ही करणं. तंत्रज्ञानचा शेतीसाठी अधिकाधिक स्मार्ट वापर कसा करता येईल याचा तो प्रयत्न करत आहे.
त्यासाठी तो सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए आणि ‘इन्वायरन्मेन्ट अँड रिसोर्सेस’ या विषयात एमएस  करत आहे. तो म्हणतो, सिलिकॉन व्हॅलीपासून इतक्या जवळ असुनही शेतीमध्ये म्हणावा तितका तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत नाही. एक तंत्रज्ञ म्हणून यामध्ये सुधार करण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
केवळ कुतूहल आणि उत्सकुता कायम ठेवली म्हणून नागा आता एक वेगळा प्रवास करत मजेत जगतो आहे!
 
 
-मयूर देवकर

 

Web Title: Naga cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.