एनसीसीतली कमाई
By admin | Published: June 9, 2016 04:52 PM2016-06-09T16:52:03+5:302016-06-09T16:52:03+5:30
सैनिक या तीन अक्षरातच भली मोठी ताकद आहे. आज अनेक तरुण मुलं-मुली एका नव्या उमेदीने, एका नव्या पॅशनने रक्षण दलात भरती होत आहेत.
Next
>थेट कझाकिस्तानात जाऊन लष्करी शिस्तीचा अनुभव घेणा-या ठाण्याच्या कुणालची जिद्द.
सैनिक या तीन अक्षरातच भली मोठी ताकद आहे. आज अनेक तरुण मुलं-मुली एका नव्या उमेदीने, एका नव्या पॅशनने रक्षण दलात भरती होत आहेत. अशाच एक देशप्रेमाने संतृप्त झालेल्या व भारतीय संरक्षण दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करणा:या कुणाल सिंघवी या तरुणाची ही गोष्ट.
कुणाल हा ठाण्यातील बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्न सेनेचा (एनसीसी) कॅडेट असून, त्याची भारतातून एनसीसी युथ एक्सचेंज प्रोग्रामसाठी निवड झालेली आहे. कुणाल हा मुलुंडच्या एम. सी. सी. महाविद्यालयात बँकिंग आणि इन्शुरन्सच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. परंतु लहानपणापासून भारतीय संरक्षण क्षेत्नाबद्दल आकर्षण असल्याने तो महाविद्यालयात आल्यावर एनसीसीत सहभागी झाला. 2015 मध्ये त्यानं बेस्ट एनसीसी कॅडेट पारितोषिक मिळवलं. त्यानंतर कुणाल प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा:या एनसीसी परेडच्या चमूसाठी निवडला गेला. दिल्ली येथे झालेल्या चाळीस दिवसांच्या कॅम्पमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय स्तरावर एनसीसीमध्ये कुणालने अनेक पारितोषिके मिळवली. युथ एक्सचेंज प्रोग्राम कॅम्पमध्ये कुणालची निवड प्राइम मिनिस्टर रॅलीसाठी झाली. त्यानंतर लेखी परीक्षा, गट चर्चा, परेड ह्याड्रिलिंग, ड्रील व मुलाखत या सर्व चाचण्यांतून कुणाल अव्वल ठरत गेला.
अनेक चाचण्या पार केल्यावर संपूर्ण भारतातून निवडल्या गेलेल्या 12 जणांत कुणालचा समावेश झाला. आणि त्याला कझाकिस्तानला जाण्याची संधी मिळाली. ‘अचिव्हमेण्ट ऑफ इंडिया’ या विषयावर त्याला सादरीकरण करायचं होतं. संपूर्ण लष्करी शिस्तीची दिनचर्या, ड्रील, युद्धातील गोष्टींची माहिती, नवनव्या ठिकाणी भेट देणं यांसह लष्करात जगण्याची रीत समजून घेणं असा हा उत्तम अनुभव आहे, असं कुणाल सांगतो.
या अनुभवाच्या जोरावर पुढे भारतीय भूदल संरक्षण सेवेत जाऊन देशाची सेवा करण्याचा त्याचा मानस आहे. बांदोडकर महाविद्यालयाचे एनसीसीचे प्रा. बिपीन धुमाळे, प्राचार्य डॉ. सौ. माधुरी पेजावर, प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर न्यायते यांना आपल्या या विद्याथ्र्याच्या कामगिरीचं सार्थ कौतुक आहे.
- अपूर्वा आपटे