ब्रेकअप-मेकअपचे नवे फंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 07:55 AM2021-02-11T07:55:11+5:302021-02-11T08:00:31+5:30
Sorry, I am practising social distancing.
-प्रतिनिधी
कोरोना काळात लोक ‘एकेकटे’ झाले. कोरोनाने दिलेला आणखी एक आजार म्हणजे ‘लोनलीनेस’ यावर बहुसंख्यांचं एकमत आहे. मात्र या काळात नात्यातही बरंच काही घडलं-बिघडलं. जे घरातच चोवीस तास एकत्र राहत होते, ते ही वैतागले आणि जे प्रेमात होते पण दूरदूर राहत होते ते ही विरहाने, परस्परांना न भेटता आल्यानं हुरहुरत राहिले.
त्यावरच समाज माध्यमात अनेक जोक्स, अनेक फॉरवर्डस, ट्वीटस पडले.
त्यातले अनेक ट्वीटस विनोदी होते, तर काही अत्यंत करुण, दु:खद. काही रोमँटिकही होते आणि काही विरहाने कातरलेले.
त्यातलंच हे एक ट्वीट, जे अगदी कॉमन होतं. अनेकांना सोशल मीडियात कळवलं की, कोरोनामुळे आम्ही आमचं लग्न पुढे ढकलतो आहोत, रहित करतो आहोत. यावर्षी लग्न करणार कळवलं होतं, ते आता शक्य नाही.
हे असं जगजाहीर सांगताना अनेक जोडप्यांना त्रास झाला, मात्र त्यांनी कॉमन पोस्ट लिहिल्या. काहींनी तर ब्रेकअप झाला हे सुद्धा जगजाहीर सांगितलं. लिहिलं की, Sorry, I am practising social distancing.
इतक्या कमी शब्दात ब्रेकअप एरव्ही कधीही झाला नसता असं म्हणत या ट्वीटवर अनेक मिम्स पडले. काहींना ते दु:खद वाटलं तर काहींना ते भयंकर साधं सोपं प्रॅक्टिकल वाटलं.
सेइंग येस, असं म्हणत काहींनी अंगठ्यांसह साखरपुडा झाल्याचेही फोटो पोस्ट केले.
एकूणच या काळानं प्रेम करणाऱ्यांचं वागणंबोलणंही बदललंच!