NH 44 जायचंय ना रोड ट्रिपवर ?

By admin | Published: October 20, 2016 04:16 PM2016-10-20T16:16:47+5:302016-10-20T16:16:47+5:30

कन्याकुमारी ते श्रीनगर हा प्रवास करणारी एक भन्नाट रोड ट्रिप, पाहिली ना मागच्या अंकात तिची झलक? पूर्ण ट्रिपचीच गोष्ट वाचायची आहे, मग आता ‘लोकमत दीपोत्सव’ हा दिवाळी अंक आता सर्वत्र उपलब्ध आहेच..

NH 44 goes on an uncharted road trip? | NH 44 जायचंय ना रोड ट्रिपवर ?

NH 44 जायचंय ना रोड ट्रिपवर ?

Next
>..कोण म्हणतं देश फिरायला पैसे लागतात?
कन्याकुमारी ते काश्मीर..
या रोड ट्रिपवर आम्ही बाहेर पडलो..
तुम्हाला वाटलं असेल, मजा आहे, गाडीनं प्रवास, उत्तम सोय, काही आर्थिक चणचण नाही..
ते खरंय, ऑफिसनं खाण्यापिण्याची व्यवस्था, गाडीचं पेट्रोल यासाठी म्हणून पुरेसे पैसे सोबत दिले होतेच! पैशाची अडचण अजिबात नव्हती. पण आम्हीच ठरवलं की, ही रोड ट्रिप आहे, तो मूड सोडायचा नाही. रोडसाईड जे मिळेल ते खायचं, जिथे सोय होईल तिथं रहायचं! रस्ता हेच आपलं घर, आणि त्या रस्त्यावर भेटणारी माणसं जशी राहतात तसंच आपण रहायचं.. खायचं प्यायचं!
आणि पहिल्या काहीच दिवसात आमच्या लक्षात आलं की, फार पैसे नाही लागत आपला देश फिरायला, मनसोक्त भटकंती करायला!
कारण मुळात आम्ही कोण,कुठले, आमची पदं, त्यासाठीची ओळखपत्र असं काही कुणी विचारलं नाही. ( अपवाद फक्त हॉटेलात मुक्कामाची सोय करताना द्यावी लागलेली ओळखपत्रं!)
उलट आम्ही असे ‘देश’ पाहत फिरायला निघालोत असं कळलं की, लोक आवर्जुन बोलायचे. जेवणाखाण्याचा आग्रह करायचे आणि त्याचे पैसेही नकोत म्हणून दोस्तीच्या नात्यानं आम्हाला निरोप द्यायचे, असंही घडलं.
कन्याकुमारीजवळच्या एका छोट्या गावात तर झोपडीवजा घरातली एक बाई माझ्या घरीच जेवायला या असा आग्रह करत होती, तो ही खाणाखुणा करुन! दुपारच्या टळटळीत उन्हात आम्ही तिला विचारलं की, जवळ कुठं हॉटेल आहे का, जेवायला?
तर ते नव्हतंच, म्हणून त्या बाई आम्हाला आग्रह करत खाणाखुणा करत म्हणत होता, ‘ हॉटेल इल्ले, कम, कम, कम!’
ही अशी किती उदाहरणं सांगता येतील. किती माणसं, किती किस्से. ज्यांनी प्रेमानं, अगत्यानं आम्हाला आपण या रोड ट्रिपवर मायेनं साथ दिली. त्यामुळे देशात प्रवास करणं, फिरणं हे काही फार महागडं प्रकरण नव्हे. अट एकच, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास करावा, सुरक्षित, सोयीची, स्वच्छ जागा बघून मुक्काम करावा. आणि साधंसुधं जे जे म्हणून ‘लोकल’ जेवण मिळतं, ते जेवावं!
अजून काय लागतं फिरायला..
तरीही आम्ही जी काय भटकंती केली, त्यातून तुमच्यासाठी या काही टिप्स..
* रोडसाईड उत्तम,सुरक्षित, रात्री पाठ टेकवण्यापुूरती अनेक हॉटेल्स मिळतात. एसीबिसीची चंगळ केली नाही तर काही शे रुपयात उत्तम सोय होऊ शकते.
* याशिवाय धर्मशाळा, धार्मिक स्थळं इथंही अत्यंत माफक दरात राहण्याची सोय होते. देशात सर्वत्र धार्मिक पर्यटन जोरात असल्यानं राहणं आणि आंघोळीपुरतं गरम पाणी एवढी सोय अत्यंत कमी पैशात होऊ शकते.
* तेच खाण्यापिण्याचंही. रोडसाईड खाण्यापिण्याची सोय कमी पैशात कुठल्याही हॉटेलात होते. जे जे स्थानिक ते ते खायचं. बिंधास्त. स्वस्तात. नाकं मुरडायची नाहीत.
* याशिवाय बस, ट्रेननं प्रवास केला तर कमीत कमी पैशात आपला देश पाहून होऊ शकतोच!
* हे एवढं केलं तरी मायेनं माणसं तुमची विचारपूस करतात, परत येताना श्रीमंत झाल्यासारखं वाटतंच..
-टीम एनएच ४४
 
 
स्वत::साठी घ्या, स्नेहीजनांना दिवाळी भेट पाठवा ! याशिवाय भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था : deepotsav.lokmat.com

Web Title: NH 44 goes on an uncharted road trip?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.