नथिंग आॅफिशियल अबाउट इट!

By admin | Published: July 28, 2016 05:33 PM2016-07-28T17:33:28+5:302016-07-28T17:48:13+5:30

गेल्या रविवारी एका महत्त्वाच्या घटनेला पंचवीस वर्षं झाली, त्याबद्दल कुणी बोललं का तुमच्याशी?

Nothing official about it! | नथिंग आॅफिशियल अबाउट इट!

नथिंग आॅफिशियल अबाउट इट!

Next

गेल्या रविवारी एका महत्त्वाच्या घटनेला पंचवीस वर्षं झाली, त्याबद्दल कुणी बोललं का तुमच्याशी?
२४ जुलै १९९१ या दिवशी नरसिंह राव सरकारचे अर्थमंत्री या नात्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प मांडला आणि भारतीय अर्र्थव्यवस्थेची दारं खुली झाली. कोणाही देशाच्या आयुष्यात एका फटक्यात वर्तमान आणि भविष्याच्या वाटाच बदलून टाकणारे असे प्रसंग क्वचित येतात आणि अशा काळाच्या पोटी जन्मलेल्या त्या देशाच्या तरुण पिढीला क्वचितच कुणाला मिळाली असेल, अशी संधी मिळते... संकटंही मिळतात!
- आज तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत असाल, स्कॉलरशिप घेऊन परदेशात शिकायला निघाला असाल, इथे बसून अमेरिकेची बॅक आॅफिसं सांभाळत मोठी ‘पॅकेजं’ मिळवत असाल.
एवढंच कशाला, स्वत: गे किंवा लेस्बियन असल्याचं स्वच्छ सांगण्याची हिंमत करत असाल, ‘लिव्ह इन’ सारखे आॅप्शन्स ट्राय-आउट करत असाल आणि इंडियाबद्दल ‘प्राउड’ फील करणारे मेसेजेस पोस्ट करत असाल...
तर या सगळ्या-सगळ्याचा संबंध आहे २५ वर्षांपूर्वी सताड उघडलेल्या अर्थव्यवस्थेच्या दारांशी!

Web Title: Nothing official about it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.