अब बहौत हो गया!

By admin | Published: August 20, 2015 03:08 PM2015-08-20T15:08:12+5:302015-08-20T15:08:12+5:30

हे जेव्हा आतून वाटतं, तो क्षण व्यसनमुक्तीसाठी एक नवी सुरुवात ठरतो!

Now it is multiplied! | अब बहौत हो गया!

अब बहौत हो गया!

Next
 
 
व्यसन एकच असलं, तरी माणसं वेगवेगळी असतात. हे व्यसन आपलं काय नुकसान करतंय याची जाणीव होण्याचे त्यांचे क्षणही निराळे असतात. त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आणि त्यासाठी करायचे प्रयत्नही वेगळे ठरतात..
 
‘शिकल्यासवरल्या माणसांना आपल्याला आजार झाला आहे हे खूप फटके मिळाल्याशिवाय मान्य होत नाही’ हे विधान मला काही केल्या हजम होईना. मात्र ‘आनंदयात्री’ नावाचा अंक चाळताना एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात खूप मजेदार वाटेल असा अनुभव एका समुपदेशकाने लिहिला होता. त्याला एकदा कोणीतरी विचारलं, ‘‘सर, तुमचं प्रत्येक रुग्ण-मित्रशी वेगळं नातं होतं आणि नंतर ते तुमच्या संपर्कात राहतात याचं गमक काय?’’ 
त्याचं उत्तर म्हणून त्यांनी त्या लेखात एक युक्ती सांगितली होती. मनुने सांगितलेले चार वर्ण म्हणजे चार वृत्ती असतात असे त्यांना वाटते. या वृत्तींचा जाती, धर्म आणि शिक्षण यांच्याशी काहीही संबंध नसतो. पण ज्या कामांशी जो वर्ण जोडला गेला आहे त्या अनुसार आपण त्या नावांकडे पाहिलं तर माझं काम सोपं होईल असं वाटतं. शूद्र वृत्तीची माणसं साधी सरळ, भक्तिभावाने काम करणारी असतात. त्यांना नेहमीच गुरूची गरज भासते. त्यांना फक्त आज्ञा पालन करणो यातच पुरुषार्थ वाटत असतो. अशी वृत्ती जर एखाद्या व्यसनी माणसात आढळली तर त्या व्यक्तीच्या मनात आपले आदराचे स्थान निर्माण करण्यावर भर द्यावा लागतो. ते स्वत:च्या व्यसनमुक्तीची खडतर समस्या सांगतात. माङया खोल व्यसनात बुडालेला माणूस जर व्यसनमुक्त होऊ शकतो, तर हे कुणालाही जमू शकतं हा संदेश ते कोणतीही शंका न घेता स्वीकारतात. आणि आजाराची जुजबी माहिती दिल्यावर, विशेषत: शारीरिक नुकसानीची माहिती दिल्यावर ते समुपदेशकावर अधिक विश्वास ठेवू लागतात. त्यांना जर सांगितलं की तंबाखू-दारूमुळे तुङया लैंगिक जीवनावर कायमचा परिणाम होऊ शकतो तर त्यांना अचानक भीतीयुक्त आदर वाटू लागतो. खरे पाहिले तर समुपदेशनशास्त्रत भीतीयुक्त आदराला स्थान नाही. व्यसनाधीनतेतून बाहेर पडायला मदत करण्यासाठी हे तंत्र कधी कधी वापरावे लागते. एकदा अशा प्रकारचा आदर निर्माण झाला की तो आपण जे सांगत असतो त्या प्रमाणात तो तसे वागायचा प्रयत्न करतो. काही वेळा चुकतो तेव्हा रागवायचं. चांगलं वागला तर कौतुक करायचं! तेही भरभरून. व्यसनी व्यक्तीला अनेक दिवसांत कौतुकाचे शब्द कुणी बोललेलेच नसतात. त्यामुळे सूर जुळतात आणि सरांना वाईट वाटेल असे काही करण्याचे तो टाळतो. अर्थातच तो सुधारणोच्या दिशेने प्रवास करू लागतो.
वैश्य वृत्तीची व्यसनी मंडळी पैसा या गोष्टींबद्दल प्रचंड असरक्षित असतात. व्यसनाच्या काळात स्वत:चे सर्व पैसे संपल्यापासून कर्जबाजारी होईर्पयत त्यांना पैशाच्या असुरक्षितपणाचा अनुभव असतो. ते अनेकदा उद्याच्या पैशाची तजवीज करण्यात वेळ घालवतात आणि हातात जे काही पैसे आहेत तेही व्यसनात घालवतात. अशा वृत्तीच्या माणसांना उपचार देताना व्यसन केल्यामुळे तुङो किती पैसे खर्च झाले या गोष्टी वारंवार दाखवून द्याव्या लागतात. मग ते मोठाले आकडे पाहून ‘आपण याचा कधीच कसा  विचार केला नाही’ हा प्रश्न त्यांना पडतो. मग एक भावनिक आयाम सांगावा लागतो. उदा. अरे मित्र, तुङो जे पाच लाख रु पये वाचले असते ते आत्ता बहिणीच्या लग्नाला उपयोगी पडले असते की नाही? किंवा आज तुङयाकडे सायकलसुद्धा नाही. मुलांची हौसमौज करता येत नाही. हेच जर पैसे तू दारूत घालवले नसतेस तर मुलांना इंग्लिश मीडियम शाळेत घालता आले असते. अशा माणसांना नफा-तोटय़ाची जाणीव नेहमीच सुधारण्याच्या विचारांना प्राधान्य देते. मग त्याला आम्ही मित्र वाटू लागतो.
काही जण क्षत्रिय वृत्तीचे असतात. जिंकू किंवा हरू पण लढू असे त्यांचे ब्रीद असते. दारू थांबवणो, मोहावर ताबा ठेवणो म्हणजे त्यांना त्यांची स्वत:ची हार वाटते. म्हणून वाईट अनुभव येऊनसुद्धा ते पुन्हा पुन्हा दारूशी लढत राहतात. आणि हरतात. पण आपली हार यावेळी का झाली याच्या विश्लेषणात ते अडकतात आणि पुन्हा नव्याने वेगळ्या रीतीने दारूवर चाल करतात. असा अहंकार धरून ते परत व्यसनाच्या चक्र ात अडकतात.
अशा व्यक्तींशी बोलणो फार सावधानतेने करावे लागते. दारूची शक्ती आपल्यापेक्षा महान आहे हे मान्य करणं त्यांना ङोपत नाही. तो त्यांच्या ताकदीचा आणि क्षमतेचा अपमान वाटतो. अशा व्यक्तींना सुरुवातीला फक्त माहिती देण्याचे काम करून द्यावे लागते. आणि व्यसनमुक्तीसाठी अपरिहार्य बंधनांना ढील द्यावी लागते. ‘अब बहौत हो गया’ असं जोवर त्यांना आतला आवाज सांगत नाही, हा महत्त्वाचा क्षण असतो.  मुक्तांगणच्या मते तो सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. तिथूनच ख:या अर्थाने एक नवी सुरुवात होते. 
प्रत्येक व्यसन आणि व्यसन रुग्ण- मित्र यांच्यासाठी वेगवेगळी पद्धत शोधून, त्यांना समजावून, व्यसनमुक्तीच्या वाटेवर एकेक पाऊल टाकावे लागते.
 
- मनोज कौशिक 
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो. 
 

 

Web Title: Now it is multiplied!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.