‘आॅक्सिजन’चा आता आॅनलाइन वाचक कट्टा
By admin | Published: June 16, 2016 11:55 AM2016-06-16T11:55:47+5:302016-06-16T12:30:11+5:30
तुम्हालाही लिहायचंय, मनातलं काहीतरी शेअर करायचंय? ‘आॅक्सिजन’मध्ये आपलंही नाव झळकावं असं वाटतंय? तर मग पेन उचला,
‘आॅक्सिजन’चा आता आॅनलाइन वाचक कट्टा
तुम्हालाही लिहायचंय,
मनातलं काहीतरी शेअर करायचंय?
‘आॅक्सिजन’मध्ये आपलंही नाव झळकावं असं वाटतंय?
तर मग पेन उचला,
आणि लिहा मनापासून!
आता ‘आॅक्सिजन’ टीम तुम्हाला देतेय एका नवीन संधी
थेट आॅनलाइन लिहिण्याची!
तिथं शब्दमर्यादेची अट नाही.
निवडक आणि उत्तम लेख आता थेट आॅनलाइनच प्रसिद्ध होतील.
तुमचे लेख आम्हाला
oxygen@lokmat.com वर मेल करा.
आणि आपले लेख
www.lokmat.com/oxygen
वर नक्की वाचा!
- आॅक्सिजन टीम
पाऊसक्षण
आपले ‘यादगार’ पावसाळी फोटो आम्हाला पाठवा;
आणि आॅनलाइन पाऊस वाटून घ्या!
आता पाऊस सुरू होईल..
मग पावसाळी पिकनिक..
चहाभजी-ट्रेकिंग-कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा..
मस्त पावसात भटकंती, ट्रेकिंग..
हे सारे क्षण जगत आपल्या कॅमेऱ्यात बंदही होतील.
आपण ते आपल्या मित्रांना पाठवू किंवा सोशल साइट्सवर शेअर करू..
पण त्यापलीकडे काय?
तुमचे हे पाऊसक्षण वाटून घेता आले तर?
शब्दात तर आपण पाऊस मांडतोच, यंदा क्षणचित्रातून मांडू!
तुम्ही काढलेले पावसाचे फोटो,
तुमच्या ग्रुपचे, निसर्गाचे, एखाद्या यादगार क्षणाचे
किंवा सुंदर पावसाळी दिवसांचे..
ते आम्हाला मेल करा. आणि तुमचे हे पाऊस फोटो
वर अपलोड होतील!
आणि मग तेच फोटो तुम्ही ‘शान’से दोस्तांसोबत
शेअरही करू शकाल!
त्यामुळे करायचं एवढंच,
तुमचे ‘पाऊस फोटो’
आम्हाला वर मेल करा.
आणि आपल्या आनंदाचा पाऊस वाटून घ्या..
-आॅक्सिजन टीम
आॅक्सिजन वाचा, आता रोज
आॅनलाइन
भेटूच,
आॅक्सिजन टीम,
तुम्ही आम्हाला रोज का भेटत नाही?
रोज का ‘आॅक्सिजन’ छापत नाही?
आॅक्सिजनचे लेख रोज वाचायला मिळाले तर किती मजा येईल,
प्लीज रोज छापा..
- असं म्हणणारे किती पत्रं, किती ईमेल्स तुम्ही आम्हाला आजवर पाठवले.
किती विनंती केली की, रोज भेटा!
पण दर शुक्रवारी भेटणारी साप्ताहिक पुरवणी रोज रोज भेटीस कशी यावी?
मात्र आता आम्ही ठरवलंय की,
तुमची ‘रिक्वेस्ट’ एकदम मान्यच करून टाकायची...
रोज भेटायचं तुम्हाला!!!!
- विश्वास नाही बसत?
पण हे खरंय!
आता ‘आॅक्सिजन’ तुम्हाला रोज वाचता येईल!
रोज भेटता येईल. रोज नवनवीन लेख वाचता येतील. आपला हवाहवासा मित्र रोज भेटण्याचा आनंद कमवताना ही भेट कुठेही, कधीही, चोवीस तास होऊ शकते याची खात्रीही बाळगता येईल! आणि आमच्या संपर्कात राहत आपल्या मनातलं व्यक्तही करता येईल!
कुठे?
आॅनलाइन!
इथं रोज.. नियमित..
ही रोजची भेट अजिबात चुकवू नका!
- आॅक्सिजन टीम