.अब हम भी है मैदान में!
By admin | Published: June 4, 2015 02:52 PM2015-06-04T14:52:54+5:302015-06-04T14:52:54+5:30
ज्यांना देव मानलं, ज्यांची स्वप्न पाहिली, अशा ‘स्टार क्रिकेटर्स’बरोबर थेट ड्रेसिंग रूमच शेअर करायचा चान्स मिळतो, तेव्हा काय होतं?
Next
श्रेयस अय्यर, सरफराज खान, शादरुल ठाकूर, सिध्देश लाड, निखिल नाईक, डॉंमनिक जोसेफ मुथूस्वामी, केदार जाधव यांचे IPL चे ताजे अनुभव
आयपीएल..
- नावाचं एक अत्यंत चकचकित, ग्लॅमरस पैसेवालं जग!
त्या जगात क्रिकेट आहे, नव्हे ते जग क्रिकेटभोवतीच फिरतं,
पण म्हणून आयपीएल फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित नाही.
क्रिकेटचं पॅशन आहेच, पण सोबत वेगवान थरार आहे, कमालीची स्पर्धा आहे आणि त्यासोबतच तुफान एन्जॉय करायला लावणा:या पाटर्य़ा आहेत..
क्रीझवर दिसणारं फुटवर्क डान्स फ्लोअरवरही दाखवायला भाग पाडणारं एक जादुई बेफाम जग आहे.
त्या जगात जाऊन राहून आल्यावर कसं वाटत असेल?
ज्या जगात सचिन तेंडुलकर भेटतो, ज्या जगात जॉण्टी :होडस गाइड करतो, ज्या जगात कुंबळे, द्रविड, सेहवाग यांना जवळून पाहता येतं.
आणि धोनी, कोहली, युवराज सिंग डी-व्हिलियर, ख्रिस गेल अशा कितीतरी मोठमोठय़ा इंटरनॅशनल स्टार्ससोबत खेळता येतं?
ज्या जगाचा भाग होणं हेच एक स्वप्न असतं, त्या जगाचा भाग झाल्यावर
तिथं ‘टिकणं’ हे काय आव्हान असेल?
- आपण टिकू का या स्पर्धेत अशी भीती वाटत असेल का?
एक मॅच वाईट गेली की, आपण कायमचे आउट असं कमालीचं प्रेशर असेल का?
एकीकडे टीम स्पिरीट दाखवायचं आणि दुसरीकडे सगळ्यात चांगलं परफॉर्म करत स्वत:ला सगळ्यांपेक्षा सरस सिद्ध करायचं याहून अवघड काय असेल?
मुंबईतल्या कुल्र्यात राहणा:या
17 वर्षाच्या सरफराजला
क्रिस गेल माझ्या लग्नाला येच,
असा आग्रहच करतो,
तेव्हा काय होतं?
डॉमनिक, पुण्याचा.
बंदुकीच्या गोळ्या बनवणा:या
कारखान्यात काम करतो,
वयानं तिशी गाठलेली,
पण त्याला थेट गॅरी कस्टर्नच मॅसेज करतो,
तेव्हा काय होतं?
मुंबईचा श्रेयस अय्यर,
दिलवाले दिल्लीकर त्याच्यासाठी
वेडेच झालेत ते का?
क्रिकेटचा देव असलेला
सचिन जेव्हा म्हणतो की,
हा मुलगा खूप गुणाचा आहे,
तेव्हा काय वाटलं असेल
मुंबईच्या शार्दुलला?