ऑफिसात ढसढसा रडताय?

By admin | Published: April 2, 2015 06:06 PM2015-04-02T18:06:09+5:302015-04-02T18:07:09+5:30

कुणी कितीही हुशार असो, किती कामसू, अत्यंत जबाबदार असो, कामात चुका होतातच!

The office is crying? | ऑफिसात ढसढसा रडताय?

ऑफिसात ढसढसा रडताय?

Next
>
कुणी कितीही हुशार असो, किती कामसू, अत्यंत जबाबदार असो,
कामात चुका होतातच!
बॉस झापणारच!
कधीकधी तर आपली काहीच चूक नसते, तरी बोलणी खावी लागतात.
कधी तर आपली पगारवाढच होत नाही, कधी सहकारी त्रास देतात म्हणून बॉसला सांगायला जावं तर बॉस आपल्यालाच तासणार!
त्यात आजारपण, बॉयफ्रेण्ड/गर्लफ्रेण्डशी भांडणं, घरचं टेन्शन अशी सतराशे साठ कारणं असतात.
- ऑफिसात डोळ्यात पाणी येण्याची!
विशेषत: मुली ! थोडं काही झालं की हमखास रडणारच!
तेही ढसढसा. सारं ऑफिस गोळा करणार! सगळ्यांची सहानुभूती. सल्ले, रडायला खांदा-रुमाल सगळं गोळा करणार!
या सगळ्यातून काय होतं?
- होतं इतकंच की, तुम्ही उल्लू, अत्यंत इनमॅच्युअर्ड आहात हे सिद्ध होतं. लोक तुमच्याविषयी गॉसिप करतात. हसतात तुम्हाला!
आणि हे सारं वारंवार झालं की, कुणीही तुम्हाला सिरियस्ली घेत नाही!
तुमच्या रडक्या डोळ्यांची फक्त चेष्टा होते.
ऑफिसात रडणं हे वेस्टर्न कल्चरमध्ये अत्यंत अनप्रोफेशनल मानलं जातं!
पुढच्या वेळी ऑफिसात ढसढसा रडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.
---
तुमची नवीन नोकरी आहे?
खेड्यातून शहरात, शहरातून मोठय़ा शहरात शिकायला आला आहात?
आणि ऑफिसात काम करताना अनेक अडचणी येतात?
अगदी वागण्या-बोलण्यापासून कपड्यांपर्यंत
आणि मॅनर्स-एटिकेट्सपासून भाषेपर्यंत?
तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी येतात?
किंवा केवळ मॅनर्स माहिती नव्हते म्हणून तुम्ही चेष्टेचा विषय झालात, तुम्हाला त्रास झाला असं काही घडलं आहे का?
काही ऑफिस मॅनर्स-एटिकेट्स तुम्ही स्वत: शिकलात किंवा कुणी तुम्हाला शिकवले असतील तर ते नेमके कोणते?
लिहा तुमचा अनुभव-
पाकिटावर शिष्ट-अशिष्ट असा उल्लेख करायला विसरू नका.

Web Title: The office is crying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.