ओझं
By admin | Published: October 27, 2016 03:54 PM2016-10-27T15:54:41+5:302016-10-27T15:54:41+5:30
वजनाचा आकडा. मार्कशिटवरच्या लाल रेषा. मार्कांचे बिचारे टक्के. कुणाकुणाचे आता कधीही डायल करावे न लागणारे फोननंबर.. कुणी कुणी दिलेल्या, आणि आता फक्त छळणाऱ्या भेटवस्तू..कुणी कुणी कधी कधी केलेले अपमान.. कुणी मारलेले टोमणे कुणाच्या रोखून पाहणाऱ्या नजरा.. आॅफिसात मिळालेले मेमो.. वडिलांनी दिलेले फटके..
पाठीवरचं बोचकं
वजनाचा आकडा. मार्कशिटवरच्या लाल रेषा. मार्कांचे बिचारे टक्के. कुणाकुणाचे आता कधीही डायल करावे न लागणारे फोननंबर.. कुणी कुणी दिलेल्या, आणि आता फक्त छळणाऱ्या भेटवस्तू..कुणी कुणी कधी कधी केलेले अपमान.. कुणी मारलेले टोमणे कुणाच्या रोखून पाहणाऱ्या नजरा..
आॅफिसात मिळालेले मेमो.. वडिलांनी दिलेले फटके..
शेजारच्यांनी दिलेला त्रास..
मित्रानं केलेला घात..
मैत्रिणीनं दिलेला दगा.
ब्रेकपनं भिजले रुमाल
परीक्षेतलं अपयश
हे सारं काय आहे?
- ओझं.
ते ओझं आपण मनावर सतत वागवतो.
कधी मनाच्या माळ्यावर आतल्या बाजूला ठेवतो.
कधी बाहेर काढून उस्तवार करतो.
कधी ते बदाबद आपल्या अंगावर पडतं..
आणि मग आपण ते तसंच ठेवून देतो कोंबून
मग ते डोकावत राहतं कुठकुठून...
हे सारं का करतो आपण?
ते ओझं उतरवून नाही ठेवता येणार?
दिवाळीत माळ्यावरच्या अनेक अडगळीच्या गोष्टी भंगारात देतो,
तसं भंगारात नाही काढता येणार?
उगीच चोंबाळत बसायचं ते ओझं..
ुउरापोटी घेऊन धावायचं..
आणि मानगुटावर ओझं आहे म्हणून आपला स्पीड कमी पडतो
म्हणत चिडचिडायचं.
कशाला असं?
उतरवून ठेवू,
नकोसे आकडे.
नकोसे टोमणे, नजरा.
झालेले अपमान.
नको त्या खुपत्या भावना.
छळकुटे संवाद.
हलकं वाटलं,
तर कदाचित आपला आनंदी जगण्याचा
स्पीड वाढेल..
ओझं वागवायचं
की उतरवून ठेवायचं..
निर्णय आपला.. आपलाच!
उडी आणि जमीन
जास्त उड्या मारू नकोस..
आपटशील..
असं कुणी सांगितलं
तर त्याच्याकडे बिंधास्त दुर्लक्ष करा!
आणि स्वप्न आपलं कितीही मोठं असो,
ेबेलाशक, हिमतीनं उडी मारा.
विश्वास स्वत:वर पाहिजे,
स्वत:तल्या बळावर पाहिजे,
तेवढा पुरतो!
पण अंदाज चुकला..
उडी चुकली
आणि आपण आपटलोच तर?
तर...?
तर काय?
आपटलो तरी पडू तर जमिनीवरच ना!!
आपण उड्या मारतोय,
आकाशात उडतो म्हणून
कुणी आपल्या पावलाखालची जमीन
तर नाही ना काढून घेऊ शकत?
शकतं का?
आपण उडालो,
तरी आपली जमीन तिथंच राहते..
पडलो तरी जमिनीवर पडू..
लागलं तर परत उभं राहू..
परत चालू, परत उडू..
एवढा विश्वास तर कायम राहतो स्वत:वर..
अंगावरच्या जखमांच्या खुणा
आणि न भरलेले व्रण
हे आपल्या धाडसाचे पुरावे..
ते मानानं जपावेत..
साजरे करावेत..
मिरवावेत..