पुरानी जीन्स और कुछ इलाज
By admin | Published: July 9, 2015 07:27 PM2015-07-09T19:27:19+5:302015-07-09T19:27:19+5:30
जगभरात सध्या स्किनी जीन्स वापरण्यावरून वादळ उठलं आहे. त्यानिमित्तानं आपल्याही जीन्स वापराच्या सवयी तपासून घेणं उत्तम!
Next
- चिन्मय लेले
जगभरात सध्या स्किनी जीन्स वापरण्यावरून वादळ उठलं आहे. त्यानिमित्तानं आपल्याही जीन्स वापराच्या सवयी तपासून घेणं उत्तम!
‘काहीही हं.’
अशी पहिली कमेण्ट असू शकते अनेकांची ती बातमी वाचून! उगीच काहीतरी टाइमपास बातम्या छापतात असं म्हणत नाकही उडवता येऊ शकतं.
पण त्या बातमीनं जगभर एका चर्चेला तोंड फोडलं हे खरं आहे!
मेंदूविकार, मेंदू शल्यचिकित्सा, मानसोपचार या तीन शाखांचा अभ्यास करणा:या एका अभ्यासपत्रिकेत अलीकडेच एक विशेष अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. त्या अभ्यासात केस स्टडी म्हणून एका 35 वर्षाच्या ऑस्ट्रेलियन महिलेची कहाणी सांगण्यात आली आहे.
नियमित टाइट स्किनी जीन्स वापरणारी ही महिला. रोजच्या धावपळीत तर जीन्स वापरायला अत्यंत सोयीची म्हणून आपल्याकडेही अनेकजणी आता सर्रास जीन्स वापरतात. तर तशीच ही महिलाही नियमित हेच कपडे वापरणारी!
एक दिवस घरी परतताना एकदम तिला वाटलं की आपले पाय जड पडताहेत. एकदम बधीर झालेत. आणि तो बधीरपणा अचानक इतका वाढला की ती रस्त्यात कोसळली. आपल्याला पाय आहेत अशी जाणीवही काही क्षण नव्हती. तिला तिचं उठताही येईना. कसंबसं लोकांनी तिला दवाखान्यात पोहचवली. दवाखान्यात पोहचली, पायांवर उपचार करायचे तर पायाला घट्ट चिकटलेली ती जीन्स पायातून निघेचना. तिचे पाय इतके सुजले होते की, त्यामुळे ती घट्ट जीन्स अधिकच घट्ट झाली. डॉक्टरांना शेवटी ती पॅण्ट कापून काढावी लागली.
हे असं अचानक का झालं? नक्की पायातलं त्रण अचानक का गळालं?
याचा अभ्यास करण्यासाठी मग थेट मेंदूविकारतज्ज्ञांना पाचारण करावं लागलं. बराच अभ्यास केल्यावर लक्षात आलं की तिच्या घोटय़ाच्या आणि टाचांच्या मसल्सना आतून दुखापत झाली होती. आणि तिच्या मेंदूकडून पायाकडे संदेशवहन करणा:या नसांमधे काही बिघाड झाल्यानं कंबरेखाली पायांर्पयत संदेशवहनाच्या कामात अनेक अडथळे येत होते.
सुदैवानं या सा:यावर उपचार करता आले. पायातलं गेलेलं त्रणही परत आलं. ती महिला पुन्हा आपल्या पायांवर उभी राहू शकली. चार दिवसांच्या उपचारांनंतर पुन्हा चालायलाही लागली.
हा अभ्यास प्रसिद्ध करणा:या डॉक्टरांनी असं स्पष्ट नमूद केलं आहे की, सतत ‘स्किनी’ अत्यंत घट्ट जीन्स घातल्यानं मज्जासंस्थेच्या कामातच अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे पायांना सूज येऊ शकते.
ज्या दवाखान्यात त्या महिलेवर उपचार झाले त्या रॉयल अॅडलेट हॉस्पिटलचे डॉक्टर थॉमस किंबर सांगतात की, पायांवर सूज येणं, तळपायाला खालून सूज येणं, घोटय़ाला किंवा टाचांना ठणक लागणं हे सारे अत्यंत घट्ट कपडे घालण्याचे परिणाम असू शकतात.
ही बातमी प्रसिद्ध झाली आणि जगभर गदारोळ झाला. सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला. अनेकांनी हिरीरीनं आपले अनुभव सांगितले. विशेषत: महिलांनी. काही तरुण मुलींनी. कुणाला सतत जीन्स वापरल्यानं युरीन इन्फेक्शनचा त्रस झाला, तर कुणाच्या पाश्र्वभागावर काळे चट्टे आल्याची समस्या. कुणाला त्वचेवर रॅश आली, तर कुणी आपण कसा गरोदरपणातही घट्ट जीन्स वापरण्याचा बिनडोकपणा केला अशी कबुलीही दिली.
काहींनी ठणकावून सांगितलं की, जीन्स वापरणं कायमचं हद्दपार करायला हवं, तर काहींचं म्हणणं होतं की, कशाला इतका टोकाचा विचार करता, या सा:यात त्या जीन्सचा काय दोष? जरा नीट, विचारपूर्वक, सावधपणो वापरले हे कपडे तर काही घोळ होण्याची शक्यताच नाही.
ही सारी चर्चा जगभर घडत असताना आपल्याकडे काय चित्र आहे?
एकतर आपल्या देशात उन्हाळा जास्त, तरी आपण ते जाडंभरडं कापड वापरतोच. त्यातही मुलींच्याच नाही, तर आता मुलांच्याही पॅण्ट्स एकदम टाइट, फुल फिटिंगच्या!
आणि मुलींच्या संदर्भात तर आपल्याला जीन्स वापरता येणं हे बंडखोरीचं लक्षण आणि मॉडर्न असल्याचंही. जीन्स न वापरणा:या मुलींना सरळ काकूबाई ठरवलं जातं.
त्यामुळेच मुली घरी भांडूनतंटून, इतरांच्या नाकावर टिच्चून जीन्स घालतात.
स्वस्तातल्या जीन्स विकतही घेतल्या जातात कारण ब्रॅण्डेड परवडणं अवघड.
आणि मग त्या जीन्स धुमसून वापरल्याही जातात.
काही तरुण मुलं तर असे हुशार की महिना महिना त्या पॅण्टला पाणी लावत नाहीत.
जीन्स धुवायची नसतेच असाच एक समज.
परिणाम व्हायचा तो होतोच. अनेकांना फंगल इन्फेक्शन्स म्हणजे नायटा, खरूज यासारखे त्वचाविकार होतात. एकतर त्वचाविकारासंदर्भात अज्ञान, त्यात ते कपडय़ांमुळे झाले असतील असा विचारही कुणी करत नाही.
जीन्सविषयी जगभर चर्चा होत असताना व पर्सनल अनुभवांनी ब्लॉगच्या ब्लॉग भरत असताना आपण आपल्या जीन्सवापराकडे एकदा सजगपणो बघायला हवं! म्हणून ही चर्चा.
जीन्स फॅशन म्हणून वापरताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, याची खबरदारी कोण घेणार?