एक वारी पुणे ते सासवड

By admin | Published: June 22, 2016 01:00 PM2016-06-22T13:00:07+5:302016-06-22T13:00:07+5:30

एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.

One from Pune to Saswad | एक वारी पुणे ते सासवड

एक वारी पुणे ते सासवड

Next

 एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.जास्त कोणाला सांगितलं नाही पण एक-दोन जणांना व्हॉट्स अ‍ॅप केलं ‘येणार का?’ त्यातल्या रोहयाने रिप्लाय केला की आम्ही दरवळेसच जातो,तु येणार का? मग काय ठरलं तर निघायचं. सुदैवानं एका मित्रानं कॅमेऱ्याची सोय करून दिली. घरी सारं सोईस्कर पडलं आणि इतर कार्यकर्त्यांबरोबर जाता येईल म्हणून शनिवारीच सायंकाळी घरी गेलो. मग रात्री एक भावासारखा काय, भशू-मित्रालच व्हॉट्सअ‍ॅप केलं कारण मला कोणाची नाही पण त्याची गॅरण्टी होती. त्याचा लगेच रिप्लाय आला. आणि सकाळी ८ वाजेपर्यंत शिवाजीनगरला यायचं ठरलं. मग काय लवकर उठायचं होतं त्यामुळं लवकर झोपलो पण झोप लागत नव्हती कुतुहुल होतं. एक्साईटमेण्ट होती. सकाळ झाली खेडच्या स्टॅण्डवर वर १०-१५ जणांचा घोळका हातात भगवा घेऊन आपल्या पारंपरिक वेशात मला येऊन मिळाला आणि तासा-दिडतासात आम्ही शिवाजीनगर गाठलं. पुढे रोहया आणि अजुन एक-दोनजण आम्हाला जॉईन झाले आणि आमचा १५ जणांचा काफिला हडपसरकडं निघाला. आणि पुढे एका पालखीचे झालो. तो आपला अष्टगंध, बुक्का लावून, सेल्फी काढून झालं. आणि नंतर माऊली-माऊली गजरात हातातल्या कॅमेऱ्यानं हे सर्व टिपायला सुरु वात झाली.पहिल्या टप्प्यात पुण्यातल्या गर्दीमुळे मी आणि दिप्तेश कार्यकर्त्यांपासून मागे राहिलो मग खूप कष्टाने माऊलींच्या पादुकांचे दर्शन म्हणजे अगदी हात लावून बरं का ! त्यानंतर त्या काकांनीच माझ्याकडून कॅमेरा घेऊन माझा त्याक्षणाचा एक फोटो काढून दिला. अजुन काय पाहिजे होतं मला? मग पुढे सर्वजण परत एकत्र आलो. मग हळूहळू आम्हीही दिंडीतल्या लोकांबरोबर गवळण,अभंग (नसले येत तरी) म्हणत होता. कारण का कुणास ठाऊक तेच भारी वाटतं होतं. पुढं मग पाव आणि भज्यांचा भुगा खाऊन,थोडंसं थांबत पालखीचा विसावा म्हणजे दिवे घाटाच्या अलीकडे पोहोचलो.घाट चढायचा होता त्यामुळ थोड ंथांबून घेतलं. तिथ दोन मावशींनी आग्रहानं भाजी-भाकरी देऊ केली होती , ते अजून आठवतं. मग दिवे घाटात चढण सुरु झाली .पावसाची खुप आस धरून होते सगळेजण पण थोड्याशा थेबांपलिकडे अपेक्षांवर पाणीच पडलं.आतापर्यंत पेपरमधे,टिव्हीत याच दिवे घाटाचे फोटो आपण पहायचो याची आठवण मात्र झाली. घाटाच्या मध्यात आल्यावर पाय दुखायला लागले कारण जवळ-जवळ २०-२५ किलोमीटर चालणं झालं होतं. एका पुणेरी काकुंनी विचारलं,‘ का रे दमलास का?कुठून आलास?’ म्हटलं,‘राजगुरु नगर हुन,कसे चालतात ही लोकं एवढे वयस्कर, पण न दमता?’ तर त्या म्हणाल्या,‘हाच तर फरक आहे शहरी आणि ग्रामीण जीवनात!’ पुढे दिवे घाट संपून सासवडचा जरा मोठा हायवे लागला. त्यामुळे चालणं सोप्पं झालं होतं पण पाय खुप दुखत होते मग एका चहाने थोडी तरतरी आली आणि सासवड ची मंडळी दिंडी पाहायला यायला सुरु वात झाली. त्यात सूर्यास्ताची वेळ त्यामुळं फोटो काढायला मजा आली. सुर्यस्ताबरोबर माऊलींचा निरोप घेत आम्ही यात्रा स्पेशल गाडीनं पुन्हा पुण्याकडे यायला निघालो... आता दिंड्या निघाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, आणि मागच्या वर्षीचा हा प्रसंग आठवला.. केवळ अद्भूत आनंददायी! श्रेयस आहिरे

Web Title: One from Pune to Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.