एकावेळी एक शॉट! तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:27 PM2017-11-08T18:27:39+5:302017-11-09T11:03:04+5:30

आम्ही शूटरला सांगतो, तुझी स्पर्धा अन्य खेळाडूंशी नाही. तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे. त्यात तू काल काय परफॉर्म केलं, किती यश मिळालं, किती उत्तम खेळलास हे आत्ता याक्षणी काही महत्त्वाचं नाही.

One shot at a time! The pressure on you is as much as the rest | एकावेळी एक शॉट! तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे

एकावेळी एक शॉट! तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे

Next

- मोनाली गो-हे

आम्ही शूटरला सांगतो,
तुझी स्पर्धा अन्य खेळाडूंशी नाही.
तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे.
त्यात तू काल काय परफॉर्म केलं,
किती यश मिळालं,
किती उत्तम खेळलास
हे आत्ता याक्षणी काही महत्त्वाचं नाही.
तू हरू शकतोस का या भावनेलाही
आत्ता याक्षणी काही अर्थ नाही
कारण अजून स्पर्धाच सुरू झालेली नाही,
तू हरलेला किंवा जिंकलेला नाहीस.
तुझी स्पर्धा अन्य कुठल्याच व्यक्ती,
स्पर्धा अथवा परिस्थितीशी नाही.
बंदूक तुझ्याच हातात आहे.
निशाना किती अचूक लागणार,
लक्ष्यभेद कसं करणार हेही
तुझ्याच हातात आहे.
त्यामुळे शांत राहा,
हा एक शॉट
एवढाच तुझा फोकस हवा,
बाकी काहीच महत्त्वाचं नाही !
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करताना काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात..

आता राष्ट्रकुलसाठी गेलेल्या एअर पिस्टल नेमबाजी स्पर्धेची मी एक प्रशिक्षक होते. सोबत अजून एक भारतीय प्रशिक्षक आणि एक विदेशी असे आम्ही तीन प्रशिक्षक संघाच्या सोबत असतो.
ज्या टीमला आम्ही घेऊन जातो ती सिनिअर टीम असते. आंतरराष्टÑीय स्पर्धा, आॅलिम्पिकसुद्धा खेळलेले हे खेळाडू. त्यांचं तंत्र उत्तम असतं. त्यांची गुणवत्ता त्यांनी सिद्धच केलेली असते. त्यामुळे तंत्र म्हणून त्यांना फार काही शिकवणं अपेक्षित नसतंच. मुद्दा असतो तो त्यांच्या बारीकसारीक गोष्टी अगदी ओळखपत्र ते खाणंपिणं, प्रशासकीय सुविधा, परवानग्या, प्रवास, शस्त्रं, उपकरणांची काळजी ते मनोधैर्य उत्तम ठेवणं यासाºयाचा.
प्रशिक्षक म्हणून हे सारं सांभाळणं फार महत्त्वाचं आणि जबाबदारीचंही असतं. कारण या साºयाचा परिणाम, काळजी यांचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊच शकतो.
आता एक उदाहरण सांगते, आॅस्ट्रेलियात शस्त्र बाळगण्याचे कायदे वेगळे आहेत. आपल्याकडे एअर वेपनला परवान्याची गरज नसते. म्हणजेच ज्या टीमची मी कोच आहे त्या एअर पिस्टल प्रकाराच्या खेळात परवाना आवश्यक नसतो. पण आॅस्ट्रेलियात मात्र ही साधनं न्यायची तर एक व्हिजिटर लायसन्स घेणं आवश्यक होतं. हे आम्हाला तिकडे पोहचल्यावर कळलं. तिकडचे कस्टमवाले आम्हाला ते साहित्य आमच्या मॅगझिन, पॅलेट नेऊ देत ना. मग साºया परवानग्या काढून ते सारं खेळाडूंना पुरवावं लागलं.
हे एक उदाहरण, कधी विमान प्रवासात शस्त्रांची बॅगच येत नाही कधी तर कधी आणखी काही. अशावेळी उत्तम शूटरसुद्धा डिस्टर्ब होऊ शकतो. अशावेळी प्रशिक्षक म्हणून त्याचं मनोधैर्य कायम राखणं आणि हे सारे प्रशासकीय प्रश्न, अडचणी सोडवणं प्रशिक्षकाला करावं लागतं. आणि या साºयात स्वत:ही फोकस्ड राहून एक प्रश्न एकावेळी या न्यायानं सोडवावा लागतो.
दुसरा मुद्दा खेळण्याच्या नियमांचा. ते सारे आंतरराष्टÑीय नियम खेळाडूला माहिती असणं अपेक्षित नसतं. सिनिअर खेळाडूंना ते काहीअंशी माहिती असतं; पण नवख्या खेळाडूंना मात्र ज्युरीनं रोखलं, टोकलं की तो डिस्टर्ब होऊ शकतो. अशावेळी नेमके नियम सांगून आपल्या खेळाडूला खेळण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणं हे आणखी एक महत्त्वाचं काम. आंतरराष्टÑीय स्तरावर आपण आपल्या संघाची प्रशिक्षक म्हणून सोबत करतो तेव्हाचे हे अनुभव आपल्यालाच अधिक फोकस्ड बनवतात हा माझा अनुभव आहे.
शूटर म्हणून वर्तमानात जगणं आणि आपल्या श्वासावर लक्ष देत, शांत राहत परिस्थिती हाताळणं जे शिकलेलं असतं ते याही टप्प्यात अधिक वेगवेगळ्या स्वरूपात कामी येतंच.
आणि शूटिंगच्या तंत्राइतकाच आणि कौशल्यावरच्या हुकमतीएवढंच महत्त्वाचं ठरतं ते माइण्ड ट्रेनिंग. मानसिक सराव. आमचे शूटिंगचे गुरु असलेल्या भीष्मराज बाम सरांनी ते तंत्र आम्हाला शिकवलं. तेच आम्ही खेळाडूंना सांगतो.
सिनिअर खेळाडू आणि नवे खेळाडू यांच्यासाठीचा मानसिक सरावही वेगळ्या टप्प्यात बदलत जातो.
जेव्हा खेळाडू नवीन असतो, जिंंकत नॅशनलपर्यंत पोहचतो तेव्हा त्याच्यावर आपल्याच आधीच्या कामगिरीचं, उत्तम यशाचं प्रेशर नसतं. फार अपेक्षाही नसतात. तो चांगला खेळून जातो. ती झाली बिगिनिंग फेज. पण यश मिळायला लागलं की, या बिगिनिंग फेजचं ट्रान्स्फॉर्मिंग फेजमध्ये रूपांतर होतं. आणि मग खेळाडूला वाटू लागतं की, आपल्यासारखे तर बरेच खेळाडू आहेत. आपली स्पर्धा या खेळाडूंशी आहे. ते सगळेच चांगले खेळतात. आपलं काय? आपण आत्तापर्यंत जिंकत आलो, आता हरलो तर काय? आणि मुख्य म्हणजे आपण हरू शकतो..
आपण हरू शकतो ही भावना खेळाडूला हरवते..
प्रशिक्षक म्हणून आम्ही खेळाडूला, शूटरला हे सांगतो की, तुझी स्पधायाही टप्प्यात उत्तम होतो आणि स्वत:चा खेळ तो अधिक सरस, अधिक मोठ्या उंचीवर घेऊन जातो.
ज्याला जमत नाही, त्याचा खेळ मात्र केवळ या इतरांशी स्पर्धा करण्याच्या अ‍ॅटिट्यूडमुळेच मागे पडत जातो.
आणि या अशा क्षणी खेळाडूनं अलर्ट राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानं तसं अलर्ट राहावं म्हणून आम्ही प्रशिक्षकांनी काम करणं महत्त्वाचं असतं.
आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही तर खेळाच्या कुठल्याही टप्प्यात हे फार महत्त्वाचं आहे. आपण तंत्र, कौशल्य अर्थात टेक्निक एका टप्प्यापर्यंत शिकू शकतो, ते उत्तम जमतं. आपण त्यात एक्स्लन्सही मिळवतो; पण त्यानंतर ते टेक्निक कसं वापरायचं, त्यासाठीची ऊर्जा आपला मानसिक सराव आणि आपला अ‍ॅटिट्यूडच देतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतानाच नाही तर शूटर म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून मी हेच शिकलेय की आपण फोकस्ड असणं, जे काम करू, त्याक्षणी पूर्ण प्रयत्न करणं, सतत चुकांचा विचार न करता त्या टाळून, मान्य करून आपण काय उत्तम करू शकतो या पर्यायांचा विचार त्या शंभर खेळाडूंशी नाही. कारण तुझ्यावर जे प्रेशर आहे ते त्या शंभर खेळाडूंवरही आहे. तू काल काय परफॉर्म केलं, किती यश मिळालं, किती उत्तम खेळलास हे आत्ता याक्षणी काही महत्त्वाचं नाही. तू हरू शकतोस का या भावनेलाही आत्ता याक्षणी काही अर्थ नाही कारण अजून स्पर्धाच सुरू झालेली नाही, तू हरलेला किंवा जिंकलेला नाहीस.
तुझी स्पर्धा अन्य कुठल्याच व्यक्ती, स्पर्धा अथवा परिस्थितीशी नाही. अन्य खेळांच्या तुलनेत शूटिंगमध्ये हे एक महत्त्वाचं असतं. त्या खेळांमध्ये समोर एक किंवा अनेक प्रतिस्पर्धी असतात आणि त्यांना प्रत्यक्ष हरवायचं असतं. शूटिंगचं तसं नाही. बंदूक आपल्याच हातात असते. निशाना किती अचूक लागणार, लक्ष्यभेद कसं करणार हे आपल्याच हातात असतं. आपण आपल्यासाठी खेळत असतो. त्यामुळे शांत राहून त्या शॉटकडे लक्ष देणं ही त्याक्षणाची आत्यंतिक महत्त्वाची गरज असते. आणि मुख्य म्हणजे गिव्ह अप करायचं नाही, हार पत्करायची नाही.
एकावेळी एक शॉट !
हे सूत्र अजिबात विसरायचं नाही !
शूटिंगमध्ये ४० गोळ्या चालवायच्या असतात. त्या ४० गोळ्या बंदुकीत काही एकदम लोड केलेल्या नसतात. एक शॉट झाला की दुसरा असतो.
म्हणजे एकावेळी फक्त एक गोळी, एक टार्गेट एवढाच विचार करायचा असतो. पहिल्या शॉटचाही दुसºया शॉटशी काहीही संबंध नसतो. एक शॉट झाल्यानंतर श्वसनाचे व्यायाम करून, कुल राहण्याचं टेक्निक वापरून दुसºया शॉटसाठी तयार व्हायचं असतं. अशावेळी इतर खेळाडू, लोक किंवा अगदी पालक यांच्याशीही आय कॉण्टॅक्ट करणं टाळा असं आम्ही सांगतो. फक्त कोचशी नजरानजर, त्यातला संवाद पुरतो.
परत एक शॉट. एकच नवा कोरा.
तो एक शॉट पूर्ण फोकस्ड राहून, त्याक्षणात आपली पूर्ण गुणवत्ता वापरून, एकचित्त राहून खेळणं ज्याला जमतं तो जिंकतो.
काही शूटर्सना हे लवकर कळतं, लवकर जमतं, ते लवकर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू लागतात.
जे टॉप लेव्हलचे शूटर असतात त्यांना हे टेक्निक सरावानं उत्तम जमलेलं असतं. ते पूर्ण फोकस्ड असतात. सर्वप्रकारचा बदल, हवामान, खानपान, तणाव हे सारं रुटीन वाटावं इतकं ते स्वत:त मुरवून घेतात. मात्र वेगळ्या वातावरणात, वेगळ्या देशांत, वेगळ्या प्रकारचं अन्न, हवा, अवतीभोवतीचं कल्चर यासाºयानं काही खेळाडू भांबावून जाऊ शकतात. त्यांच्या खेळावर या साºयाचा किंवा क्वचित काही लहानसहान गोष्टींचाही परिणाम होऊ शकतो. अशावेळी प्रशिक्षक म्हणून आम्ही त्यांना पुन्हा वर्तमानक्षणात आणून खेळावर फोकस्ड राहण्यासाठी मदत करतो.
कधी उलटंही असतं. सिनिअर, टॉप लेव्हलच्या खेळाडूंना आपलंच यश रिपिट करायचं असतं म्हणजेच आधीची कामगिरी त्यांना पुन्हा करायची असते. ते झालं नाही तर काय याचं दडपणही असतं. त्यांना त्या प्रेशरचा सामना करत वर्तमानकाळातल्या मॅचचा प्रत्येक शॉट खेळणं आणि तो उत्तम होणं हा प्रवास करावाच लागतो. तो सोपा नसतो. नवख्या खेळाडूंपेक्षा यशस्वी खेळाडूंना हे प्रेशर हाताळणं जास्त जड जातं.
काही खेळाडूंना कधी वाटतं, हे काय नवीन मुलं. हे कसे उत्तम कामगिरी करतात. यांनी मेडल जिंकली आणि आपण हरलो तर? आपण यांच्यासमोर हरलो तर? इज्जतच जाईल आपली. त्यांच्याही नकळत नव्या खेळाडूंशी ते स्वत:ची तुलना करायला लागतात. बिचकतात. त्या मुलांचं जिंकणं वेगळ्या अर्थानं स्वत:शी जोडून घेतात.
अशावेळी मोठ्या खेळाडूंनाही मानसिक सल्ल्याची, समुपदेशनाची गरज पडते. स्पोर्ट स्कायकॉलॉजी काम करते ती इथेच.
अशावेळी या खेळाडूंना सांगावं लागतं की, तुझा हा अ‍ॅटिट्यूड बदल. तुझी स्पर्धा त्या नव्या मुलांशी, त्यांच्या जिंकण्या-हरण्याशी नाही. तुझं टेक्निक पक्कं आहे. तुझा गेम उत्तम आहे. तुझं जिंकणं-हरणं पॉझिटिव्हली घे. स्वत:पुरतं. त्यांच्या जिंकण्याशी, उत्तम खेळण्याशी, तुझ्या लेव्हलपर्यंत येण्याशी तुझ्या खेळाचा संबंध नाही. ते जिंकतात याचा अर्थ यू आर नॉट अ बॅड शूटर!
आपण आपला खेळ स्वत:साठी उंचावणं हे ज्याला कळतं, त्याचा खेळकरणं ही आपली ताकद बनू शकते.
ती ताकद आपल्याला नवी आव्हानं पेलण्याची आणि जिंकण्याची ऊर्जा देते.

(एअर पिस्टल प्रकारात भारतीय नेमबाजी संघाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त शूटिंग परीक्षक.)

शब्दांकन - मेघना ढोके

Web Title: One shot at a time! The pressure on you is as much as the rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.