आयआयटी प्रवेशासाठी ऑनलाइन शिकवणी लवकरच!

By admin | Published: June 14, 2016 09:00 AM2016-06-14T09:00:27+5:302016-06-14T09:00:27+5:30

आयआयटीला जायचे आहे पण कोचिंगसाठी पैसे नाहीत. चिंता करू नका. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सोय लवकरच होणार आहे. तुम्हाला आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी घरबसल्या शिकवणी मिळणार आहे. तीही अगदी मोफत

Online tutorial for IIT access soon! | आयआयटी प्रवेशासाठी ऑनलाइन शिकवणी लवकरच!

आयआयटी प्रवेशासाठी ऑनलाइन शिकवणी लवकरच!

Next
>आयआयटीला जायचे आहे पण कोचिंगसाठी पैसे नाहीत. चिंता करू नका. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सोय लवकरच होणार आहे.  तुम्हाला आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी घरबसल्या शिकवणी मिळणार आहे. 
तीही अगदी मोफत. 
गरीब विद्यार्थ्यांनाही आयआयटीची दरवाजे खुली व्हावीत. त्यांच्यातील टॅलण्ट देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात यावे, या उद्देशातून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रलय कामाला लागले आहे. ठरल्याप्रमाणो सर्व नियोजन झालेच तर 2017 मध्ये होणा:या आयआयटी प्रवेश परीक्षेसाठीचे सर्व धडे तुम्हाला घरबसल्या मिळतील. या योजनेची घोषणा आगामी ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. जे विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी महागडे कोचिंग क्लास लाऊ शकत नाहीत, अशा विद्याथ्र्यासाठी केंद्रातर्फे ही योजना राबविली जाणार आहे. ही सर्व शिकवणी पूर्णत: मोफत असणार आहे. घरातील डीटीएचच्या माध्यमातून ही शिकवणी दिली जाईल शिवाय प्राध्यापकांशी संवादही साधता येईल. तसेच अभ्यासासाठी इंटरनेवर मोफत साहित्य पुरविले जाईल. या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. केवळ शैक्षणिक साहित्यच पुरवण्यात येणार नाही तर वारंवार परीक्षाही घेतल्या जातील. यातून अधिकाधिक तयारी करुन घेतली जाईल. देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये हे शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे आव्हान या मंत्रलयासमोर आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून ते स्वीकारले जाईल.
 
- गजानन दिवाण

Web Title: Online tutorial for IIT access soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.